नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जन्माष्टमी येण्याआधी घरी घेवून या 4 वस्तू, फायदाच फायदा होईल..
6 सप्टेंबर या दिवशी श्री कृष्ण जन्माष्टमी आलेली आहे. जन्माष्टमी दिवस श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
हा संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो.याशिवाय या रात्रीला “मोहनरात्री” असेही म्हटले जाते. या अत्यंत पवित्र दिवशी श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते.तसेच भगवान श्रीकृष्ण यांना नैवेद्य,56 भोग चढवले जातात आणि या दिवशी व्रत करतात,किंवा उपवासही केला जातो.
त्यामुळे आपल्या जीवनातील कष्ट, संकट दूर होण्यास सुरुवात होते. भगवान श्री विष्णूचे चोवीस अवतार आहेत,त्यामुळे एक महत्वाचा अवतार म्हणजे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार होय.
त्यामुळे या श्री कृष्ण जन्माच्या दिवशी श्रीकृष्णांना प्रिय असल्यास,काही वस्तू जर आपण आपल्या घरात आणल्या, तर आपल्या घरावर आणि आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होतील आणि
तसेच याशिवाय या वस्तू माता लक्ष्मी व भवन कुबेर यांना आकर्षित करतात. कारण भगवान श्री विष्णूची पत्नी म्हणजेमाता लक्ष्मी होय. मात्र ज्या ठिकाणी श्रीकृष्णांच्या प्रिय वस्तु असतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मी निवास करीत असतात.
त्यामुळे श्रीकृष्ण जन्माचे दिवशी या पाच वस्तू पैकी कोणतीही एक वस्तू आपण आपल्या घरीत नक्की आणली पाहिजे.तसेच शक्य असल्यास, या पाचही वस्तू तुमच्या घरात आणू शकता.
1. गोमाताची मूर्ती: गोमातेची मूर्ती या दिवशी, आपल्याला घरात आणून स्थापन करायचे आहे, तुम्ही ही मुर्ती आपल्या घरातील देव किंवा घराच्या ईशान्य कोपर्यात स्थापित करू शकता.
यामुळे कुंडलीतील राहू-केतू दोषांपासून मुक्ती मिळते. याशिवाय गोमातेमध्ये 33 कोटी देवीदेवताचा वास असल्यामुळे,अशी गोमाता श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे.याशिवाय श्रीकृष्णांनी गोमाताचे पालन देखील केलं होतं,
म्हणून अशी गोमातेची मूर्ती आपण आपल्या घरात ठेवल्यास, आपल्या घरातील वास्तु दोष तसेच जर आपल्या कुंडलीत काही दोष नाहीसे होतात, त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अशी गोमातेची मूर्ती आपल्या घरी अवश्या आणली पाहिजे.
2.बासुरी: आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी बासरी आणली पाहिजे.कारण बासरी ही श्रीकृष्णांना खूप प्रिय आहे. बासरी ही श्रीकृष्णांच्या सतत सोबत असते, अशी बासरी जर आपण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी घेऊन आलात ,
तर त्यामुळे आपल्या घरात मात्र लक्ष्मी आकर्षित होते. परिणामी दरिद्रता आपल्या घरातून हद्दपार होते. तसेच बासरीच्या ध्वनीने सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
3.मोरपंख: कारण मोरपंख सुद्धा भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे आणि स्वतः श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर मोरपंख धारण करतात. तसेच मोरपंख हा श्रीकृष्णाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची वस्तु मानली जाते.
त्यामुळे जर आपल्या मानवी जीवनाचा उत्कर्ष करायचा असेल, तर आपण देखील आपल्या जीवनात मोरपंख धारण करायला पाहिजे.याशिवाय मोरपंखाचे आणखीही फायदे सांगितले जातात,
यामध्ये मोरपंख घरात ठेवल्यास, आपल्या घरातील वास्तुदोष दूर होत असतात. तसेच आपल्या घरात सुख समृद्धी आणि धनसंपदा नांदते. मित्रांनो मोरपंख पूजा केली तर, ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, त्यांना संतान प्राप्ति सुद्धा लवकर होते.
त्यामुळे असे हे उपयुक्त मोरपंख आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी घेऊन यायचा आहे आणि याची स्थापना देवघरात किंवा तुमच्या घरात येणारे व्यक्तीची नजर त्याच्यावर पडेल अशा ठिकाणी आपल्यालाही मोरपंखी लावायचा आहे.
तसेच शक्य असेल तर आपल्या घराचे मुख्य द्वार किंवा त्या द्वाराच्या दोन्ही बाजूला मोरपंखी लावू शकता.त्यामुळे आपल्या घरामध्ये असं मोरपंख ठेवले पाहिजे, ज्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष, नजरदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
4.यमुनेचं जल: आपल्याला यमुना नदीचे जल भेटले तर, आपल्या देवघरात अवश्य ठेवले पाहिजे. कारण श्रीकृष्णांनी यमुना नदीच्या किनारी बराच काळ व्यतीत केला आहे, हे यमुनेचे जल श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्यामुळे,यामुळे आपल्या घरातील अकाल मृत्यू टाळण्यास मदत होते. ज्या घरात यमुनेचे जल ठेवले जातात, त्या घरात अकाल मृत्यू होत नाही. तर असं यमुनेचे जल सुद्धा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी देवघरात अवश्य ठेवले पाहिजे.
यापैकी कोणती एक वस्तू किंवा जर तुम्हाला शक्य असेल ,तर सर्व वस्तू देखील तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता.यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते,तसेच मनात जर काही इच्छा असेल, तर तेसुद्धा पूर्ण होते.याचबरोबर घरातील नजर दोष नाहीसा होतो, तुमच्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणूनच श्रीकृष्णांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्या घरी नक्की ठेवल्या पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments