नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात, कृष्ण पक्षातील पहिली चतुर्थी ज्याला संकष्टी गणेश चतुर्थी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील दुसरी चतुर्थी जी वैनायकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार वैशाखच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला खूप महत्त्व आहे.
या दिवशी विधिवत गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे. यावेळी संकष्टी गणेश चतुर्थीचे व्रत मंगळवार, 19 एप्रिल रोजी ठेवण्यात येणार आहे. तो मंगळवारी येतो म्हणून तो अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जाईल.
तर यावेळी 19 एप्रिलला अंगारकी चतुर्थी आहे, ही चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येत आहे म्हणून या चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात.
ही सगळ्यात मोठी चतुर्थी मानली जाते, कारण मंगळवारचा दिवस हा श्री गणेश गणपतीचा दिवस असतो आणि या दिवशी जर चतुर्थी आली तर ती खूप मोठी मानली जाते.
म्हणून या दिवशी आपण आपल्या घरातच या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि मग त्या नंतर 21 वेळेस हा मंत्र बोलायचं आहे आणि आपल्या इच्छा बोलायचं आहेत..
आपल्या इच्छा लगेच पूर्ण होतात. लगेच आपल्या ज्या ही इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला सर्व काही मिळू लागते.
कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत आपल्या विघ्नला देखील ते हरवतात, म्हणून आपण त्यांना आपल्या अडचणी संकटं समस्या सांगितल्या तर त्या सुद्धा दूर होतात..
तर या दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे हा दिवा तुम्हाला देवघरातचं लावायचा आहे.
तुम्ही जर तुमचा देव घरात देवपूजा करत असाल तर तुम्ही एक दिवा लावत असतात.
पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तो म्हणजे तुमच्या देवघरात तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गणपतीची मूर्ती एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवायची आहे आणि त्यासमोर दिवा लावायचा आहे.
यासाठी सगळ्यात आधी एक पाठ मांडायचा आणि त्यावर एखादी कापड टाकायचे आहे. मग मूर्ती ठेवायची मूर्तीचे पूजन करायचे असेल किंवा फोटो असेल तर फोटो ठेवून फोटोचे पूजन करायचे आणि त्यानंतर समोर तुपाचा दिवा लावायचा आणि 21 वेळेस तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे.
” श्री गजमुखाय नमः”,
” श्री गजमुखाय नमः”,
हा मंत्र बोलून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना असेल जे काही असेल ते बोलायचे आहे त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे.
तर अशा रीतीने 19 एप्रिल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही एक दिवा लावून तुम्हाला हा एक चमत्कारिक मंत्र 21 वेळेस नक्की बोला….
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments