नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्त्व वेगळे आहे. पैकी लक्ष्मी पूजन विशेष महत्त्वाचे मानले जाते.दिवाळीला करण्यात येणाऱ्या लक्ष्मी पूजनावेळी स्थापन करावयाची लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पाची मूर्ती याच दिवशी घरात आणण्याची प्राचीन परंपरा प्रचलित आहे.
तसेच दिवाळीच्या दिवसात दीपदानालाही अत्यंत महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या मूर्तीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती कशी असावी,
कशी नसावी, त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, त्यातून काय लाभ किंवा फायदे मिळू शकतात.
दिवाळीतील धनत्रयोदशीला लक्ष्मी देवीची मूर्ती घरी आणताना काही गोष्टींचे भान ठेवले गेले पाहिजे, असे सांगितले जाते. लक्ष्मी देवीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्वरुपात असावी.
लक्ष्मी देवी उभ्या स्वरुपात असता कामा नये. अन्यथा अधिक नुकसान, तोटा होऊ शकतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मी देवीची प्रतिमा घरात आणायची असेल,
तर लक्ष्मी हातातून धनवर्षा होत असलेल्या प्रतिमेला प्राधान्य द्यावे. मात्र, लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी एखाद्या पात्रात पडतानाची प्रतिमा असावी. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी जमिनीवर पडताहेत,
अशा स्वरुपाची लक्ष्मी देवीची प्रतिमा नसावी, असे सांगितले जाते. सोन्याची नाणी पडतानाच्या लक्ष्मी देवीच्या मुर्ती किंवा प्रतिमेमुळे आपल्याला होणाऱ्या धनलाभाचे प्रमाण वाढू शकते, असे सांगितले जाते.
लक्ष्मी देवीची नेहमी गणपती बाप्पा किंवा सरस्वती देवीसोबतच पूजा करावी. असे केल्याने व्यक्तीला धन आणि विद्या दोन्हीची प्राप्ती होऊ शकेल. तसेच लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांचे एकत्रितरित्या केलेले पूजन अत्यंत कल्याणकारी ठरू शकते,
अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नेहमी हसमुख स्वरुपाची असावी. लक्ष्मी देवीची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा प्रतिमा कधीही घरी आणू नये.
असे केल्याने मोठा तोटा तसेच आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते, तसेच सर्वांना सोने-चांदीची मूर्ती घरी आणणे शक्य नसते. अशावेळी पितळ किंवा अष्टधातूची मूर्ती घरी आणावी.
असे केल्यास लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळतात. धन-धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दिवाळीतील सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.
वास्तुशास्त्रात, कोणत्याही देवतेचे पूजन करताना त्याची योग्य दिशा कोणती असावी, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे पाहायला मिळते. दिवाळीत लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी, सरस्वती आणि गणपती यांची स्थापना केली जाते.
पूजनावेळी लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती किंवा प्रतिमा उत्तर दिशेला स्थापन करावी, असे सांगितले जाते.
दिवाळीत लक्ष्मीपूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले यांचा समावेश असलेले तोरण आवर्जुन लावावे. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून घरातील प्रवेशद्वाराजवळ शिंपडावे.
दिवाळीतील लक्ष्मीपूजन किंवा अन्य कोणत्याही पूजनावेळी देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे, असे सांगितले जाते.
स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. स्वस्तिक चिन्हामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. सुख, समृद्धीत वृद्धी होते, असे सांगितले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments