दुपारी ही कामे करताय एकदा बघाच, धन आणि सुखावर होतो परिणाम..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, दुपारी ही कामे करताय एकदा बघाच, धन आणि सुखावर होतो परिणाम..

अनेकदा थकवा येत असल्याने तुम्ही चुकीच्या वेळी सुद्धा झोपता, परंतु शास्त्रानुसार काही वेळा अशा आहेत तेव्हा झोपणे अजिबात योग्य नाही. चुकीच्या वेळेला झोपण्याने आराम तर मिळतो परंतु ती वेळ तुमच्यासाठी धोकादायक असते.

दिवसातील 24 तासांमधील काही वेळ असा असतो जेव्हा तुमच्या झोपण्यामुळे लक्ष्मीमाता तुमची साथ सोडू शकते. यावेळी झोपण्याने देवी-देवता नाराज होऊ शकतात…

शास्त्रात झोपेबाबत म्हटले आहे की, ‘दिवास्वापं च वर्जयेत’ ज्याचा अर्थ आहे की दिवसा झोपणे शास्त्रानुसार वर्ज्य आहे. तर गरजु म्हणजे लहान मुले, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती दिवसा झोपू शकतात. या लोकांना शास्त्रात दिवसा झोपण्याची सूट दिली आहे.

निरोगी व्यक्तीचे दिवसा झोपणे बरबादीला निमंत्रण देते. त्याच्या जीवनाची स्थिती खराब राहते आणि असा व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहतो. शास्त्रामध्ये दिवसातील काही अशा वेळा सांगितल्या आहेत,

ज्यावेळी झोपणे अपशकुन मानले जाते. सूर्योदयानंतर झोपणे अपशकुन मानले जाते, सोबतच यावेळी झोपल्याने तुमचे आरोग्यही प्रभावित होते.

सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर खुल्या हवेत फिरणे आरोग्यासाठी खुप चांगले मानले गेले आहे. सोबतच यावेळी उठल्याने घरात भरभराट राहते. दिवसा दुपारपासून सायंकाळपर्यंतचा काळ शास्त्राच्या हिशेबाने झोपण्यासाठी अशुभ आहे.

तसेच हा काळ आजारसुद्धा देऊ शकतो. दुपारी किंवा सायंकाळी झोपल्याने पोटासंबंधी आजार होऊ शकतात आणि नेहमी मनात अशांतता राहते.

दुपारी किंवा सायंकाळी झोपल्याने मानसिक शक्ती कमजोर होते, शरीरात आळस, सुस्ती राहते, ज्यामुळे आजारांचा प्रभाव वाढतो. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की, दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी सर्व देवी-देवता पृथ्वीवरच राहतात.

आणि यावेळी झोपणारे लोक देवी-देवतांच्या आशिर्वादापासून वंचित राहतात. संध्याकाळी घरात पूजा आणि देवाची प्रार्थना केली पाहिजे, यामुळे घराचे दुर्भाग्य दूर होते. सोबतच आरोग्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!