पिवळे दात होतील मोत्यासारखे पांढरे, ‘हे’ घरगुती उपाय एकदा करून तरी बघा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,जर आपले दात चमकदार आणि पांढरे असतील तर आपण मनमोकळे हसू शकता आणि जर पिवळे दात झाले तर लोकांना हसणे अवघड होते. परंतु, काही घरगुती टिप्स अवलंबून दातातील पिवळसरपणा काढून टाकू शकतो.

त्यामुळे पिवळे दात कोणालाही आवडत नाहीत. दातांचा पिवळेपणा काढण्यासाठी आपण डेंटीस्टकडे जातो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्स आणि पेस्टचा आधार घेतो.

मात्र, यातील रसायनांनमुळे आपल्या दातांची हानी देखील होऊ शकते. अशावेळी दातांचा हा पिवळेपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता.

आपण दात स्वच्छ करण्यासाठी नारळ तेल वापरू शकता. पाच मिनिटांसाठी पिवळ्या दातांवर नारळाचे लावा. या व्यतिरिक्त आपण आपल्या टूथब्रशमध्ये काही थेंब नारळाचे तेल टाका आणि ब्रश करा.

यानंतर तोंड धुवा. हे जर आपण दररोज केले तर लवकरच आपल्या दातांवरील पिवळेपणा दूर होईल.लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात.

आणि लिंबाच्या सालामुळे आपले दात स्वच्छ होऊ शकतात. आपल्या दातांवर लिंबाची साल चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. तसेच लिंबाच्या सालीचे पावडर तयार करा आणि दातांवर लावा. यामुळे देखील दातांचा पिवळेपणा दूर होईल.

स्ट्रॉबेरी दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, कारण त्यात बरेच फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स आहेत.

यामुळे दात पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते. तसेच बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण तयार करुन, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवा. ही पेस्ट टूथब्रशवर घेऊन, त्याने नेहमीप्रमाणे दात घासा. यामुळे केवळ काही मिनिटांतच आपले दात मोत्यासारखे चमकदार होतील.

याशिवाय, केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. हे घटक ब्लिचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते.

म्हणून केळी खाल्ल्यानंतर त्याची साल न फेकता, ती साल आपण आपल्या दातांवर घासू शकता. आठवड्यातून किमान 2 वेळा हा उपाय केल्यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.

याचबरोबर, ऑईल पुलिंग किंवा तेलाने गुळणा करणे हा एक पारंपारिक भारतीय उपाय आहे ज्यामुळे ओरल हायजीन अर्थात तोंडाची स्वच्छता केली जाऊ शकते. असे केल्याने शरिरातील टॉक्सिन बाहेर पडतात.

या कामासाठी थोडेसे तेल घेऊन तोंडाच्या आतुन चारही बाजूने फिरवणे. यामुळे तोंडामध्ये आणि दातामध्ये प्लाकमुळे जमा होणारे जंतू तोंडाबाहेर फ़ेकले जातात. हे बॅक्टेरीया दात पिवळे दिसण्याचे कारण असतात.

भारतीय लोक वर्षानुवर्षे तोंडाच्या स्वच्छतेसाठी सूर्यफुलाचे तेल किंवा तीळाचे तेल वापरत आहेत. परंतु आपण कोणतेही तेल वापरू शकता. बर्‍याच लोकांना नारळाचे तेल खूप आवडते. कारण त्याची चव आणि सुगंध खूप चांगला आहे आणि आरोग्यासाठी बरेच फायदे देखील देते.

या व्यतिरिक्त, नारळ तेलामध्ये लॉरिक अ‍ॅसिड आहे, जे व्यक्तीची चिडचिड कमी करण्यासाठी आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी त्याच्या गुणधर्मांकरिता ओळखले जाते. काही अभ्यासांनी असे सिद्ध केले आहे की, दररोज तेलाने गुळणा केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते.

यासह, प्लाक आणि जिंजिवाइटिसची समस्या देखील दूर झाली आहे.

स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्स हे प्राथमिक जीवाणू आहेत ज्यामुळे तोंडात प्लाक आणि हिरड्यांना सूज येते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की दररोज तीळाच्या तेलाने गुळणा केल्याने फक्त एका आठवड्यात लाळेत स्ट्रेप्टोकोकस म्यूटन्सचे प्रमाण कमी होऊ लागते.

दुर्दैवाने कोणताही शास्त्रीय संशोधनातून आजवर शास्त्रज्ञ हे सिद्ध करु शकले नाहीयेत कि तेलाच्या गुळण्या केल्याने दातांचा पिवळटपणा जाऊन दात पांढरे होतात. असं जरी असले तरी हा एक पुर्णपणे सुरक्षित उपाय आहे.

जो दैनंदिन आयुष्यात वापरुन बघायला हरकत नाही. परंतु, बरेच लोक सांगतात, कि तेलाने नियमितपणे गुळणा केल्यामुळे दात पहिल्यापेक्षा जास्त पांढरे दिसू लागतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!