नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,पितृपक्षात कळत नकळतपणे काही गोष्टी अनावधानाने घडून जातात त्यामुळे पितृपक्षात जर ही एक गोष्ट तुम्ही करत असाल तर लगेच करणे बंद करा. कारण पितृपक्षात पितरांना शांती द्यायची असते,
त्यांना खुश करायचं असते, त्यांचे स्मरण करावे व त्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख,अपयश,दारिद्र्य दूर होईल. पितर खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा होय.मातृ-पितृ वंशपरंपरा मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध केले जाते.
भाद्रपद पंधरवड्यात पिढीतील सर्व पितरांना – आप्तांना – मित्रांना जे मृत आहेत त्यांचे त्या त्या तिथीला श्राद्ध करून त्यांचे स्मरण करायचे असते. श्राद्ध विधी करताना श्रद्धेला सर्वाधिक महत्त्व असते.
त्यामुळे श्राद्ध तर्पण विधि करताना ते श्रद्धापूर्वक करावे. धार्मिक मान्यतेनुसार काही गोष्टी या प्रामुख्याने श्राद्धविधी किंवा श्राद्ध पक्षात टाळाव्यात. या चुका केल्यास आपले पूर्वज नाराज होतात.
पितृपक्षातील श्राद्ध तर्पण विधि करताना कोणती भांडी – वस्तू वापराव्यात याबद्दल सांगण्यात आले आहे. श्राद्धाच्या पूजाविधी करतांना अंड्याचा वापर अजिबात करू नये.
काही मान्यतेनुसार पितृपक्षातील श्राद्ध कार्य करताना लोखंडी भांड्यांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर आणि सदस्यांवर होतो असे सांगितले जाते. पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडा ऐवजी तांबा,
पितळ किंवा अन्य कोणत्याही धातूची भांडी वापरावीत असा सल्ला दिला जातो. पितृपक्षातील श्राद्ध कर्मात श्रमदान, अर्घ्यदान,शांत, पूजा ,अग्नौकरण, पिंडदान, विकरदान असे विधी केले जातात.
श्रद्धां करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये. अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्रद्धांचे विधी करताना पान खाऊ नये असे सांगितले जाते.
याशिवाय अन्य घरातील असलेल्या अन्नाचा प्रयोग श्राद्ध तर्पण विधि करताना करू नये. अत्तराचा वापरही धार्मिक कार्यात टाळावा अशी लोक मान्यता आहे. जेव्हा श्राद्ध करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात.
तेव्हा घरातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती होते, त्यांचे कार्य समाज व कुटुंबासाठीचे योगदान याबद्दल माहिती मिळते.सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी पितृपक्षात अजिबात करू नयेत.
पितृपक्षात कोणाचाही अपमान करू नये असे सांगितले जाते. या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडून सुद्धा नाही असे सांगितले जाते.
या दिवसात पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येतात अशी मान्यता असल्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करावा. कोणत्याही पशुपक्ष्यांचा अपमान करू नये. त्यांना त्रस्त करू नये.
पूर्वजांचा अभिमान जाणावा. चेष्टा करू नये. पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून प्रेरणा मिळत राहते, ते आठवावे, त्याचे अनुकरण करावे. यावेळी एकूणच वातावरण शोकाकुल असते.
पूर्वजांच्या आत्मा शुद्धीसाठी श्राद्ध विधी केला जातो. त्यामुळे शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे काहीच अपमान करू नये.शक्य झाल्यास पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे.
व आपल्या कुटुंबातील पूर्वजांचे श्राद्ध विधी अन्य कुणाच्या घरात अजिबात करू नये. पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया- प्रयाग- बद्रीनाथ आणि इतर स्थळी तुम्ही करू शकता. आहारात मांसाहार टाळावा. मद्यपान करू नये. तसेच सात्विक आहार घ्यावा.
पितृपक्षात केस कापू नये,यामुळे अन्यथा धनहानी होऊ शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. कुटुंबातील व्यक्तीचे ज्या तिथीला निधन झाले आहे त्याच तिथीला श्राद्ध तर्पण विधि करावे,अन्यथा सर्वपित्री अमावस्याला तुम्ही ते श्राद्ध करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही पितृपक्षात या गोष्टी करणे शक्य तितके टाळा. होणाऱ्या दुष्परिणाम टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments