नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास तसेच तुम्हाला काही अडचण असेल किंवा आपले कामात सतत अडथळा निर्माण होत असेल आणि ते महत्वाचे काम निर्विघ्न पूर्ण करायचे असेल. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ याचा 1 अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे.
ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. कारण अक्कलकोट निवासी, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात. याशिवाय, स्वामी म्हणतात की, ज्या व्यक्तीमध्ये हे सात गुण असतील तर त्यांना जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळेल.
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला याच गोष्टींचा विसर पडला आहे. आपल्या आयुष्यात असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी आपण भविष्याची काळजी करत बसतो आणि मग त्या काळजीमधे आयुष्य कधी निघून जाते याचा थांगपत्ता देखिल लागत नाही.
काही लोकांना तर ठाऊक देखिल नसते, की आपल्या जवळ जे आहे ते किती अनमोल आहे. अशा गोष्टी ज्या पैशाच्या बाजारात विकत मिळत नाहीत. ज्यांच्याजवळ पैसे असून देखिल त्यांना मिळू शकत नाहीत. आज तशाच काही गोष्टींवर आपण नजर टाकणार आहोत:
1.दयाळूपणा : कोणाच्या आयुष्यात काय चालू असेल हे आपल्याला माहीत नाही, आणि ते जाणून घेणे गरजेचे आहेच असे नाही. गरजेचे आहे ते, हे की कोणत्याही व्यक्तीशी बोलताना, वागताना प्रेमाने वागलो, तर आपण बोललेले चार प्रेमाचे शब्द त्या व्यक्तीसाठी कदाचित खूप महत्वाचे असू शकतात.
कदाचित तुम्ही दाखवलेल्या दयाळूपणामुळे त्या व्यक्तीचा विश्वास बसेल की, सगळेच लोक वाईट नसतात किंव्हा त्याच्या आयुष्यात जे काही चालू असेल त्यातून त्याला थोडा धीर मिळेल. आपण एखाद्या व्यक्तीवर, दाखवलेला दयाळूपणा ही कदाचित आपल्यासाठी मोठी गोष्ट नसेल, मात्र त्या व्यक्तीला तो प्रसंग नेहमी लक्षात राहील.
2. लक्ष केंद्रित करणे : कदाचित खूप लोकांना हे ठाऊक नसेल, पण जर तुम्ही असे ठरवले की ‘पुढच्या सहा महिन्यांसाठी मी या एका विशिष्ठ गोष्टीवरच माझे लक्ष केंद्रित करेन’ तर तुम्ही खूप कमी वेळात खूप काही साध्य करू शकता.
अशी एखादी गोष्ट जी खूप महत्वाची आहे मात्र त्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण जात आहे, असे होत असेल तर हे नक्की करून पहा. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा आपल्या व्यवसायाच्या बाबतीत, किंवा मग ते आपले करिअर असो.
3. नवीन अनुभव: जेव्हा आपण एखादा नवीन अनुभव घेत असतो, तेव्हा थोडी भीती वाटणं सहाजिकच आहे. मात्र त्या भीतीवर मात करून तो अनुभव घेतल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे देखिल कठीण आहे.
अनुभव हा माणसाला काही ना काही शिकवत असतो. जुना किंवा नवीन त्यामधून जे शिकायला मिळते ते घ्यायचे आणि पुढे चालत राहायचे. आपण घेतलेला नवीन अनुभव हा आयुष्यात पहिल्यांदा येत असतो, ती पहिली वेळ एकदाच येते ती पुन्हा येणार नाही.
4. गुंतवणूक : पैसे कमावणे, आणि पैसा असणे इतकेच पुरेसे नाही. जर आपल्याकडे पैसे असेच राहिले तर त्यांची वाढ होणार नाही, उलट ते संपून जातील. त्यासाठी योग्य गुंतवणूक गरजेची आहे.
खूप लोकांना गुंतवणुकीबाबत फारसे ठाऊक नसते, अशा वेळी महिन्याला 1000/- किंवा 5000/- इतके गुंतवावे, या छोट्या गुंतवणुकीचा देखिल भविष्यात फायदा होऊ शकतो.
आपल्याला महिन्याला मिळणारा पगार किंवा महिन्याला आपल्याला जितके पैसे मिळतात त्याचा अगदीच छोटा भाग हा गुंतवणुकीसाठी ठेवावा, या छोट्या भागाचा अडचणीच्या वेळी उपयोग होऊ शकतो.
5. हसणे: असे म्हणतात की, हसल्याने आयुष्य वाढते असे म्हणतात, पण कधी – कधी आपल्याला देखिल आठवत नाही की आपण शेवटचं मनमोकळे पणाने कधी हसलो होतो. आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतकी महत्वाची गोष्ट देखिल आपण विसरून जातो.
हास्य, आपला मानसिक आणि शारीरिक ताण कमी करायला मदत करते. हसल्याने मन प्रसन्न राहते, आणि त्यामुळे आपली मनःस्थिती देखिल स्थिर राहायला मदत होते.
6. निस्वार्थी भावना : कोणतीही अपेक्षा न ठेवता एखाद्याला मदत करा. आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ आपल्याला नक्की मिळते. कोणत्यातरी हेतूने केलेली मदत, मदत नसते तो आपला स्वार्थीपणा असतो.
आपल्याला त्या गोष्टीचे चांगले फळ मिळेल अशी अपेक्षा ठेऊन लोक मदत करतात. आपण कोणाला तरी मदत केली आहे, या गोष्टीबद्दल आपल्याला चांगले वाटावे म्हणून देखिल लोक मदत करतात. मात्र कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी भावनेने केलेली मदतच मनाला शांती देऊन जाते.
7. प्रामाणिकपणा : हल्ली प्रामाणिकपणा तर जसा लोप पावत चालला आहे. या बाबतीत होते असे की, ‘कोणी प्रामाणिक नाही तर मी तरी का राहू?’ किंवा जर कोणी प्रामाणिक असेल, तर त्या व्यक्तीला देखिल ते काम प्रामाणिकपणे करण्यापासून मागे खेचले जाते.
प्रामाणिकपणा हा गुणधर्म असणे म्हणजे चूक आहे असे वाटू लागते. चांगल्या वृत्तीचे लोक आपल्या भोवती असणे गरजेचे नसेलही, मात्र आपल्या अंगी चांगले गुणधर्म असणे खूप गरजेचे आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments