नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.
अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.श्री स्वामी समर्थ, स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल, तर तुम्हाला माहीतच असेल कि, स्वामींच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये स्वामींना रोज नैवेद्य दाखवायचा असतो.
मग तो नैवेद्य सकाळचा असेल किंवा दुपारचा असेल किंवा संध्याकाळी असेल. बहुतेकदा दोन वेळा नैवेद्य आपण दाखवत असतो, पण नवीन सेवेकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसते की, स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो.
तर तुम्ही नवे सेवेकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो. आम्ही गुरूवारच्या दिवशी दाखवला जाणारा स्वामींच्या नेवेद्य सांगणार आहे. विशेष नेवेद्य जर तुम्ही रोज स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तरी तुम्ही गुरुवारी हा नैवेद्य दाखवू शकतात.
आणि जर तुम्ही स्वामींना ज्या देवघरात नैवेद्य ठेवतच नसाल, तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी नैवेद्य नक्की ठेवा. मग तो सकाळी असेल किंवा दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल.
फक्त गुरुवारी ठेवा.जर स्वामींचे सेवेकरी असाल रोज सेवा करत असाल तर रोज नैवेद्य ठेवायची सवय लावा. कारण हा नैवेद्य आपणच नंतर खातो. फक्त तो स्वामींना दाखवायचा असतो.
तुम्हाला माहीत असेल की, गुरुवारच्या या दिवशी विशेष सेवा केली जाते, या सोबत विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य गोड असतो. सर्व पदार्थ गोड किंवा पुरणपोळी खीर किंवा शिरा आणि पुरी, खीर आणि पुरी यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही गुरुवारी करायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे.
स्वामींचे सुद्धा आहेत जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींचे अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थां मध्ये कांदा भाजी आणि कट पोळी.
आता तुम्हाला स्वामीं ना नेवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी खीर, पुरणपोळी आमरस, कांदा भाजी, आमटी भात पापड असा पुरेपूर तुम्ही नेवेद्य दाखवू शकतात.
हे तर झाले स्वामींचे आवडीचे पदार्थ, परंतु स्वामी हे कधीच बघत नाही कि तुम्ही ताटात काय दिलंय फक्त भक्तांचा खरा भाव बघतात. तुम्ही किती आनंदाने किती प्रेमाने तो जेवणाचा बेत तुम्ही स्वामीं ना कसा देता ते महत्वाचे आहे.
ते काही असेल दही भात, दूध भात, पोहे, भाजी चपाती, भाजी भाकर, डाळ भात जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही स्वामीं ना नेवेद्य म्हणून दाखवा आणि काहीच केले नसेल तर दूध भात, दूध चपाती दाखवा.
भाव महत्त्वाचा असतो. आदर, प्रेम महत्त्वाचे असते. स्वामींना सगळे आवडते. तुम्ही जे द्याल ते स्वामींचे आवडते पदार्थ बनतील. असे नाही कि तुम्ही पुरणपोळी, बेसानाचे लाडूच स्वामींना दाखवायला हवे. जर कोणता खास दिवस आहे, सणवार आहे.
पारायणाचे उद्यापन आहे. तेव्हा तुम्ही स्वामींना गोड धोड नैवेद्य दाखवा. शक्य असतील बेसनाचे लाडू करून दाखवा. कांदा भाजी करून दाखवा. पण हे करणे म्हणजे नियम नाही स्वामी दूध भात खाऊन पण भक्तांच्या इच्छया पूर्ण करतात.
त्यांच्यावर कृपा करतात. जे तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा ते स्वामींना आवडेल आणि जर तुम्ही परिस्थितीनुसार किंवा काही समस्यांमुळे अडचणीमुळे काहीच करू शकत नसाल,
तर तुम्ही फक्त एक साधी चपाती, एका वाटीत दूध त्यामध्ये चिमूटभर साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला काही ना काही गुरूवारच्या दिवशी गोड दाखवायचा आहे.
मग ते सकाळी दाखवा, दुपारी दाखवा, संध्याकाळी दाखवा किंवा काहीतरी गोड दाखवायचा आहे. तुम्ही रव्याचा शिरा करू शकतात तरी काही हरकत नाहीये. स्वामी भक्ताने प्रेमाने विश्वासाने केलेलं सगळं काही ग्रहण करतात.
फक्त त्यामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही, फक्त आपुलकीने स्वामींसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे या इच्छेने तुम्हाला नैवेद्य दर गुरुवारी करायचा आहे, हे समजून तुम्ही आणि नैवैद्य करावा तर..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments