पितृपक्षात कधीही या झाडाखाली लावा 1 दिवा पितर होतील प्रसन्न, पैसा इतका येईल कि…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,भाद्रपदातील संपूर्ण वद्य पक्ष हा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. या पक्षात पितरांचे स्मरण करून त्यांचे पूजन केले जाते म्हणून याला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा असे म्हटले जाते.

या काळात पितृ पंधरवड्याचा आहे. पितृपक्षात दिवंगत पूर्वज किंवा पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असा समज आहे.

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षातील श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन असे विधी केले जातात.

गरुड पुराणात श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन करण्यात आले आहे.तसेच हा विधी झाल्यावर पितृपक्षातील नवमी तिथीला,जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती किंवा बालक सातत्याने आजारी पडत असेल,तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे.

अशी मान्यता आहे की, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जोपर्यंत त्याच्या नावाने होतं पिंडदान केले जात नाही, तोपर्यंत त्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि ते भूत-प्रेत बनून या लोकांवरच भटकत राहतात.म्हणून त्याच्या मुक्ततेसाठी पिंडदान करावे,कारण ज्याचे पितृ नाराज असतात, त्यांना त्याचा दोष लागतो.

पितृदोष हा सर्वात मोठा कुंडली दोष मानला जातो. कारण त्या लोकांना कधीही कोणत्याही कार्यात यश मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही.त्यामुळे पितृपक्ष हा काळ पितरांना प्रसन्न करून घेण्याचा खूप महत्त्वाचा काळ मानला जातो.

अशी मान्यता आहे की, पितृपक्षात श्राद्ध,पिंडदान आणि तर्पण केल्यास आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. आपण पितृपक्षात छोटे-छोटे उपाय करून, त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो.

असे मानले जाते की,ज्या लोकांवर त्यांच्या पितरांची कृपा असते,त्या लोकांवर भगवानही प्रसन्न राहील असतात.

आपले शत्रू जास्तच वाढत असल्यास, आपल्या शत्रूंची पीडा वाढली असेल, तर जितके शत्रू असतील, तितके लिंबू पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्यावे व पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून सांगावे की, माझे शत्रू आहेत,

ते मी येथेच सोडून जात आहे, त्यांच्यापासून माझी सुटका करा.तसेच कुंडली शनिदेवाचा काहीसा त्रास असल्यास, किंवा साडेसाती असेल, तर एक कोरडे नारळ ठेवून त्याला थोडेसे छिद्र करून, त्यात रवा, तेल व साजूक तूप भरावे.

मग तो नारळ पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये पुरून द्यावा, त्यामुळे शनि दोषापासून आपली सुटका होते. पिंपळाच्या झाडावर जर शनिदेवाची मूर्ती असेल व त्या मूर्तीला आपण तेल अर्पण केले तर कोर्टकचेरीच्या कामामध्ये यश मिळते.

श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की, सर्व वृक्षांमध्ये पिंपळाचा वृक्ष आहे.

या झाडाच्या सावलीत उभे राहिल्यास आपल्याला सकारात्मक मिळते. कुंडलीत असलेल्या दोषांना दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचे पूजन खूप लाभदायक असते.

पद्ध पुराणानुसार पिंपळाचे झाड हे साक्षात भगवान श्रीकृष्ण याचे रूप असल्यामुळे, या झाडाला देवरूपी पदवी मिळाली आहे.

पिंपळाच्या झाडा साक्षात श्रीहरी विष्णूचा वास असतो, तर लक्ष्मीचे वास्तव्य पिंपळाच्या झाडा बसते. पद्मपुराणनुसार, पिंपळाचे पूजन व प्रदक्षिणा केल्यास आपले आयुष्य वाढते.

हे व्यक्ती पिंपळाला पाणी अर्पण करतात त्यांची सर्व पापांपासून सुटका होऊन त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाचा शनिदेवांचे ही वास्तव्य असल्याचे मानले जाते.

शनीदेवाची साडेसाती किंवा शनी दोष इत्यादी साठी पिंपळाच्या झाडाचे पूजन व प्रदक्षणा केल्यास शनिदेवाच्या प्रकोपापासून आपल्याला सुटका होते. जी व्यक्ती शनिवारी या झाडाचे पूजन करते, त्यांना शनिदोषापासून मुक्ती मिळेल, त्या व्यक्तींवर देवी लक्ष्मीची कृपा होईल.

शनिदेवांचा कोपामुळे वैभव नष्ट होते, परंतु शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणाऱ्या व्यक्तीवर शनी देव व देवी लक्ष्मी दोघांचीही कृपा सदैव राहते.

पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावावा, यामुळे आपल्या विचारांचे आपल्या त्याबरोबरच श्रीहरी विष्णू व लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!