नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सर्वपित्री अमावस्याला पितरांना निरोप देताना करा ह्या ग्रंथाचा 1 पाठ, गितेचा हा 1 अध्याय आवर्जून वाचा..
आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो, मनोभावे प्रार्थना करतो. पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते.
काही तरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीए असे आपल्याला वाटत राहते.
तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात. आपल्याला पूजेचे फळ हे मिळतेच परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात.
आपण अश्या काही 3 गोष्टी सांगणार आहेत ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजनामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच. ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल
व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल. जर तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरु केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा.
मित्रांनो दररोज संध्यकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी 7.30 वाजता किंवा संध्यकाळीची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावि.
स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्याचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज 3 अध्यायन वाचावेत. कारण त्यात 21 अध्यायने असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायने होतील व पुढील आठव्यात पुन्हा नव्याने सुरु करू शकाल.
हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे.
आपण जिथे देवघरात बसतो
त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथ दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मानाने करू शकाल. तसेच एका ग्लास मध्ये पाणी ठेवावे
आणि आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे. तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावी.अश्या प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी.
आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून आपण दररोजच्या सेवेमध्ये ह्या 3 गोष्टी नक्की करा तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील.
एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता.
त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल.
संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल ? संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला
आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा.
एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली ?
लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही. यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो.
तेव्हा संत म्हणाले खरं आहे, ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात.
त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही.
पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत.
आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे.
त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.
आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे.
साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. स्वामींचा हा उपदेश नेहमी आचरणात आणल्यास कोणताच राग राहणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments