नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशजींचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून दरवर्षी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो.
गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यामुळे घरोघरी गणरायाचा स्वागताची जोरदार तयारी झाली आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बुधवारी 31 ऑगस्ट मोठ्या जल्लोषात गणपतीचे वाजतगाजत स्वागत होणार आहे.
देशभरामध्ये गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास असतो. गणपतीसोबत त्यांचे वाहक म्हणजे उंदीर मामाला विशेष महत्त्वं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदराचे दर्शन हे काही वेळा शुभ आणि अशुभ संकेत देतात.
गणेश चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी 03.33 पासून होत आहे. जो 31 ऑगस्ट रोजी दुपारी 03.31 पर्यंत राहील.या दिवशी घरामध्ये गणेशमूर्तीची स्थापना केली जाते.
गणपती बाप्पा यांचे वाहन उंदीर आहे. उंदीर सामान्यतः घरांमध्ये आढळतात. प्रत्येकाला उंदरापासून मुक्ती मिळवायची आहे. कारण अनेक वेळा ते घरात ठेवलेल्या वस्तूंचेही नुकसान करतात,
त्यामुळे घरात उंदीर दिसावे असे कोणालाच वाटत नाही. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर जाणून घ्या तो काय सूचित करते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर त्याला मारण्याची चूक करू नका. त्यापेक्षा पळवण्याचा प्रयत्न करा. भगवान गणेशाला बुद्धीची देवता मानले जाते आणि तो उंदरावर स्वारी करत असतात.
अशा स्थितीत उंदीर दिसला की घरात राहणाऱ्या सदस्यांची बुद्धी भ्रष्ट होत असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार उंदीर घरात नकारात्मक ऊर्जा आणतो. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात उंदीर दिसणे अशुभ लक्षण मानले जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर तो शुभ संकेत देतो. ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की उंदीर घरातून गरीबी घेऊन सुख-समृद्धी सोडून जातो.
सकाळी उठल्याबरोबर जर तुम्हाला उंदीर दिसला तर समजा तुमचे काही काम बिघडणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही चिन्हे अशुभ मानली जातात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर घराबाहेर जाताना दिसला तर ते शुभ चिन्ह आहे. म्हणजे उंदीर तुमच्या घरातील सर्व गरिबी आणि संकटे काढून घेत आहे. यानंतर घरात सुख-समृद्धी नांदेल, असं ज्योतिषशास्त्रात सांगणात आलं आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचा उंदीर दिसला तर हे शुभ संकेत आहे. पांढरा उंदीर सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो आणि त्याचं दिसणं म्हणजे तुमच्या घरातील सर्व संकटं नाहीशी होणार.
गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला तर चुकूनही मारू नये असे ज्योतिषशास्त्राचं मत आहे. उंदीर घरात नकारात्मकता आणतो आणि घरातील सदस्यांची बुद्धी भ्रष्ट करतो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसल्यावर त्याला मारू नका, तर पळवण्याचा प्रयत्न करा.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर उंदीर दिसला तर ते अशुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की तुमचं महत्त्वाचं काम बिघडणार आहे आणि तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments