26 सप्टेंबर, शारदीय नवरात्री, दररोज सकाळी बोला हा देवीचा बीजमंत्र…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,पितृ पंधरवडा संपला की 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रीच्या या नऊ पवित्र दिवसांत मातेची आराधना आणि पुजा केल्याने विशेष लाभ मिळतात.

दरम्यान, या दिवसांमध्ये काही विशेष उपाय केल्यास दुर्गा माता साऱ्यांच्या इछा पूर्ण करते. नवरात्रीत स्वच्छ मनाने काही कामे केल्यास देवी माता नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते.

नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यावर्षी नवरात्रीचा उत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे आणि 5 ऑक्टोबर 2022 रोजी संपेल.

नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास आहे. तसेच नवरात्री माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.

त्यामुळे या दिवसांमध्ये आपण अनेक उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि ज्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो,

त्या व्यक्तीच्या जीवनात कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही. तसेच हे उपाय तुम्ही काही विशिष्ट दिवशी केले, तर त्याचे त्वरित फळ प्राप्त होते.

काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येतो.कारण माता लक्ष्मी कमळावर बसलेली आहे आणि कमळ हे तिचे आसन आहे,तर अशा या माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होण्यासाठी,

अशी प्रार्थना आपण नवरात्रीमध्ये करायचे आहे. हा उपाय म्हणजे, नवरात्रीमध्ये दररोज आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. हा चमत्कारिक मंत्र म्हणजे,

“ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमल-वासिन्ये स्वाहा”, “ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमल-वासिन्ये स्वाहा,”ॐ श्रीं ह्रीं क्लीं ऐं कमल-वासिन्ये स्वाहा”

हा माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. या मंत्राच्या जपाने तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट होतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थायीनिवास करेल आणि तुमच्या घरात पैसा येईल आणि तो टिकेल.

कारण आपण खूप मेहनत करूनही पैसे कमवतो, पण हे पैसे टिकत नाही. काही ना काही काम निघून, हे पैसे खर्च होतात.तर आपल्या घरामध्ये असावा, यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करा.

त्यामुळे आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा आणि चमत्कारिक उपाय या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचा आहे. तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

तसेच तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त मंत्रजप करू शकता.मात्र कमीत कमी 108 वेळा तरी दररोज तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे.

कारण माता लक्ष्मीच्या बीजमंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि या मंत्रामध्ये 5 बीजमंत्र आहेत.त्यामुळे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जात आहे.

तसेच पौराणिक कथेनुसार, रावणाने देखील हा मंत्र सिद्ध करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले होते.त्यामुळे सोन्याची लंका निर्माण केली होती. देवी भागवतमध्ये या मंत्राचा उल्लेख केला गेला आहे.

तर नवरात्रीमध्ये तुम्ही देखील या मंत्राचा जप अवश्य केला पाहिजे. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन, तुमच्या सगळ्या घरात विराजमान राहील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!