नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री सदगुरु संत देवअवतारी बाळुमामाच्या नावानं चांगभलं, असाच एक अनुभव रुकडीमध्ये अनुभवण्यात आला. तर एकदा बाळूमामा रुकडीत लक्ष्मीबाईच्या घरी आले होते, त्यावेळी संत-महात्मे घरी आले या भावनेने आणि कुटुंबीयांनी पुरणपोळीचा बेत आखला.
त्यावेळी सायंकाळची वेळ होती. पोळीला दूध घ्यावे लागते, बाळूमामाना म्हणाले की, आज बिन पाणी घातलेले दूध आन. त्यावेळी भाऊ लंगरे गवळ्याला अगदी बजावून सांगितलं की,
आज बिन पाण्याचे दूध हवे आहे आणि आपली दुधाची घागर घेऊन आले घरी आल्यावर मामानी दुधात पाणी आहे का? असा प्रश्न विचारला.
त्यावर गवळी म्हणाला की, मामा या दुधात एक थेंबही पाणी नाही. त्याक्षणी मामानी घागरीवर आपला भांडरा टाकला आणि त्या क्षणी चमत्कार घडला आणि गवळ्याने घातलेले पाणी एका घागरीच्या तळात बसल.
तसेच अस्सल दूध वर राहिले. तर भांड्यात ओतून पाहतात दूध प्रथम वेगळे आले तळाशी पाणी अलग तळाला बाकी राहिले. त्यावर मामा गवळ्याला म्हणाले की, माणसानं माणसाला देतानाही दुधात पाणी घालू नये.
आणि तू तर देवांला आणि भक्ताना दुधात पाणी मिसळून देतो. आता प्रत्यक्ष दिलेस तुला या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागणार आहे.
यानंतर एक महिना संपण्यापूर्वीच तो गवळी मरण पावला. वरील घटनेनंतर रूकडी, मानगाव, वडगाव, टोपसंभापुर आणि आसपासची अनेक गावे बाळूमामा अतिशय निष्ठेने मानू लागली आणि त्यांची सेवा करू लागली.
बापू शिंगारे यांच्या बहिणीच्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला होता. बाळू मामांना शिनगारे यांनी हात जोडून कळकळीची विनंती केली. बाळू कावडे माझे मेहुणी आहे, माझ्या बहिणीचा संसार विस्कळीत होण्याची आलेली आहे.
आपण कृपा करावी, आम्हाला तुमच्या शिवाय कुणाचा आधार नाही. तरी आता कृपा करा क्षमा करा. मामांनी कृपावंत होऊन त्यास भंडारा खाण्यास दिला आणि बाळू गावडे यांचा कुष्ठ रोग पूर्णपणे बरा झाला.
सर्वांना आनंद झाला आणि मामाचे नाव सर्वत्र पसरलेलं वाढतच राहिलं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं..
आदमापूर येथे सदगुरू संत बाळूमामा यांच्या समाधीमंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो. हात-पाय धुतो, प्रशस्त सभामंडपात येतो.
मंडपाचे रंगकाम, येथील दीपयोजना, टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणा-या ठसठशीत ओव्या पहात रमतो. एवढ्यात त्याची नजर समोरील गाभा-यात जाते.
पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सदगुरू परमहंस मुळे महाराज,
गारगोटी यांची मुर्ती आहे. मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल-रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे.
गाभा-यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे. त्यावर पादुका आहेत. जवळ खडावाही पुजलेल्या आहेत.
समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत. गाभा-यात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे.
माहिती आवडल्यास लाईक आणि लेख जास्तीत जास्त शेअर करा..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments