दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे व्रत कसे करावे?? जाणून घ्या….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामी.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे.

वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.

अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत आवडीचा दिवस आहे. या स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा, विशेष आरती आणि विशेष नैवेद्य देखील केला जातो.

या दिवशी आपण सगळे स्वामींची विशेष सेवा करतो आणि स्वामींना प्रसन्न होण्याचा प्रयत्न करतो. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारचे व्रत देखील केले जाते.

जसे इतर देवी-देवतांचे व्रत असते त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या देखील व्रत असते. हे व्रत अत्यंत साधे आणि सोपे आहे. हे गुरुवारचे व्रत करत असताना 9 गुरुवार या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचे आहे.

सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची धूप दीप लावून आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर 1 किंवा 11 माळ जप आपल्याला करायचा आहे, मग त्यानंतरच आपल्या गुरुवारचे व्रत सुरू होणार आहे.

फक्त आपण आपल्यापरीने होता होईल तेवढी स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची सेवा करायची आहे आणि त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत आपण वाचन करायचे आहे किंवा प्रत्येक दिवशी 3-3 अध्याय वाचले तरी चालते.

व स्वामी समर्थ नामाचा आपल्याला सदैव चालू ठेवायचा आहे. याशिवाय श्री स्वामींचा तारक मंत्र देखील आपल्याला पटन करायचा आहे. त्याच प्रमाणे गुरुवारच्या दिवशी आपल्याला फक्त फळे किंवा बिन मिठाचे पदार्थ आपल्याला खायचे आहे.

तसेच संध्याकाळी धूप दीप लावून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला आपण नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये बनवलेला स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि त्यामध्ये गोड पदार्थ किंवा चपाती-भाजी,

आपल्या घरामध्ये जे काही तयार होते त्याचा नैवेद्य स्वामीनी आपल्याला दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला स्वामींची आरती करायची आहे.
तसेच जो नैवेद्य आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवला आहे, तोच नैवेद्य आपण उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण हे व्रत 5 गुरुवार किंवा 7 गुरुवार, 11 गुरुवार अशा विषम संख्यामध्ये आपल्याला करायचे आहे. हा उपास करत असताना आपल्याला काही अडचणी आल्यास किंवा सुतक आल्यास त्या दिवशी फक्त आपण उपवास करायचा आहे.

मात्र तो गुरुवार आपण संकल्प केलेला गुरुवारामध्ये धरायचा नाही. त्यामुळे येणारा पुढचा गुरुवार आपल्या संकल्प केलेला गुरुवार यामध्ये धरायचा आहे. दर गुरुवारी हे व्रत केल्याने आपल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात.

तसेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे काही मागू ते सगळे आपल्याला प्राप्त होते. स्वामी समर्थ महाराजांच्या अशा पद्धतीने व्रत आपण नक्कीच करावे. आपल्या सगळ्यांच्या नक्की पूर्ण होतील.

आपल्याला काय हवे आहे ते सगळे मिळेल, म्हणून स्वामींची गुरूवारची व्रत आपण नक्कीच केले पाहिजे आणि आपले कल्याण करून घ्यावे..

।। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।।

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!