नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वास्तुशास्त्रानुसार आणि फेंगशुई शास्त्रानुसार अनेक गोष्टी आहेत ज्या घरात ठेवणे शुभ मानले जातात, अशा गोष्टी सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात.
त्यापैकीच एक म्हणजे माशांची जोडी होय. कारण घरात 2 माशांची मूर्ती किंवा भिंतीवर दोन माशांचे चित्र किंवा साक्षात फिश टॅंकमध्ये दोन मासे ठेवल्यामुळे त्या व्यक्ती धनवान आणि सौभाग्याचे स्वामी बनतात आणि त्यांना नोकरी व्यवसायात पदोन्नती ही मिळते, असं सांगण्यात येतं.
चला तर मग जाणून घेऊया घरात माशांचे जोडी ठेवण्यामागे काय शास्त्र आहे?
काही लोक घरात सजावटीसाठी किंवा शुभकार्यासाठी मत्स्यालय ठेवतात. यामध्ये रंगीबिरंगी मासे ठेवतात. परंतु जर तुम्हाला एक्वेरियम नको असेल तर तुम्ही पितळेचे किंवा चांदीच्या माशांच्या मूर्ती घरात ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार ते चांगला मानलं जातं.
वास्तू आणि फेंगशुईमध्ये चांदी किंवा पितळी धातू पासून बनलेल्या मत्स्य मूर्तीचे महत्त्व सांगितले गेले, अशा मूर्ती घरात धन आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करतात. कारण मासे हे उत्तम आरोग्य सुख-समृद्धी, संपत्ती आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं.
तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल किंवा नोकरी-धंद्यासाठी प्रगती हवी असल्यास घराच्या भिंतीवर माशांची चित्र किंवा पेंटिंग लावणं उत्तम मानले जात. मात्र हे पेंटिंग किंवा चित्र फक्त दोन माशांच्या जोड्यांची असावेत त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होते आणि पैसा मिळवण्याची शक्यता वाढते, असे सांगण्यात येत.
याचबरोबर, फेंगशुई हे चीनची वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारती ठेवलेल्या पवित्र वस्तूची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे.
हे शास्त्र देखील आपल्यासारखंच पंचमहाभूतांवर आधारित आहे. याच फेंगशुईनुसार गोल्डफिश घरांत ठेवण्याचे काय फायदे आहेत? तेही जाणून घेऊया..
सोनेरी मासे 2 प्रकारे ठेवता येतात. पहिली म्हणजे त्याची मूर्ती किंवा दुसरं मत्स्यालयात जिवंत असलेले मासे सुद्धा ठेवू शकतो. दोन्ही मधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढले जाते.
या व्यतिरिक्त गोल्डन फिश ची सुंदर मूर्ती ठेवल्यास सौभाग्य सुद्धा प्राप्त होतं असेही म्हटल्या जात. हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात. घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्ड फिश खूप मदत करतात करत. या माशांची मूर्ती ठेवल्या समृद्धी सुद्धा येते आणि घरात संपत्ती वाढते.
तसेच आर्थिक अडचणी कमी होतात. त्यामुळे गोल्डफिश घराच्या ड्रॉईंग रुमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते की आनंद आणि शांती तसेच समृद्धी आणते. घरातल्या माशांची उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही असं सांगितलं जातं.
याविषयी आणखी सांगायचं झालं तर वास्तुशास्त्रानुसार याचा मनुष्याच्या जीवनात बराच प्रभाव पडतो. हे पाचही घटक मत्स्यालयाच्या आत उपस्थित असतात आणि जेव्हा हे पाच घटक एकमेकांशी मिसळतात तेव्हा ते सकारात्मक ऊर्जा वाहतात असे म्हणतात.
तसेच मत्स्यालयाचा आतला पाण्याचा आवाज घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा प्रवाह वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होतो, असं सांगितलं जात. आपल्या घरात मत्स्यालय असल्यास आपल्या घरात नकारात्मक ऊर्जे दूर होते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments