श्रावण महिन्यात घरात आणा, या 5 पैकी कुठलीही एक वस्तु धन ,वैभव, ऐश्वर्य सर्व मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना असेही म्हणतात. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.

म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास ,तसेच त्याच्या आवडत्या वस्तु घरात आणल्यास,त्याचा आपल्यावर कृपाशीर्वादा राहतो.

म्हणून ,असा काही वस्तू आपण श्रावण महिन्यात आपल्या घरात आणल्यास, आपल्यावर भगवान शंकर प्रसन्न होतात.अशा 5 वस्तूंमधील कोणतीही एक वस्तू घरात आणली,तरी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल.

यापैकी पहिली वस्तू म्हणजे, एक मुखी रुद्राक्ष होय. श्रावण महिन्यामध्ये जर आपण एक मुखी रुद्राक्ष आपल्या घरात आणल्यास, भगवान शंकर प्रसन्न होतात.कारण एक मुखी रुद्राक्ष हा खूप दुर्लभ असल्याने,हा एक मुखी रुद्राक्ष घरी आणून, त्याची विधिवत पूजा करावी.

याशिवाय जर तुमच्या घरामध्ये एक मुखी रुद्राक्ष असेल, तर श्रावण महिन्यामध्ये महिनाभर त्याची पूर्ण श्रद्धेने पुजा करावी.हा एक मुखी रुद्राक्ष आपण गळ्यामध्ये किंवा हातामध्ये धारण करू शकतो.

तसेच दुसरी वस्तू म्हणजे, त्रिशूळ.कारण हे त्रिशुळ भगवान शंकरांचे प्रमुख शस्त्र मानले जाते.त्यामुळे शक्य असेल तर,घरामध्ये चांदीचे किंवा तांब्याचे त्रिशूळ आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात आणले पाहिजे. यामुळे संकटाशी लढण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते.

हा त्रिशुळ आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याची विधिवत पूजा करून त्याची आपल्या देवघरात स्थापना करावी. पुढची वस्तू म्हणजे चांदीचा नंदी.कारण नंदी हा भोलेनाथांचे वाहन आहे, तर शक्य असल्यास, चांदीचा नंदी या श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरात अवश्य आणला पाहिजे.

पुढची वस्तू आहे गंगाजल होय.कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगाजल खूप पवित्र मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक पूजेमध्ये या गंगाजलचा वापर केला जातो.जर आपल्या घरात आधीच गंगा असेल,तरीसुद्धा या श्रावण महिन्यात थोडसं तरी गंगाजल तुमच्या घरात नक्की आणावे.

श्रावण महिना हा भोलेनाथ यांचा आवडता महिना असल्याने, ज्या वस्तू घरात आणल्याने अत्यंत प्रभावी परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. समस्या या प्रत्येकाच्या जीवनात असातात.

आणि या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपण,श्रावण महिन्यामध्ये आपण घरामध्ये सफेद चंदन आणलं पाहिजे.कारण सफेद चंदन हे भगवान शंकर यांना अतिप्रिय आहे, तर सफेद चंदन श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या घरात आणलं.

तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.याशिवाय आपण सफेद चंदनाचा तिलक करून कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडल्यास,ते कामात यश प्राप्त होते.

याशिवाय शमीचे झाड हे भोलेनाथाना तसेच गणेशानाही खूप प्रिय असल्याने,हे आपण त्यांचे एक छोटेसे रोपटे आपल्या घरी लावले पाहिजे.यामुळे हे शमीचे झाड श्रावण महिन्यात आपण नक्की लावले पाहिजे.

तसेच या शमीचे फुल भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असल्याने,आपण महादेवांना या झाडाची फुले किंवा पानेही अर्पण करू शकतो.असे सांगितले जाते की, बेलपत्र अर्पण केल्याने जसे महादेव प्रसन्न होतात, त्याचप्रमाणे शमीची पानं केल्यामुळे सुद्धा महादेव आपल्यावर प्रसन्न होतात.

पुढची वस्तू म्हणजे, डमरूचा आवाज महादेवाना अत्यंत प्रिय असल्याने, तर असा दमरु आपण श्रावण महिन्यात आपल्या घरात आणला पाहिजे.यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तसेच नजर दोष किंवा एखाद्या व्यक्तीला नजर लागली असेल,

वास्तुदोष असेल तर या सर्व समस्या या डमरूमुळे दूर होतात. आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

पुढची वस्तू म्हणजे पारद शिवलिंग होय.जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर पारद शिवलिंग आपण श्रावण महिन्यात घरात अवश्य आणले पाहिजे,हे शक्य नसल्यास नर्मदेश्वर शिवलिंग आणावा.

आणि याची पूर्ण श्रावण महिना या शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी.यामुळे आपल्या घरावर येणारं संकट दूर होतं,तसेच आपल्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात.

पांढऱ्या रुईचे फुल हि भोलेनाथ यांना खूप प्रिय असल्याने, पांढऱ्या रुईचे झाड तुमच्या घरामध्ये एखाद्या छोट्या कुंडीत लावलं तर हे खूप शुभ मानलं जातं,तसेच पांढरी रुई ही साक्षात गणपतीचे रूप मानलं जातं,

कारण या झाडाच्या मुळात गणपतीची वास करतात, असे सांगितले जाते. यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

या वस्तू आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल, घरातील वास्तुदोष देखील नाहीसा होईल आणि भोलेनाथ यांची कृपा आपल्यावर होईल.

याशिवाय तांब्याचा कलश जर आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात आणल्यास, घरात अनेक शुभ घटना घडू लागतात, अनेक शुभ संकेत आपल्याला मिळत असतात.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!