नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्रीच्या तिसऱ्या माळीला म्हणजेच मंगळवारी धनलाभ होण्यासाठी करा हा गुप्त उपाय..
स्वामी सांगतात की, आळशी मनुष्य कोणतीच गोष्ट करू शकत नाही आणि त्यामुळेच अशा मनुष्याचा जन्म व्यर्थ समजावा. कारण आळशी माणूस फक्त बसून इतरांना निंदनीय ठरवतो.
सर्व महापुरुषांनी आळसाची निंदा केली आहे. दक्षिण भारतातील थोर संत तिरूवल्लुवर म्हणतात, दीपमाळ कितीही उंच असली तरी आळसामुळे तिचा प्रकाश हा निस्तेज असतो. स्वामी रामतीर्थ यांच्या मते, आळस हा माणसाला जिवंतपणीच मरण यातना देतो.
आळसाचे दुष्परिणा फक्त विद्यार्थी जीवनातच नाही तर जीवनाच्या अंतापर्यंत भोगावे लागतात हे कटू सत्य आहे, आळसामुळे दारिद्र्य येते. एवढं सगळं होऊनही आपण आळस झटकून त्याला कायमचे दूर करत नाही,
तर याच्या दुष्परिणामांसाठी आपणच जबाबदार असणार आहोत. आळशी माणूस खुप कमी विद्या म्हणजे खुप कमी ज्ञान गृहन करतो. आणि ज्याला विद्या नसते त्याला खूप कमी धन मिळतं.
आणि ज्याला कमी धन मिळतं त्याला खूप कमी मित्र मिळतात.ज्या माणसाला मित्र कमी मिळतात, त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते.आणि खूप कष्टाने सुखाची प्राप्ती होते. त्यामुळे या आळशी पणामुळे आपल्या आयुष्यात खुप मोठे नुकसान होते.
आळस हे कोणतही आजार नाही पण लक्षण आहे. आळशी पणामुळे आपल्या आयुष्यात काही मोठी ध्येय साध्य करता येत नाही. हाच आळशी पणा दूर करण्यासाठी पाच सोपे मार्ग आहेत.
आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मोठे लक्ष्य ठेवा: माणसे आळशी का बनतात? कारण त्यांच्या आयुष्यात काहितरी मोठे करण्यासाठी ध्येयच नसतात. ध्येय हीन मनुष्याची स्थिती ही त्या कुत्र्या समान असते, जो कोणतीही गाडी आली की तो कुत्रा त्या गाडी बरोबर दम लागे पर्यंत पळतो.
मग शांतपणे बसून राहतो. परत काही वेळा नंतर दुसरी गाडी आली की त्या गाडी मागे पळतो. तो कुत्रा का पळतो कशामुळे पळतो हे त्याला सुद्धा माहित नसते. ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय नसतात त्या माणसाबरोबर सुद्धा असेच चालू असते.
त्याला जर कोणी प्रश्न विचारला की, तू का जगतो? तो उत्तर देईल सगळे जगतात, म्हणून मी जगतो. लक्षात ठेवा माणूस सुस्त आणि आळशी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात काही मोठे ध्येय नसतात, मोठे लक्ष्य नसतात जे त्यांना काम करण्यासाठी प्रेरीत करतील.
पौष्टिक अन्न खाणे, तुम्ही जर तळलेले, मसालेदार पदार्थ खात असाल किंवा जंक फूड जसं की नुडल्स, बर्गर , पिझ्झा असे अन्न खात असाल तर तुमची इच्छा नसतांना सुद्धा आळस येईल. कधीतरी मज्जा म्हणून हे खाणे ठीक आहे,
पण अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन सातत्याने होत असेल तर मग तुम्ही सुस्त व्हाल. म्हणून आळस घालवण्यासाठी तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, फळं, डरा्यफ्रूट्स या गोष्टींवर तुम्ही भर दिला तर तुम्ही नेहमी उत्साही आणि उर्जेनी भरलेले रहाल.
तुम्हाला आळस घालवायचा असेल तर रोज सकाळी तुम्हाला दिवसभरात काय काय करायचे आहे याची यादी बनवा. म्हणजे एक प्रकारे दिवसभरात तुम्हाला काय करायचे आहे याची स्पष्टता येईल.
यादी मधे भरमसाठ गोष्टी टाकत बसू नका. पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या केल्याच पाहिजेत अशा पाच ते सहा गोष्टी यादीत लिहा. आणि मग एक-एक करून ते काम पूर्ण करा.
लक्षात ठेवा बनवलेल्या यादी मधील (90%) नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कामे तुम्ही झोपायच्या आधी पूर्ण झालेली असली पाहिजे. अशे केल्याने तुमचा मेंदू सतत ऑक्टिव्ह राहिल.
तुम्ही हुशार आणि ध्येयशाली लोकांच्या संगतीत रहाल तर तुम्ही आळशी राहुच शकत नाही. लहान मुलं असतात ती सकाळी उठायला कंटाळा करतात, पण तुम्ही जर त्यांना हॉस्टेलला टाकले तर बरोबर ते सकाळी लवकर उठतात,
या कारण हॉस्टेल मध्ये मिळालेली संगत. असे म्हणतात ” जशी तुमची संगत, तशी आपल्या जीवनाला रंगत”. तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफीस मध्ये पण अशा लोकांच्या संगतीत रहा जे प्रामाणिक आहेत
आणि ज्यांना आयुष्यात काही मोठे करायचे आहे. त्यांच्या बरोबर राहून तुम्ही सुद्धा त्यांच्या सारखे होण्याचा प्रयत्न कराल. मग आळस तुम्हाला घालवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत रहा.
काही लोक अशे उत्साही असतात की त्यांनी एखादा प्रेरक व्हिडिओ पाहिला, एखादे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले की त्यांना खूप उत्साह येतो. ते रोज सकाळी आठ वाजता उठत असतील तर ते ठरवतात
दुसऱ्या दिवशीपासून ते एकदम पहाटे पाच वाजता उठनार. दुसऱ्या दिवशी उठतात तर खरे पाच वाजता पण परत तिसऱ्या दिवशी ‘जैसे थे’. म्हणजे ‘पहिले पाढे पंचावन्न’. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही नवीन बदल घडवून आणायचा असेल तर तो हळूहळू करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments