नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असल्यास गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा हा सण सर्वत्र साजरा केला जातो प्रामुख्याने हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक घराघरांमध्ये साजरा करण्यात येतो .
हे आपल्या सर्वांना माहीत असेलच या सणा दिवशी घराच्या दाराला तोरणे बांधून प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभा करण्याची परंपरा आहे.
असे म्हटले जाते की, या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास करून आयोध्या नगरीत परत आले होते. या सणा दिवशी सृष्टीतील सर्व देवी देवतांना पूजनाचा हा दिवस असतो.
गुढीपाडव्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभा केले जाते. याला विजयाचे प्रतीक मानले जाते.
गुढीपाडव्याला नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे खूप सारे लोक गुढीपाडव्या दिवशी अनेक वस्तूंची खरेदी करतात. जसे की सोने चांदी आणि काही लोक गुढीपाडव्याला शुभ दिवस मानतात,
त्यामुळे नवीन व्यवसायाची सुरुवात गुढीपाडव्या दिवशी केली जाते. या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात.
गुढी उभा करण्यासाठी सर्वप्रथम वेळूची काठी स्वच्छ धुऊन घ्यावी व त्यानंतर जी साडी आपण गुढीला नेसवणार आहात त्या साडीच्या व्यवस्थित निऱ्या करून घ्याव्यात त्यानंतर ब्लाऊज पीसच्या पण अशाच प्रकारे निऱ्या करून घ्याव्यात.
व त्यानंतर निऱ्या घातलेली साडी निऱ्या व्यवस्थित धरून वेळूच्या काठीला दोऱ्याच्या साह्याने किंवा धाग्याने व्यवस्थित बांधून घ्याव्यात व त्यानंतर लिंबाच्या झाडाचा फाटा आपण आणला असेल तो या धाग्यामध्ये व्यवस्थित बांधून घ्यावा.
त्यानंतर आंब्याच्या पानाचा फाटा पण व्यवस्थित बांधून घ्यावा त्यानंतर साखरेचा हार पण त्या ठिकाणी बांधून घ्यावा त्यासोबतच फुलाची माळ पण त्या ठिकाणी व्यवस्थित बांधून घ्यावी सगळे व्यवस्थित बांधून झाल्यानंतर त्यावरती जो तांब्याचा कलश असेल तो व्यवस्थित पालथा झाकून घ्यावा लक्षात असू द्या.
कलश घालण्यापूर्वी कलश्यावरती कुंकाचे पाच ठिपके काढावे व स्वास्तिक काढून तो तांब्या पालथा त्या गुढीवरती घालावा व त्यानंतर ज्या जागेवरती तुम्ही गुढी उभा करणार आहात ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी .
त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवावा आणि त्यावरती एक कपडा अंथरून घ्यावा आणि त्यावरती तुम्ही गुढी उभा करू शकता.
त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की, आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, त्यानंतर आर्थिक स्थिती व्यवस्थित करण्यासाठी आणि
आपल्यावरील संकट, समस्या आणि अडचणी दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे की, “ओम गुरुनायकाय नमः”, “ओम गुरुनायकाय नमः”
हा मंत्र आणि गुरूंच्या मंत्र गुरुवारच्या दिवसाचा खास आणि विशेष महत्त्व आहे. याचा जप तुम्ही फक्त 21 वेळेस केला पाहिजे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments