हिंदू शास्त्रानुसार विवाहित स्त्रीने या असे केस धुतल्यास, लक्ष्मी होईल प्रसन्न, गरिबी दूर होईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, प्राचीन धर्मामध्ये आपल्या जीवनासाठी उपयुक्त अशा अनेक बाबी सांगितलेल्या आहेत. आपल्या धर्मशास्त्रात काही असे कार्य आहे ज्यांना ठराविक दिवशी करणे विशिष्ट मानले गेले आहे.

कारण आपल्या प्रत्येक वाराचे वेगळे महत्त्व आहे. कारण प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी निगडित आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला कल्प म्हटले जाते तर देवी-देवतांचा एक दिवस हा आपल्या एक हजार दिवसान एवढा असतो.

भगवंतांची आयुमर्यादा माणसांच्या आयु पेक्षा जास्त असते. त्याच प्रकारे सृष्टीचे चक्र चालत असते.तसेच आपल्या धर्मात कोणत्या दिवशी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये हे सांगितलेले आहे.

तर आपण या लेखात जाणून घेणार आहोत की स्त्रियांनी कोणत्या दिवशी आपले केस धुवू नये. यामध्ये काही सण-उत्सव ही शामिल आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी केस कापणे शेविंग करणे आणि नखे काढणे हे अत्यंत अशुभ समजले जाते.

असे म्हटले जाते की, असे केल्याने आपल्या मुलाबाळांवर संकटे येतात आपल्या हिंदू पंचांगानुसार आपले सर्व सण तिथीनुसार साजरे केले जातात. ते खूप शुभ असतात म्हणून कोणत्याही सणाच्या एक दिवस अगोदरच केस धुणे शुभ असते.

जर वारांचा विचार केला तर रविवारच्या दिवशी आपण केस धुवू शकता. या दिवशी केस धुण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र रविवारच्या दिवशी आपला उपवास असेल कोणतेही व्रत आपण ठेवले असेल तर मग आपल्याला केस धुता येत नाहीत.

त्यामुळे जर केस धुवायचेच असतील या दिवशी म्हणजे केस धुणे गरजेचेच झाले असेल तर जास्वंदीच्या फुलाचा रस आपण आपल्या केसाला लावावा आणि मग आपण आपले केस धुवू शकता.

तसेच सोमवारचा दिवस सुद्धा केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र जर आपण या दिवशी व्रत, उपवास ठेवला असेल तर मात्र केस धुता येत नाहीत. केस धुणे गरजेचेच झाले असेल तर पलश नावाच्या फुलाचा रस केसांना लावून आपण आपले केस धुवू शकता.

मंगळवारच्या दिवशी मात्र कोणत्याही सुहागिन स्त्रीने अजिबातही केस धुवू नयेत. कारण मंगळवारी केस धुतल्याने आपल्या घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, पैशांची हाणी होते तसेच वैवाहिक जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि म्हणून या दिवशी केस धुवू नयेत.

जर तुम्हाला के धुवायचेच असतील तर आवळ्याचा रस किंवा आवळ्याची जी पेस्ट मिळते तिचा लेप आपल्या केसांना लावू शकता आणि मग आपले केस धुवू शकता.

बुधवारचा दिवस हा केस धुण्याच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो. मात्र काही महिला कि ज्यांना धाकटा भाऊ आहे अशा महिलांनी मात्र बुधवारच्या दिवशी केस धुवू नयेत. कारण या दिवशी केस धुतल्याने तुमच्या धाकट्या भावावर संकटे येऊ शकतात.

जर तुम्हाला या गोष्टीपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही श्री गणेशाला किंवा वरुण देवांना आपला मोठा भाऊ मानू शकता. ज्यावेळी आपल्या घरामध्ये पूजा वगैरे चालू असेल त्यावेळी कलशामध्ये पाणी घेतलं जात.

तर या कलशाला प्रणाम करून आपण वरूनदेवाला विनंती करा कि हे वरुणदेवा आम्ही तुम्हाला आमचा मोठा भाऊ मानत आहोत कृपया आमचं रक्षण करा.

या दिवशी केस धुणे गरजेचेच झाले तर तुळशीच्या पानांचा रस केसांना लावून केस धुवू शकता.

गुरुवारच्या दिवशी स्त्री असो किंवा पुरुष असो कोणीही आंघोळ करताना डोक्यावर पाणी घेऊ नये, किंवा आपले केस धुवू नयेत. याच कारण असं कि गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेतल्याने आपल्या घरातून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते.

या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचच असेल तर हळद आणि बेसन एकत्र करून त्याचा जरासा लेप आपल्या केस धुवू शकता.या दिवशी तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचच असेल तर हळद आणि बेसन एकत्र करून त्याचा जरासा लेप आपल्या केसांना लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता.

शुक्रवारचा दिवस केस धुण्यासाठी अत्यंत शुभ आहे. मात्र ज्या महिलांना पुत्र, मुलगा नाहीये. पुत्र प्राप्तीची इच्छा आहे अशा महिलांनी शुक्रवारच्या दिवशी केस धुणे कटाक्षाने टाळावं.

जर तुमचा या दिवशी व्रत किंवा उपवास आहे तर या दिवशी आपण जरासं दही केसांना लावावं आणि मग आपण आपले केस धुवू शकता. शनिवारच्या दिवशी चुकूनही सुद्धा केस धुवू नयेत.

शनिवार हा शनिदेवांचा वार मानला जातो आणि या दिवशी केस धुतल्याने शनिदेवांचा प्रचंड क्रोध आपल्यावर निर्माण होतो. तर या दोषापासून जर वाचायचं असेल केस धुवायचेच असतील तर जरासं कच्च गाईचं दूध घ्यावं आणि ते थोड केसांना लावावं त्यानंतर आपण आपले केस धुवू शकता.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!