नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 7 ऑक्टोबर, मोठा शनिवारी पितृदोष कमी करण्यासाठी करा उपाय..
भाद्रपद महिन्याची पौर्णिमा येत आहे.तसेच या दिवसापासूनच पितृपक्ष आरंभ होत आहे. एकूण 16 दिवस असणार आहे. त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान तसेच श्राद्धकर्म केले जाते.
आपल्या घरातील जे पूर्वज ज्या तिथीला मृत्यू पावले असतील, त्या तिथीला श्राद्ध केले पाहिजे. त्यामुळे मानले जाते की, पितृ व देवता प्रसन्न होतात.याशिवाय असे म्हणतात की, देवपूजा करण्याआधी नेहमी व्यक्तीने आपल्या पूर्वजांचे स्मरण केले पाहिजे.
तसेच शास्त्रानुसार मानले जाते की, जर व्यक्तीचा मृत्यू पश्चात विधीपूर्वक श्राद्धकर्म न केल्यास ,त्या पित्रास मुक्ती मिळत नाही,मग त्यामुळे कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
पितृदोषमुळे संतान सुख प्राप्ती होत नाही, तसेच वंशवृद्धी होत नाही. पैसा टिकत नाही आणि कुटुंबामध्ये अशांती येते अशा प्रकारच्या अनेक समस्या कुटुंबामध्ये येतात. याशिवाय आकस्मिक आजारपण अशा प्रकारच्या अनेक समस्यांनी व्यक्ती त्रस्त होतो.
त्यामुळे पूर्वजांची विधी दर्पण श्राद्धकर्म होणे गरजेचे आहे. तसेच या दिवसांमध्ये मानले जाते की, पित्र आपल्या परिवारांना आशीर्वाद देण्यासाठी वेगळ्या रूपात भूतलावर येतात, त्यामुळे या दरम्यान आपल्या घरी आलेल्या कोणत्याही पशुपक्षी किंवा मनुष्य या रिकाम्या हाताने अथवा उपाशी पाठवू नये.
आपण श्राद्धकर्म करण्यापूर्वी आपण स्नानकर्म करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे.मग दुपारच्या प्रहरी पितरांचे श्राद्ध करावे त्यासाठी उषाच्या घासाची अंगती हातामध्ये घालून,पूजा करावी. श्राद्ध कर्म करण्यासाठी,भाताचे गोळे बनवून त्यामध्ये तीळ एकत्र करून ते पिंडदान करायचे आहे.
मग यानंतर पितृपक्ष जोपर्यंत आहेतोपर्यंत रोज कावळ्यांना अन्न खाऊ घालावे तसेच सर्व शक्य असल्यास, ब्राह्मणांनाही भोजन दान करावे. मग त्या दिवशी गरजवंत भोजन द्यावे
आणि वृद्धाश्रमांमध्ये देखील आपण भोजन देऊ शकता .मात्र हे भोजन बनवताना ते भोजन कुटुंबातील व्यक्तीनी स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालायची आहे की, जे आपल्या पित्रांना अत्यंत प्रिय आहे.
त्यामुळे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर त्या दिवशी वस्त्राचे दान ही करावे. अशा प्रकारे आपण श्राद्धकर्म संपन्न करावे, त्यामुळे तुमची पितृदोषाचे नष्ट होतात.
याशिवाय तुमच्या कुंडलीमध्ये पितृ दोष असेल, तर या पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेस पित्राचा फोटो लावायचा आहे आणि लक्षात ठेवा की,हा फोटो भिंतीवर लटकवायचं नाही.
त्यासाठी एक पट्टी लावून त्यावर तो फोटो ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी दिवा लावला येईल,अशी व्यवस्था करायची आहे. तसेच तुळशीची माळ घालू शकता,त्यामुळे हळूहळू तुमच्या कुंडलीतील पितृदोष कमी होऊ लागतील.
या संपूर्ण पितृपक्षामध्ये सर्वांनी पित्रांच्या नावाची धूप द्यावी, त्यासाठी शेनाचे किंवा गौरीचे तुकडे घेऊन,त्यावर तूप टाकावे व गूळ ठेवून त्या गौर्या पेटवायचे आहेत आणि सायंकाळच्या वेळी घरामध्ये कापूर पेटवावा, यामुळेही पितृदोष निवारण होतो.
त्यांच्या घराजवळ पिंपळ किंवा वडाचे झाड असेल, पितृपक्षामध्ये या झाडांची विशेष पूजा करावी. हे पूजन दुपारच्या वेळी करायचे आहे.त्याना काळी तीळ अर्पण करायचे आहेत.
त्याचबरोबर घरातील प्रत्येक सदस्याकडून दहा रुपयाचा शिक्का मंदिर जाऊन दान करायचा आहे. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूच्या कितीवर घरी पूजाकर्म नक्की करावे.
त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये भगवद्गीता तसेच गरुड पुराण वाचन केले पाहिजे, याशिवाय पितरांच्या मुक्तीसाठी गजेंद्रमोक्षचे नक्की केले पाहिजे. जोपर्यंत पितृपक्ष सुरू आहे, तोपर्यंत दररोज पितरांच्या नावाने एक पोळी गाईसाठी बाजूला काढून ठेवायची आहे.
त्या पोळीवर गूळ किंवा भाजी काहीही ठेवून ती पोळी पितृदोषात गाईला दुपारच्या वेळी खाऊन घ्यालावी.
हे आपल्यालाही दुपारच्या वेळेस करायचं आहे. तसेच या पितृपक्षामध्ये सायंकाळच्या वेळी दक्षिण दिशेला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तसेच एक पाण्याचा तांब्या ठेवायचे आहे.
फक्त 16 दिवस हे आपल्याला हा उपाय करायचे आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील तुमच्या कुंडलीतील हे पितृदोष समाप्त होतील. तसेच या पित्रूपक्षाच्या दरम्यान कधीही कोणतेही चुकीचे कृत्य करू नये,तसेच क्रोध करू नये.
कोणाबद्दल वाईट चिंतू कोणाबद्दल वाईट बोलू नये.तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दरम्यान शुभ कार्य करायचे आहे, त्यामध्ये मग वाहन खरेदी किंवा कपडे खरेदी तसेच कोणतेही सामान खरेदी यादरम्यान करायचं नाही.
तसेच मांसाहार सेवन टाळले पाहिजे, नाहीतर यामुळे तुमची श्राद्धकर्म व्यर्थ जाईल व तुमची पितृदोष निवारण होणार नाही.
पितृपक्षामध्ये जो व्यक्ती श्राद्धकर्म आहे, त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. तसेच पितृपक्षामध्ये काही पदार्थाचे सेवन आपल्याला टाळायचे आहे. त्यामध्ये हरभरे, डाळ तसेच वांगे ,काळी मिरी इत्यादी जे सेवन या दरम्यान आपल्याला करायचे नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments