खुप पैसा येण्यासाठी देवघरात ठेवा फक्त हे 1 यंत्र, 7 दिवसांत फरक दिसेल, श्री स्वामी समर्थ….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुमच्या देव घरामध्ये ठेवा हे एक यंत्र, माहिती नसेल तर तुम्ही ही।माहिती शेवटपर्यंत पहा आणि य चमत्कारिक उपायाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील,तुमच्या घरात सुख-समृद्धी, समाधान आरोग्य संपत्ती सर्व काही येऊ लागेल.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रणांमध्ये हे श्रीयंत्र हे यंत्र असे आहे की, या यंत्रामध्ये ब्रह्मांड अनुसार 33 कोटी देवी-देवता यामध्ये वास करतात.

हे यंत्र ललिता देवीच स्थान मानलं जातं. यंत्र हे महालक्ष्मी, सरस्वती, परब्रम्ह विष्णू हे देखील यात वास करतात. त्यामुळे यांची मनोभावे पूजा केल्यास, विश्वातील सर्व देवदेवतांची पूजा केल्याचे पुण्य आणि समृद्धी आपल्याला लाभते व श्रीयंत्र हे अत्यंत प्रभावशाली आहे.

कारण हा श्रीयंत्रच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध बनते. ज्या देवघरात हे श्रीयंत्र असे त्या घरात नेहमी समृद्धी नांदते. श्रीयंत्रामुळे विद्या, शक्ती आणि यश मानसन्मान आणि सुख-समृद्धीचे प्राप्ती होते.

सर्व प्रकारचे भय नाहीसे करण्याचे शक्ती या श्रीयंत्रात आहे. जीवनातील दुःख त्रास, साडेसाती,बाधा आणि संकटातून आपली मुक्तता होते. जीवनात आनंदी प्राप्तीसाठी श्रीयंत्र हे सर्व संकटांपासून मुक्ती करू शकतो. आनंदाची प्राप्ती होते.

याशिवाय, पुढील काही सोपे उपाय तुम्ही करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. यामध्ये छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे.

रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी.

नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.वायव्य दिशेला – राधाकृष्ण , लक्ष्मीचा फोटो लावावा. घरातील सर्व देवांना हळ्कुंडाची माळ घालणे. तसेच रोख रक्कम हातात पडली की, ती घरी आणून देवापुढे ठेवावी.

कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी.

बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.

संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी, सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.

1 दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.

पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.

घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते. ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.

लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच.

मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा.

घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे.

द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ” ॐ नमो विष्ण्वे नम: ” जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णुसहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी.

जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!