नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण ज्या वस्तू परिधान करतो त्या प्रत्येक वस्तूच स्वतःच एक आगळ वेगळ वैशिष्ट्य आहे महत्त्व आहे. आपण अनेक लोकांच्या पायात किंवा हातामध्ये काळा धागा काळा दोरा बांधलेला पाहिलेला असेल.
मित्रांनो हा धागा शक्यतो नजर दोष किंवा कोणतीही बाधा होऊ नये यासाठी बांधला जातो.
मात्र लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लाल रंगाचा रेशमी धागा रेशमी दोरा अनेक लोक बांधतात. आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये. मात्र केवळ हा धागा बांधल्याने लक्ष्मी आकर्षित होत नाही.
त्याची एक विशिष्ट विधी असते. आज हीच विधी आपण जाणून घेणार आहोत. विधी म्हणजे काय? तर हा धागा नक्की कोणत्या दिवशी बांधावा, कोणत्या वारी बांधावा, वेळ कोणती असावी .
आणि हा धागा बांधताना कोणत्या या मंत्रांचा जप करणे आवश्यक असत. जेणेकरून हा धागा सिद्ध बनेल आणि लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल.
आज आपण हा उपाय पाहणार आहोत यासाठी शुक्रवारचा दिवस किंवा रविवारचा दिवस अतिउत्तम राहील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही आठवड्यातील कोणत्याही वारी हा उपाय करू शकता.
मात्र रविवार आणि शुक्रवार हे अत्यंत शुभ वार आहेत हा उपाय करण्यासाठी. कारण रविवार प्र त्य क्ष सूर्य देवतेचा वार आहे. सूर्य देव की, जे जीवनामध्ये यश प्राप्त करून देतात, जीवन उज्ज्वल बनवतात,
जीवनामध्ये चैतन्य निर्माण करतात. हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठी नव्हे म्हणजे पैसा प्राप्त करण्यासाठीच नव्हे तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करायचे असेल,
सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तरीसुद्धा आपण करू शकता. कार्यक्षेत्रांमध्ये यामुळे यश नक्की मिळत.
जर लक्ष्मीची कृपा असेल तर जीवनातून गरिबी नक्की निघून जाते. पैसा धन, वैभव, ऐश्वर्य प्राप्त होऊ लागतात. मित्रांनो दोन वार सांगितले शुक्रवार किंवा रविवार. मात्र आपण आपल्या सोयीनुसार इतर वार सुद्धा निवडू शकता.
हा उपाय करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम असते. जेव्हा सूर्य उगवत असेल, सूर्योदय होत असेल. आपल्या भागामध्ये सूर्योदय कधी आहे हे लक्षात घ्या आणि सकाळी 7.30 वाजायच्या आत हा उपाय आपण नक्की करा.
यासाठी जो धागा, जो दोरा आपल्याला आवश्यक आहे. तो लाल रंगाचा रेशमी धागा रेशमी म्हणजे सिल्क कॉटनचा घेऊ नका. लाल रंगाचा रेशमी धागा आपल्याला आवश्यक आहे.
आपल्या हाताच्या लांबी इतका म्हणजे आपल्या बोटांपासून ते आपल्या जे शोल्डरस आहेत जो खांदा आहे तिथपर्यंत इतक्या लांबीचा धागा आपण घ्यायचा आहे. तर आपण सकाळी शुक्रवारी किंवा रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे.
ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वीचा एक ते दीड तासांचा कालावधी थोडक्यात सूर्योदय होण्यापूर्वी उठा स्वच्छ स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि.
त्यानंतर आपण सूर्य देवांकडे पाहत म्हणजे पूर्व दिशेकडे पाहत जेव्हा सूर्य उगवत असेल तेव्हा तांब्याभर जल, तांब्याभर पाणी सुर्यदेवांना अर्पण करा. अर्ग्या म्हणून अर्पण करा.
अर्पण करताना ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमः किंवा सूर्य देवतेच्या कोणत्याही मंत्रांचा जप आपण करू शकता. हे पाणी आपण अर्पण करायच आहे. लक्षात ठेवा.
अर्ग्यानअर्पण करताना त्या तांब्यात थोडंसं पाणी शिल्लक ठेवा. ते आपल्याला नंतर आवश्यक असणार आहे. अर्ग्या अर्पण करून झाल्यानंतर आपण सूर्य देवांना हळदी कुंकू व्हायचं आहे.
काही फुले आपण अर्पण करू शकता शक्यतो लाल रंगाची फुले अर्पण करा आणि त्यानंतर जो धागा आहे हा धागा आपण आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे.
आपल्या उजव्या हातात हा धागा घ्यायचं आहे.
आपण जे जल सूर्य देवांना अर्ग्या म्हणून अर्पण केलं होतं हे थोडंस जल या धाग्यावरती शिंपडायचं आहे आणि हा धागा आपल्या उजव्या हातात घेऊन ती मूठ बंद करून उजव्या पायावर उभा राहून या मंत्राचा आपण जप करायचं आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments