जर तुमच्याही घरात जपमाळ असेल, तर ही चूक करू नका, नाहीतर घर बरबाद होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही,

तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास तुम्ही देखील ही 1 चुक कधीच करू नका..

अनेक देवी देवतांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी आपल्या घरात आपण जप माळ ठेवतो. ही जप माळ अनेकदा तुळशीची असते, कधी रुद्राक्षांची असते, तर अनेक लोक स्फटिकांची जप माळ वापरतात.

मित्रांनो जप माळ कोणतीही असुद्या त्या जप माळेचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा. अन्यथा फायद्या ऐवजी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकत. विशिष्ट देवी देवतेचा क्रोध उत्पन्न होऊ शकतो.

मित्रांनो जप माळे विषयी हिंदू धर्म शास्त्र अस मानत की कोणत्या मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जप माळेचा वापर केला तर त्याच फळ हे कित्येक पटीने प्राप्त होत.

शक्यतो मंत्रांचा जप हा जप माळेवरच करावा.मात्र जप करताना एकाच माळेवर भिन्न देवदेवतांचे जप जपू नयेत. लक्षात घ्या एकाच माळेवर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मंत्रांचा जप करण्यास हिंदू धर्मशास्त्र मनाई करत.

मात्र जर तुमची इच्या असेलच तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवीदेवतांचा जप करू शकता. मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवतांच्या मंत्रांचा एकत्रित जप एका माळेवर आपण करू नये.

शक्यतो आपली जी माळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. माळ कधीच खुंटीला अडकून ठेऊ नका.तिच्या साठी आपण एखादा बॉक्स करू शकता.

आपल्या जप माळेचा कधीच अपमान करू नका. दररोज नित्यनियमाने त्या माळेवरती एक फुल अवश्य वाहा.मित्रांनो जप माळेच महत्व खूप मोठं आहे. खरं तर जप माळेमुळे जप किती झाला.

आपण किती मंत्र बोललो हे आपल्याला अगदी अचूक कळत आणि ही माळ तुळशी पासून, रुद्राक्षांपासून बनली असल्याने पवित्र वस्तूंच सानिध्य आपल्याला सहजपणे प्राप्त होत.

आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगट्या मध्ये आणि बोटांमध्ये जे घर्षण निर्माण होत त्यातून निर्माण होणारी विधुत शक्ती ही विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसांद्वारे आपले हृदय प्रभावित करते.

आपल्या मनाची एकाग्रता वाढवते. मित्रांनो जी व्यक्ती मरते वेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर घेतलेलंच नाव म्हणजे आपण आयुष्यभर जो मंत्र जपलेला आहे तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो.

त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजपणे मिळते. वासनेच्या गुंत्यातून ती व्यक्ती बाहेर पडते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!