स्वप्नात मृत लोक दिसल्यास?, अशी 5 स्वप्ने आली तर चुकूनही इतरांना सांगू नका. कोणती स्वप्ने कोणत्या प्रकारचे फळ देतील

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,माणसाला स्वप्ने पडणे, हे गोष्टी काय नवीन नाही.स्वप्न शास्त्रानुसार असे म्हणतात की, आपण जे दिवसभरात विचार करत असतो तेची रात्री झोपल्यानंतर स्वप्ने पडत असतात.

पण आपण जो विचारही केलेला नाही किंवा आपल्या सोबत जी घटना ही घडली नाही, तरीही काही स्वप्ने पडत असतात. सातत्याने पडत असतात. तर अशा प्रकारची वेगळी आणि रहस्यमय स्वप्नांनी आपले नशीब चमकू शकते. त्यामुळे या विशेष स्वप्नांचे स्वप्नशास्त्रेनुसार काही अर्थ सांगितले जातात.

स्वप्न पडणे ही चांगली गोष्ट आहे, ते स्वप्न प्रत्यक्षात घडणे ही त्याहूनही चांगली गोष्ट आहे परंतु स्वप्न शास्त्रानुसार जर ही वेगळी स्वप्न पडत असतील तर विशेष आहे, आणि ही स्वप्ने तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नयेत असे स्वप्नशास्त्र सांगते.

कारण प्रत्येक स्वप्नाला ठराविक अर्थ असतो, जो तुम्ही घ्याल तसा तो निघत असतो. इतकेच नव्हे तर या स्वप्नांना गुपित ठेवल्यास बरेच सारे लाभ आपल्याला होऊ शकतात असे चाणक्य नीती आपल्याला सांगते.

त्यामुळे तुम्ही ही अशी स्वप्ने गुपित ठेवली तर तुमच्यासाठी खूप लाभदायी असेल. काही स्वप्ने खूपच गुंतागुंतीची असतात त्यामुळे ती अर्धवट राहतात, काही स्वप्ने झोपून उठल्यावर देखील अगदी स्पष्ट लक्षात राहतात.

बऱ्याचदा आपण इतरांना ती स्वप्नं देखील सांगत असतो की आज मला स्वप्नात असे काही दिसले. जर तुम्ही ही अशी 5 स्वप्नं जर पहिली असतील तर त्याचा जवळचा सं-बंध येणाऱ्या नजीकच्या भविष्याच्या घटनांमध्ये दडलेला असतो, ज्यामुळे ती सत्यात उतरणार असतात म्हणून ती गुपित ठेवणे चांगले असते .

अन्यथा ते स्वप्न स्वप्नच राहते, जर तुम्ही त्याची वाच्यता बाहेर कुठे केली तर ! जर स्वप्नात तुम्ही निसर्गाच्या खुशीत मन प्रसन्न करून वावरत असाल, मन खुश असेल व आनंदाने नाचत बागडत असाल तर याचा अर्थ तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यामुळे हे स्वप्न चुकूनही कोणाला सांगू नका.

जेव्हा स्वप्नात कोणाचातरी मृ-त्यू होतो अथवा स्वतःचं मृत अवस्थेत बघतो तेव्हा आपण घाबरू नये कारण स्वप्न शास्त्रानुसार त्याचा असा अर्थ होतो की तुमच्या आयुष्यातील एक मोठं संकट टळलं आहे अथवा ते टळणार आहे.

त्यामुळे हे स्वप्न जर तुम्ही इतरांना सांगितले तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो व सं।कट ओढवू शकते. काही वेळी स्वप्नात साप दिसतो, नाग दिसतो तर अशावेळी मनात भीती येते, परंतु घाबरण्याचे काहीच काम नाहीये .

कारण यामुळे तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे. नोकरी व्यवसायात काहीतरी खूपच फायदेशीर गोष्टी घडण्याची शक्यता असते.जर स्वप्नात तुम्हाला पाण्यात मासे पोहताना दिसतील, कुणी मासे पकडत असेल, खात असेल किंवा एखाद्या फिश टॅंक मध्ये हे मासे असतील.

तर नक्कीच तुम्हाला शुभ घटना एका महिन्याच्या आत कानावर येतील. इतकेच नव्हे तर स्वप्नात कोणत्याही ईश्वराचे दर्शन झाले, मंदिर आले तर ते सुद्धा अतिशय शुभकारक मानले आहे.

याचबरोबर, स्वप्नामध्ये देवाला पाहणे पण हे स्वप्न गुप्त ठेवत नाही तर अशा स्वप्नांना गुप्त ठेवा. शास्त्रानुसार अशा दिव्यशक्ती त्याच व्यक्ती समोर येतात ती देवाला प्रिय आहे ज्याच मन प्रमाणिक आहे.

जी वक्ती धनवान बनणार आहे अशी व्यक्ती तुमच्या स्वप्नात आली तर त्य स्वप्नं गुप्त ठेवा. कधी ही असे स्वप्नं कोणासोबत पण शेअर करू नका ,सांगू नका तर याचा उलटा परिणाम होऊ शकतो.

देवाला तुम्हाला खूप काही द्यायचा आहे त्यामुळे त्याचा आदर करा याशिवाय स्वप्नांमध्ये झाड, फुले असं काही दिसले तर समजुन जा तुमच्या व्यापारी धंद्यामध्ये कृती होणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे.

तुमच्या घरा मध्ये भरपूर सुख-समृद्धी येणार आहे ,अशी स्वप्न हे दर्शवतात की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि शुभ बातम्या तुमच्या कानावर पडणार आहे तसेच असा स्वप्न तुम्हाला पडले तर ते गुप्त ठेवा. कोणाजवळ हि याची वाच्यता करू नका.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!