26 सप्टेंबर, सर्वपित्री अमावस्या, गाईला चारा ही एक वस्तू, पितृदोष दूर होईल, पितृ प्रसन्न होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे. पितृ पक्षाच्या काळात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे.

कारण या तिथीला सर्व पितरांना निरोप दिला जातो. हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद पौर्णिमा तिथीपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीपर्यंतचा काळ पूर्वजांना समर्पित आहे. पितृ पक्षाच्या काळात जे लोक या पृथ्वीवर हयात नाहीत त्यांना श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण दिले जाते.

असे मानले जाते की, पितृ पक्षादरम्यान, पूर्वज स्वर्गातून पृथ्वीवर आपल्या कुटुंबांना भेटण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. पितृ पक्षाचा शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या, पितृ विसर्जनी अमावस्या आणि महालय या नावाने ओळखला जातो.

या दिवशी श्राद्ध, पिंडदान आणि पूजा करून सर्व पितरांना निरोप दिला जातो. म्हणूनच या तिथीला सर्वपित्री अमावस्या म्हणतात.

26 सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्वपित्री अमावस्या आलेले आहे. आपले जे पितर आहे ते 16 दिवसांसाठी पृथ्वीवर येत असतात आणि आपण केलेले श्राद्ध, तर्पण या सर्वांनी तृप्त होऊन आशीर्वाद देऊन सर्वपित्री अमावस्येला पृथ्वीवरून निरोप घेतात.

तर या अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या पितरांना निरोप द्यायचा असातो आणि या दिवशी काही विशेष उपाय आहे .

जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती नष्ट होईल. तसेच तुम्हाला या अमावास्येला एक उपाय करायचा आहे.

तुम्ही हा उपाय किंवा तोडगा कितीही अमावस्या तुमच्यां इच्छेनुसार करू शकता. जोपर्यंत तुमच्या समस्या सुटत नाही, जोपर्यंत तुमच्या समस्या दूर होत नाही, तोपर्यंत दर अमावस्येला तुम्हाला हा तोडगा करू शकता.

हा तोडगा म्हणजे,अमावस्याच्या दुपारी 12 वाजता तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि हा भात बिना मिठाचा असला पाहिजे. फक्त पाणी आणि तांदूळ असले पाहिजे. चुकनही मीठ टाकायचे नाही.

मग त्यानंतर भात शिजवून झाल्यानंतर, त्या भाताचे तीन पिंड तयार करायचे आहेत. मग हे 3 गोळे बनवल्यानंतर,यातील पहिला गोळा छतावर ठेवावा, तर दुसरा गोळा घराबाहेर दोन लाकडे जाळून एक छोटीशी अग्नी पेटवून,

त्यावर त्या लाकडांच्या अग्नीवर जागेवर तो दुसरा गोळा ठेवावा आणि तिसरा गोळा गाईला द्यावा. असे तीन गोळे करावे ,की त्यामधील एक गोळा कावळ्याला तर एक गोळा आगीवर तर तिसरा गोळा गाईला द्यावा.

याशिवाय यातील प्रत्येक गोळा ठेवतानाच ठेवताना, तुम्हाला पितृ देवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. हा एक तोडगा केल्यानंतर, त्यानंतर तुम्ही रोज दिवसातून सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला नियमितपणे पितृ सूक्त किंवा पितृस्तोत्र नक्की वाचले पाहिजे.

तसेच हे पितृ सूक्त आणि पितृस्तोत्र तुम्हाला स्वामी समर्थांची नित्यसेवा मध्ये सहज उपलब्ध होईल आणि रोज याचे वाचन करावे. तसेच दर अमावस्येला बिना मिठाचा भात शिजवून, तीन पिंड बनवून,

यातील एक गोळे गोळा कावळ्याला ,एक गोळा गाईला एक गोळा आगीवर नक्की ठेवावा. या तोडगांमुळे, तुमचा पितृदोष काही दिवसातच दूर होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!