25 ऑक्टोबर, सूर्यग्रहण दिवाळी अमावस्या चुकूनही करू नका ही 10 कामे बरबाद व्हाल!

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,यंदा दिवाळीच्या पर्वात 25 ऑक्टोबर मंगळवारी सूर्यग्रहण आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ग्रहण म्हटले कि या काळात काय करावे काय करु नये असा विचार मनात येतो.

यासह अनेकदा गरोदर महिलांना ग्रहण पाहण्यास मनाई केली जाते. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे , या सूर्य ग्रहण कालावधीदरम्यान मूर्तींना स्पर्श करू नये, देवाची पूजा करू नये.

घराची साफ सफाई करू नये. या काळात कोणत्याही नवीन कार्यास प्रारंभ करणे अशुभ मानले जाते. ग्रहण कालावधीत जेवण बनवणे आणि खाणे यांस मनाई आहे. या काळात आंघोळ करणे टाळा.

ग्रहण काळात तुळशीला हात लावण्यास मनाई आहे. तसेच ग्रहण सुरु होण्यापूर्वी खाण्यापिण्याच्या वस्तूंवर तुळशीपत्र ठेवावे. या काळात गर्भवती महिलांनी शिलाई, भरतकाम यांसारखी कामे करू नये.

तसेच घराबाहेरही पडू नये. ग्रहण कालावधी दरम्यान, जोडप्याने शारीरिक संबंध ठेवण्याची चूक करू नये. जोपर्यंत तुमच्या शहरात सूर्यग्रहण दिसत नाही तोपर्यंत गरोदर महिलांनी घराबाहेर पडू नये.

यादरम्यान गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे टाळावा. ग्रहण पाहणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणातून उत्पन्न होणारी अतिनील किरणे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात.

अशा परिस्थितीत घराच्या खिडक्याही बंद ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार, या काळात गर्भवती महिलांनी झोपणे टाळावे. सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.

सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे. ग्रहण काळ हा उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे या काळात घराबाहेर पडायला सांगितले नसले.

तरी घरात आपण आपल्या इष्टदेवतेची मनोभावे उपासना करावी. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी जास्तीत जास्त ध्यान धारणेवर लक्ष केंद्रीत करावे. यासह मेडीटेशनही करु शकता.

ग्रहण काळात ‘भगवत गीता’ यासारख्या मनोबल वाढविणाऱ्या किंवा आपल्या पसंतीच्या पुस्तकांचे जास्तीत जास्त वाचन करावे.

याशिवाय, पुढील काही कामे तुम्ही या कालावधीत करू शकता. ज्यामध्ये ग्रहणादरम्यान, सूर्य देवतेची आराधना उपासना करावी. ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडावे.

ग्रहणानंतर लगेच स्वतः स्नान करा आणि मग देवाच्या मूर्तींची यथायोग्य पूजा करा. ग्रहण संपल्यावर, ताजे अन्न तयार करा आणि तेच खा. ग्रहण संपल्यावर या गोष्टी दान करा.

घरात मालमत्तेवरून विवाद चालले असतील तर, ग्रहण संपल्यावर स्नान करून तीळयुक्त मिठाई दान करावी.

घरात आर्थिक बाबींबद्दल समस्या असतील तर रसयुक्त मिठाई दान करा. घरातील इतर सर्व दुःखांपासून मुक्त होण्यासाठी मुंग्या व मासे यांना ग्रहणानंतर खायला द्यावे.

घरात बऱ्याच कालावधीपासून कोणी आजारी असेल तर, एका तुपाच्या वाटीत चांदीचा चमचा घालून त्यात आपली प्रतिमा पहा आणि ते दान करा.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!