नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,पितरांचे श्रद्धेने स्मरण करून श्राद्ध कर्म केले जाते. ज्या तिथीला पूर्वज परलोकात गेले त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. श्राद्ध केवळ पितरांच्या उद्धारासाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केला जातो.
पितृ पक्ष शनिवारी पौर्णिमा तारखेपासून, 10 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 25 सप्टेंबरला अमावस्या तिथीला समाप्त होईल. ज्योतिषी दैवज्ञ कृष्ण शास्त्री यांच्या मते, पितृ पक्ष यावेळी 15 दिवसांऐवजी 16 दिवसांचा असेल.
अष्टमी तिथी 17 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला साजरी होणार आहे. पितृपक्षात पितरांची उपासना केल्याने आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. पितृ पक्षामध्ये आपल्या पितरांना श्रद्धेने जल अर्पण करण्याचा नियम आहे.
गरुड पुराणात श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन करण्यात आले आहे. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण होय. चातुर्मासात येणारी अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांना सांस्कृतिक, धार्मिक, नैसर्गिक, व्यवहारी आणि आरोग्याच्या दृष्टिने महत्त्व आहे.
तसेच भाद्रपद महिन्यातील वद्य पक्षालाही आहे. भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते.
म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात,असा समज आहे. पितृपक्षातील श्राद्धात क्षणदान,अर्घ्यदान, पूजा,अग्नौकरण,पिंडदान,विकिरदान, स्वधावाचन असे विधी केले जातात.
त्यामुळे जर तुम्ही या काळात कोणत्याही दिवशी तुमच्या पितरांना एक विशेष प्रार्थना केल्यास, कोणतीही अडचण येणार नाही याशिवाय कधीच पितृदोष होणार नाही.त्यामुळे हे 15 दिवसांत खूप महत्त्वाचे असतात.
पितृपक्ष खूप महत्त्वाचा असतो,आपल्या पितरांना पण घास टाकतो, त्यांची प्रार्थना करतो ,त्याची आराधना करतो ,अशा प्रकारे जशी त्याची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची असते की,
आमच्यावर तुमची कृपा असू द्या, आमच्यावर कोणते संकट येऊ देऊ नका, यासाठी आपल्याला पितृदोष यात कोणत्याही दिवशी किंवा तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहित असेल, तर त्या तिथीला सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकतात.
मग ही प्रार्थना पितरांना काही अशा प्रकारे करावी की, ” हे पितृ देवता, आमच्याकडून काही चूक झाली असेल, तर आम्हाला माफ करा. आमच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या तसेच आमच्यावर कोणते संकट ,अडचणी किंवा दुःख येऊ देऊ नका.
तुम्ही सदैव आमचे रक्षण करा आणि आमचे सर्व काम पूर्ण होऊ द्या, आमच्यावर त तुमची कृपा असू द्या”एवढी छोटीशी सोपी प्रार्थना तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या पितरांना करायचे आहे.
तसेच जर तुम्हाला तिथीनुसार करणार असाल,तर करू शकता किंवा त्या तिथीला त्या श्रद्धा त्या दिवशी अशी प्रार्थना करू शकता.
तुम्ही श्राद्ध करतच नसाल, तर या पंधरा दिवसांमध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही इतरणा प्रार्थना करू शकतात. मात्र त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की,
आपल्याला दुपारच्या 12 वाजेच्या आत ही प्रार्थना करायची आहे, मग तुम्ही देवघरा समोर बसून करू शकतात किंवा कावळ्याला घास किंवा कुत्र्याला चपाती देऊन करू शकता. याशिवाय गाईला चपाती देऊनही, तुम्ही प्रार्थना करू शकतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments