पवित्र श्रावण महिन्यात नक्की खरेदी करून घरी आणा या 7 पैकी कोणतीही 1 वस्तु वर्षभर पैसा….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो, या महिन्यात पूर्ण भक्तिभावाने महादेवांचे, शिवशंभूंची पूजा केली जाते.त्यामुळे, व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्यांचा अंत होतो.

तसेच प्रत्येक संकटातून भगवान शंकर त्या व्यक्तीला नक्की वाचावतात. त्यामुळे श्रावण महिना खुप पवित्र मानला जातो. असे सांगितले जाते की,जर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असतील तर,या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ बरोबरच माता पार्वतीची पूजा करावी.

माता पार्वतीने सुद्धा, शिवशंभु पतीरूपांत मिळावेत, म्हणून कठोर तपश्चर्या करून शिवशंभुना प्रसन्न केलं होतं,त्यामुळे ज्यांचे विवाह जुळत नाही,अस अनेक समस्या असल्यास, तर या 7 वस्तूंपैकी कोणतीही 1 वस्तू आपण खरेदी करून घरात आणली पाहिजे.

यातील पहिली वस्तु म्हणजे, त्रिशूल. श्रावण महिन्यामध्ये आपण चांदीचा त्रिशूळ आपल्या घरामध्ये नक्की आणले पाहिजे, कारण त्रिदेवांचे प्रतीक,म्हणजे ब्रह्मा, विष्णू.

आणि महेश यांचे अंश असणारे,असं चांदीचे त्रिशूल घरात आणल्यास, वर्षभर आपल्या घरावरती तसेच घरात राहणाऱ्या लोकांवरती कोणतेही संकट येणार नाहीत.

याशिवाय घरामध्ये क्लेश किंवा सतत एकमेकांशी भांडत होत असतील,तर असे त्रिशूळ खरेदी करणा-या नंतर आपण त्याची संपूर्ण महिनाभर त्यांची यथाशक्ती पूजा करावी.

दुसरी वस्तू म्हणजे, डमरु हे शिव-शंभूंच एक अत्यंत प्रिय यंत्र असल्याने, डमरू खरेदी केल्यानंतर,याची पुजा करावी.

असे सांगितले जाते की,ज्या घरामध्ये दमरू असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वास करीत नाही.तसेच त्या घरातील लोकांचा आरोग्य चांगलं राहतं.म्हणून रोज देवपूजा झाल्यानंतर,या दमरू वाजवावी.

तिसरी वस्तू म्हणजे रुद्राक्ष.हिंदू शास्त्रानुसार ,सती वियोगातून जेव्हा शिवशंभु ना अश्रू अनावर झाले, तेव्हा त्यांचे अश्रू ज्या ज्या ठिकाणी पडले ,त्या ठिकाणी रुद्राक्ष नावाच्या वृक्षांची उत्पत्ती झाली.

म्हणून हा रुद्राक्ष आपल्या घरामध्ये असला पाहिजे, कारण रुद्राक्ष ज्या घरामध्ये असतं ,त्या घरातील लोकांची शक्ती कित्येक पटीनी वाढते. आपल्या देवघरात ठेवू शकता किंवा गळ्यामध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेऊ शकता, मात्र जर तुम्ही ते गळ्यामध्ये धारण केल्यास, आपणास ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते.

पुढची वस्तू म्हणजे शिवमंदिरातील भस्म.हे भस्म आणून आपण एका चांदीच्या डब्यात ठेवले पाहिजे.तसेच संपूर्ण श्रावण महिना,या भस्माची पूजा करावी.

पूजा करून झाल्यानंतर थोडासा भस्म आपल्या स्वतःच्या कपाळाला लावावा.या भस्मामुळे आपल्या घराची प्रगती होईल, सुख समृद्धीमध्ये वाढ होईल.

तसेच ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे ,त्यांनी या श्रावण महिन्यात चांदीचा नाग-नागिन अवश्य खरेदी केली पाहिजे आणि संपूर्ण श्रावन महिन्यात,चांदीचा नाग-नागिनच्या जोडीची पूजा करावी आणि त्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये विसर्जन करावे. यामुळे काल सर्प दोष यापासून मुक्ती मिळेल.

तसेच सोन्याचा,चांदीचा किंवा पितळेचा तांब्या अवश्य खरेदी करावा. त्या तांब्यामध्ये आपण गंगाजल भरून ठेवावे किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी करून ठेवावं आणि या गंगाजलाने शिव-शंभूंचा संपूर्ण महिनाभरात अभिषेक करावा.

यामुळे शिवशंभु प्रसन्न होतील.तसेच हा कळस किचनमध्ये ठेवल्यास, अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही तसेच घराच्या ईशान्य कोपर्‍यात ठेवल्यास, घरातील वाद-विवाद कमी होण्यास सुरुवात होईल.

पुढची वस्तू म्हणजे, शिव-शंभूंच वाहन नंदी होय.आपण एक चांदीचा नंदी आपण नक्की खरेदी करावा,कारण नंदी हा ध्येयाचे प्रतीक मानले जाते. आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट पैशांचा संकट असल्यास, हा चांदीचा नंदी अवश्य खरेदी करा.

आणि दररोज पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती येईल,घरातील वैभव ,ऐश्वर्य वाढण्यास मदत होईल.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!