नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी होय.याशिवाय महिन्यात किमान दोन एकादशी असतात, आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी अशा दोन एकादशी या महिन्यात असतात.
हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येत असतात. यालाच आषाढी वारी असेही म्हणतात.
ते असंख्य भाविक पूर्ण श्रद्धेने चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची,पालखीचे प्रस्थान होत असते.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी म्हणजेच देवशयनी एकादशी यावेळी 10 जुलै 2022 रोजी आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, एकादशीची तारीख 9 जुलै रोजी दुपारी 4:40 वाजता सुरू होईल आणि 10 जुलै रोजी दुपारी 2.14 पर्यंत चालू राहील.
10 जुलै रोजी एकादशी व्रत पाळण्यात येणार आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करून हातात पाणी घेऊन व्रत करावे.
यानंतर मंदिरातील आसनावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची स्थापना करा. लक्षात ठेवा की पिवळ्या रंगाचे कपडे सीटवर पसरले पाहिजेत. यानंतर भगवान विष्णूला चंदनाचा तिलक लावा, फुलांची माळ अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा.
एकादशीच्या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे या आषाढी एकादशीचे खूप महत्व मानले जाते.कारण पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत.
म्हणून या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते,असे सांगितले जाते.म्हणून एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे.हिंदू शास्त्रांमध्ये या दिवशी करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत.
त्यापैकीच पहिला उपाय म्हणजे एकादशीला श्रीहरी विष्णू यांना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक केल्याने,आपल्या मनातील सर्व मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करत असतात.
तसेच या एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्म-मुहूर्तावर उठून स्नान करून गायत्री मंत्राचा केल्याने ,माता देवी लक्ष्मीसह विष्णू देवाची कृपादृष्टी आपल्यावर होत असते.
याशिवाय एकादशीच्या दिवशी विष्णू भगवंतांच्या मंदिरात खीर किंवा पांढरी मिठाई प्रसाद म्हणून ठेवावा.
यामुळे आपले पैशांमध्ये बरकत येते.पण हा नैवेद्द अर्पण करत असताना त्यात तुळशीची काही पाने ठेवून मगच नैवेद्य अर्पण करावा.त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात.
तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील काहीं कामात सतत अडचणी येत असल्यास, काही अडथळे जर कामात येत असते तर या एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूयांना एक नारळ आणि बदाम अर्पण केल्यास या कामातील, सर्व प्रकारचे अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल.
त्यामुळे परिणामी सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. याशिवाय एकादशीच्या दिवशी पिवळी वस्त्र धारण करून पिवळी फळे,पिवळे फुल आणि पिवळी वस्त्र भगवान विष्णूना अर्पण करून , गरजू व्यक्तींना वाटाव्यात ,यामुळे श्रीहरी विष्णू ची कृपा होते.
तसेच एकादशीच्या दिवशी संध्याकाळी माता तुळशीसमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून ‘ओम वासुदेवाय नमः”हा पवित्र मंत्राचा उच्चार करत, माता तुळशीला 11 प्रदक्षिणा घातल्या पाहिजे.
यामुळे आपल्या घरात सुख व शांतता राहते तसेच येणाऱ्या संकटांपासून आपले तसेच संरक्षण होत असते. यासह आपल्या घरात दक्षिणावर्ती शंख असल्यास,त्यामध्ये पाणी भरून त्या पाण्याने एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी अभिषेक केल्याने आपल्याला धनवृद्धी होत असते.
त्यामुळे आपण या एकादशीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर यापैकी कोणत्याही एक उपाय केल्यास ,नक्कीच फलप्राप्ती होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments