चैत्र महिन्यात आपल्या देवीची पूजा कशी करावी ?, कुलदेवीला देवीला नैवेद्य कोणता दाखवा ?, साकडे कसे घालावे ?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल कि चैत्र महिना सुरू आहे? चैत्र महिना अगदी पवित्र पावन महिना मानला जातो आणि कारण ज्या प्रमाणे मार्गशीर्ष आणि ज्याप्रमाणे श्रावण महिना असतो त्याचप्रमाणे चैत्र महिना सुद्धा मानला जातो.

तर चैत्र महिन्यात कोणतीही कुलदेवी असेल तर कुलदेवीचा पाहुणचार आपण आपल्या घरात करायचा असतो. आपल्या घरात देवीची पूजा करायची असते, त्यांना साकडं घालायचे असतं, तसेच त्यांना विशेष नैवेद्य दाखवायचा असतो.

थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आपण चैत्र महिन्यात कोणता दिवस निवडावा?, असा अनेक लोकांना प्रश्न पडत असतो.

तर यावर चैत्र महिन्यात तुम्ही सर्व काही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकतात. कारण मंगळवार बरोबर आणि शुक्रवार सुद्धा देवीचा वार असतो.

तर मंगळवार किंवा शुक्रवार चैत्र महिन्यात आणि हे सर्व काही तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी म्हणजे 11 किंवा 12 वाजेच्या आत तुम्ही हे सर्व काही करू शकता.

आता पूजा कशी करावी?. तर सर्वप्रथम आपण आपल्या देवघरात देवाच्या एक पाठ किंवा चौरंग मांडावा आणि त्यावर सफेद रंगाचा कापड टाकावा.

त्यावर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी आणि फोटो सुद्धा नसेल मूर्ती सुद्धा नसेल तर मग आपल्या घरात जर कुलदेवीचा कळस आपण भरलेला असेल तर तो कळस पाटावर किंवा चौरंगावर ठेवावा आणि कळस तुमच्या देवघरात तुम्ही भरून ठेवत नसाल, तर मग एक नवीन कळस तुम्ही भरायचा आहे आणि तो कळस तुम्ही चौरंगावर ठेवायचा आहे.

मग त्यानंतर मूर्तीचे किंवा फोटोचे किंवा कळस पूजा करायचे आहे. यामध्ये हळदीकुंकू लावून पूजा करा, दिवा लावायचा आणि अगरबत्ती लावायची, ओवाळणी करायची असेल तर देवीची आरती करायची आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य कोणता दाखवायचा.

तर या दिवशी तुम्ही खास पुरणपोळी करू शकतात. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जे ही जेवण कराल, त्यावर तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरू नका…

आता देवीचा पाहुणचार करण्यासाठी, जी आपण मांडणी केलेली आहे त्यासमोरच आपण देवीला भोग लावावेत.

विशेष प्रकारचे भोग तुम्ही छप्पन प्रकारचे भोग तुम्ही लावू शकतात. त्यानंतर देवीची साडीचे ब्लाउज पीस व नारळ गहू तांदूळ ठेवून ओटी तुम्ही भरावी.

मग त्यानंतर देवीची आरती करावी. मग संध्याकाळी एक वेगळा नैवेद्य देवीला दाखवावा.

तर सर्व पूजा झाल्यानंतर देवी समोर बसून हात जोडून नमस्कार करावा आणि हाच जोडूनच देवीकडे मागायचे असेल ते मागायचे असतील त्या बोलायचा आणि अशा रीतीने तुम्ही ती पूजा करायचे आहे.

अशा रीतीने तुम्ही साकडे घालायचा आहे, अशा रीतीने पाहुणचार करायचा आहे अशा रीतीने तुम्ही देवीसमोर नैवेद्य दाखवायचा आहे अशी पूजा दिवसभर आणि रात्रभर तिथेच राहू द्यायचा आहे.

मग दुसऱ्या दिवशी सांगता करून म्हणजे दिवा, अगरबत्ती लावून पुन्हा हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून ती पूजा तिथून उचलून घ्यावी.

मूर्ति देवघरातील देवीच्या जागेवर ठेवावी आणि फोटो असेल, तर फोटो ठेवा। कळस कायमस्वरूपी असेल तर तो सुद्धा देवघरात ठेवावा किंवा कायमस्वरूपी नसेल तर मग तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करावेत आणि  तांब्यातले पाणी तुळशीमध्ये तुम्ही टाकू शकता.

तसेच प्रसाद तुम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर अशा रीतीने माता देवीचा पाहुणचार आणि ओटी या चैत्र महिन्यात तुम्ही नक्की करावी….

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!