3 मे मंगळवार अक्षय तृतीया पूजा करताना बोला लक्ष्मीचा मंत्र, सर्व काही मनासारखे होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू पंचांगनुसार, अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी ही तारीख 3 मे 2022 रोजी येत आहे. या तिथीला आखा तीज असेही म्हणतात.

हिंदू धर्मात याला अधिक महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विशेषतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे.
या दिवशी भगवान विष्णूची चंदनाने पूजा केली जाते.

असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि कुटुंबातील प्रत्येकामध्ये परस्पर सौहार्द कायम राहतो. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या जीवनात आनंद आणि कुटुंबातील सर्वांमध्ये सौहार्द कायम ठेवायचा असेल.

तर या दिवशी स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूची चंदन पद्धतीने पूजा करावी.

अक्षय तृतीया 3 मे मंगळवारच्या दिवशी आहे आणि 3 मे च्या दिवशी जेव्हा ही तुम्ही शुभमुहूर्तामध्ये पूजा कराल, सकाळ-संध्याकाळ केव्हाही तुम्ही पूजा कराल कोणती पूजा करायला,

कारण या दिवशी भरपूर लोकांच्या घरी घागर पूजन होते. तसेच याशिवाय काहींच्या घरी पितरांची पूजन होते. याचबरोबर काहींच्या घरी लक्ष्मी, धनांचे पूजन केले जाते.

तर तुमच्या घरात जी ही पूजा केली असेल किंवा पूजा नसेल तरी तुम्ही तुमच्या देवघरा समोर बसून नैवेद्य दाखवून हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे.

हा मंत्र तुम्ही 21 वेळेस किंवा 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करु शकता. तर यासाठी सगळ्यात आधी दिवा आणि अगरबत्ती लावायची आणि सर्वप्रथम हात जोडून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची.

ही प्रार्थना आपल्या सर्व सुखसोयी साठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच माता लक्ष्मीचा वास घरात करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, हा मंत्र तुम्हाला बोलायचं आहे.

तर हा चमत्कारिक मंत्र काही असा आहे की, ‘ॐ कमलवासिन्यै श्रीं श्रियै नम:।’‘ॐ कमलवासिन्यै श्रीं श्रियै नम:।’

तर हा लक्ष्मी मातेचा अगदी शक्तिशाली आणि खूप चमत्कारी मंत्र आहे. याचा जप अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतात.

पैशाच्या अडचणी दूर होतात आणि घरात आलेला पैसा टिकायला लागतो. त्यामुळे बरकत व्हायला लागते.

घरात सुख-समृद्धी नांदते आणि खास करून लक्ष्मी आपल्या घरात होतो. तर हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवसाची खूप मोठी मान्यता आहे आणि हा खूप मोठा दिवस मानला जातो.

तर या दिवशी लक्ष्मीची पूजा तुम्ही नक्की करा आणि लक्ष्मी माते समोर बसून या मंत्राचा जप श्रद्धेने, विश्वासाने आणि मनोभावाने नक्कीच करा. त्यामुळे लक्ष्मी माता तुमच्या घरात येईल आणि तुमच्या घरात वास करेल. तुमच्यावर कृपा करेल…

याशिवाय, अक्षय्य तृतीयेला पितरांना कुशाच्या पाण्यासह तीळाचे पाणी दान केल्याने ते अनंतकाळ तृप्त होतात. या तिथीपासूनच गौरी व्रत सुरू होते. असे केल्याने शाश्वत सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते.

अक्षय्य तृतीयेलाही गंगास्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी गंगेत स्नान केल्यास किंवा गंगेचे पाणी घरात मिसळल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. या शुभ सणाला मंदिरात स्नान करण्याची परंपरा आहे.

तसेच हिंदू ग्रंथात असे म्हटले आहे की, अक्षय्य तृतीयेला केलेल्या तीर्थयात्रेने जाणूनबुजून किंवा नकळत केलेले प्रत्येक पाप नष्ट होते. यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात.

त्याला दैवी स्नान असेही म्हणतात. जर तीर्थस्नान करू शकत नसाल तर घरच्या पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाकून स्नान करू शकता. असे केल्याने पवित्र स्नानाचे पुण्यही प्राप्त होते.

यानंतर अन्न आणि पाणी दान करण्याची शपथ घ्या आणि ते गरजूंना दान करा. असे केल्याने अनेक यज्ञ आणि कठोर तपस्या करण्याचे पुण्य प्राप्त होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!