नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 30 ऑगस्ट रक्षाबंधन बहीणीने भावाचे औक्षण कसे करावे, ताम्हणामध्ये काय काय घ्यावे..
रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे प्रेमाने जिंकते.त्यामुळे हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा मानला जातो. कारण या दुनियेतील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे नाते निस्वार्थी आणि पवित्र असते.
हिंदु धर्मातील, भावा बहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन होय.यावर्षी हा राखी पौर्णिमेचा उत्सव 22 ऑगस्टला आला आहे.या वर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग जुळून आल्यामुळे,
यावर्षी रक्षाबंधनचा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असणार आहे,यावेळी श्रवण नक्षत्राच्या योग संपूर्ण दिवस असणार आहे.
या रक्षाबंधनच्या दिवशी, बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याला दीर्घायुष्य मिळावे तसेच समृद्धी व आनंद सुख समाधान मिळावे ,म्हणून प्रार्थना करीत असते,तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.
या वर्षी रक्षाबंधनचा उत्सव 30 ऑगस्टला साजरा केला जाईल, रक्षाबंधनचा उत्सव दर वर्षी श्रावण महिना त्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो.
त्यामुळे हिंदू धर्मात राखी पौर्णिमेचे खूपच महत्त्व आहे, हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीत मुहूर्ताचे खूपच महत्त्व असते,म्हणून रक्षाबंधन साजरे करण्यासाठी मुहूर्त पहिला पाहिजे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याला औक्षण करते ,
तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी राखी बांधण्यासाठी, सर्वात आधी ताट तयार करावे,यामध्ये कुंकू,अक्षता आणि राखी ,एक तांब्या नाणे किंवा सोन्याचा दागिना आणि कोणतीही मिठाई घ्यावी.
भावाला पाटावर बसवून,त्याला टिळा लावावा, त्यावर अक्षता लावून थोड्याशा अक्षता टाकाव्यात,मग त्यानंतर भावाच्या डाव्या हाताला राखी बांधून नाण्याने किंवा सोन्याच्या दागिन्यांचे भावाला कपाळाला लावून दृष्ट उतरल्यासारखे फिरवावे.
त्यानंतर औक्षण म्हणजे दिव्याने ओवाळावे आणि आपल्या भावाला मिठाई भरवावी. भावानेही बहिनीला मिठाई भरवावी.
बहिणीला नमस्कार करून, राखी बांधल्यानंतर आपले सामर्थ्य अनुसार बहिणीला भेटवस्तू द्यावी.या पवित्र रक्षाबंधनच्या उत्सवाची सुरूवात कधीपासून झाली,याचाही अनेक कथा सांगितल्या जातात.
ज्यावेळी देव आणि दानवाच्यात भयंकर युद्ध झाले, तेव्हा आपला पराभव होईल या भीतीमुळे देवराज इंद्र खुप भयभीय झाले.
यामुळे ते प्रचंड घाबरून गुरुदेवकडे गेले. तेव्हा गुरुदेव आणि देवराज इंद्र यांचे बोलणे ऐकून देवाची पत्नी सचि दुःखी झाली. त्यानंतर त्यांनी गृहस्पती देवांकडे मदतीची याचना केली,
त्यानंतर गृहस्पती ददेवांनी सचिला एक रक्षासूत्र दिले,आणि त्यांनी ते इंद्रदेवाच्या हातात बांधले. त्यामुळे त्यांचे रक्षण झाले व त्यांचा विजयी झाला, तेव्हापासून हा रक्षाबंधनचा उत्सव साजरा जातो.
दुसरी कथा म्हणजे की, राजसूया यज्ञाच्या वेळी श्रीकृष्ण भगवंतांच्या हाताला जखम झाली,तेव्हा ते धावत धावत सुभद्रयेकडे गेले. पण सुभद्रा कापड इकडेतिकडे शोधू लागली,
यामुळे लगेच श्रीकृष्ण द्रौपदीकडे गेले, तर तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून भगवंतांच्या हातावर पट्टी बांधून बांधला.ही सर्वात पहिली राखी मानली जाते.
या थोड्याशा कपड्याच्या बदल्यात श्रीकृष्णनी द्रौपदीची वस्त्रहरण थांबवले होते.असा या दोन पौराणिक कथा सांगितल्या जातात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments