नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदु धर्मात तुळशीला मातेसमान मानले जाते. त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात तुळशी मातेला मानाचे स्थान दिले जाते. कारण शास्त्रानुसार तुळस मंगलतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे.
हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच. त्यामुळे हिंदु धर्मात तुळशीला मातेची नियमितपणे पूजा केली जाते. तसेच रोज सकाळी घरच्या अंगणात असलेल्या तुळशी-वृंदावनात रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात व सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते.
त्यामुळे जर अशा बहुउपयोगी तुळशीची पाने जर आपण रात्री उशीखाली ठेवल्यास त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात.
तुळशीमध्ये अध्यात्मिक तसेच आयुर्वेदिक गुण देखील आहेत. आयुर्वेदामध्ये असंख्य रोगांवर ती औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. कारण तुळशीमधून विद्युत तरंग निघत असतात, जे मनुष्य शरीरासाठी खूपच लाभदायक समजले जातात.
याशिवाय जर तुम्ही घरात तुळस लावली आणि नियमितपणे काही वेळ त्या तुळशीजवळ बसल्यास, तर हे तरंग तुम्हाला अनेक रोगांपासून वाचवण्यास मदत करीत असतात.
तसेच जर कोणी मानसिकरीत्या आजारी असेल म्हणजेच डिप्रेशनमध्ये असेल, तर त्याला तुळशीजवळ बसवलं किंवा त्याच्या खिशात तुळशीची पाने ठेवल्यास, तर ही तुळस त्याला डिप्रेश मधून बाहेर येण्यास आणि मानसिक आजारातून मुक्त होण्यास मदत करेल.
कारण तुळशीची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात फिरत असते आणि त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक आणि आध्यात्मिक स्थिती सुधारते.
या तुळशीची पाने जर आपण रात्री खाली उशीखाली ठेवून झोपलो, तर त्याचे अद्भुत चमत्कारिक लाभ होतात. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, रोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली काही तुळशीची ठेवल्यास,
आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय आपल्याला झोप चांगली येते. तसेच तुळस आपल्याला मानसिकरित्या देखील शक्तिशाली बनवते.
असे त्याने डिप्रेशन येत नाही आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते,आपलं भाग्य चमकू लागतं.याचबरोबर हा उपाय लहान मुलांवर केल्यास त्यांचं मन प्रसन्न होण्यास सुरुवात होत असते. त्यांना पुढे जीवनात सफलता मिळेल.
सकाळी उठल्यानंतर रात्री उशीखाली ठेवलेल्या तुळशीच्या पानातपैकी दोन पाने खाल्ल्यास आपले अनेक प्रकारचे आजार ठीक होण्यास मदत होते. तुम्हाला शक्य असतील तितकी तुळशीची झाडे तुम्ही आपल्या घरात लावा आणि त्यापासून मिळणारे फायदे यांचा लाभ घेतला पाहिजे.
त्यामुळे या बहुउपयोगी तुळशीचे महत्त्व, धार्मिकदृष्ट्याही खूप आहे. तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते,
तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments