नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्री सुरु होण्यापूर्वी मुख्य दरवाजासाठी देवीच्या सेवेसाठी ह्या 2 वस्तू..
श्री स्वामी समर्थ, आपल्या हिंदु धर्मामध्ये वास्तुशास्त्राला खुप महत्वाचे स्थान आहे, कारण त्यानुसार आपल्याला आपल्या वास्तू मधील काही दोष दूर करण्यासाठी मदत होत असते.
तर वास्तू शास्त्रानुसार,आपल्या घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन राखण्याचे काम हे उंबरठा करीत असतो.त्यातुन आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करीत असते,
त्यामुळे वास्तुशास्त्रात आपल्या घराच्या दरवाजाला अतिशय महत्त्वाचा मानले जाते. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल, तरी अनेक शुभ परिणाम आपल्या घरात होण्यास सुरुवात होते, तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
त्यामुळे बाहेरील वाईट आणि नकारात्मक शक्तीपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण हा उपाय नक्कीच केला पाहिजे. जर आपल्या घराच्या मुख्य दारावर ही अत्यंत प्रभावी एक वस्तू लावल्यास,
आपल्या घराचे कायमस्वरूपी रक्षण होण्यास मदत होईल.तसेच तुमच्या परिवाराची आणि घराचे रक्षण होईल आणि कोणतीही व्यक्ती तंत्र-मंत्रा करून,आपले काहीही करू शकणार नाही.
या वस्तूमध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा बाधा यांचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. याशिवाय कोणाचीही नजर तुमच्या घराला लागणार नाही, कारण संपूर्ण तुमच्या घराचे या वस्तूमुळे संरक्षण होईल.
त्यासाठी तुम्हाला फक्त ही 1 वस्तू, तुमच्या घराच्या मुख्य दारावर लावायची आहे. हा उपाय करण्यासाठी, एक लावायची ही आता ही वस्तू म्हणजेच, तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक शनियंत्र लावायचे आहे.
यासाठी तुम्ही या शनियंत्राची खरेदी कोणत्याही पूजेचा दुकानातून किंवा याची ऑनलाइन सुद्धा मागवू शकता.हे शनियंत्रा खरेदी केल्यानंतर, त्याला तुम्हाला फक्त शनिवारच्या दिवशी लावायचे आहे, तेही दुपारच्या 12 वाजेच्या आत लावणे आवश्यक आहे.
आपल्याला हे शनि यंत्र आपल्या घराच्या मुख्य दारावर लावायचा आहे,जर तुमच्याकडे हे शनियंत्र असल्यास किंवा तुम्ही आणलं असेल, तर शनिवारच्या दिवशी त्या शनियंत्राला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
मग हे शनियंत्र आपल्या मुख्य दारावर लावावे.तसेच मुख्य दाराच्या मधोमध किंवा त्यांच्या वरच्या बाजूला लावू शकता.
हे शनियंत्र लावल्यानंतर, त्याला हळदी-कुंकूने या शनियंत्राची पूजा करावी आणि त्याला अगरबत्ती दाखवावी. मात्र हे शनियंत्र कायमस्वरूपी तुमच्या घराच्या मुख्य दारावरच लावून ठेवणे आवश्यक आहे.
ज्या जागेवर तुम्हाला सोयीस्कर वाटेल, अशा बाहेरच्या बाजूने कोणत्याही जागेवर हवं शनियंत्र लावावे आणि त्याची पूर्ण श्रद्धेने पुजा करावी. याशिवाय हे शनियंत्र तुम्ही भिंतीवर किंवा दारावर सुद्धा लावू शकतात,पण शनि यंत्र अवश्य लावाले पाहिजे.
कारण शनि देवाचे यंत्र असलेले हे शनियंत्र आपल्या अनेक प्रकारच्या समस्या दूर करीत असते. तसेच शनिदेव स्वतःच्या आपल्या घराचे रक्षण करतील आणि आपल्या परिवाराचे रक्षण करीत असतात.
यामुळे कोणतीही प्रकारची बाधा किंवा नजरदोष ,कोणतीही पीडा तुमच्या घरात येणार नाही,त्यामुळेच हे प्रभावी शनियंत्र तुम्हाला मुख्य दाराच्या बाहेर लावले पाहिजे.
याशिवाय, हे शनियंत्र आपल्या घराच्या दारावर लावल्यास, आपल्या कुंडलीतील शनीच्या कोणत्याही प्रकारच्या दोषापासून बचाव करण्यासाठी या शनियंत्राचा उपयोग होतो.
तसेच या यंत्राच्या कृपेने तुमची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते, त्यामुळे परिणामी तुमचा समाजात आदर निर्माण होतो. याशिवाय ,जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल,
तर तुमच्या घरात किंवा कार्यालयात शनि यंत्र स्थापित केले पाहिजे. घरात शनि यंत्र बसवल्याने सकारात्मक ऊर्जा पसरते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments