नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, अधिक मासात सौभाग्यवती स्त्रिया जोडवी का बदलतात ? जोडवी बदलताना ही चूक करू नका..
या वर्षी श्रावण महिन्यात अधिक महिने असल्याने, सावन महिना 59 दिवसांचा म्हणजेच 2 महिन्यांचा असणार आहे. दर 3 वर्षांतून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिना असतो. ज्याला अधिक मास म्हणतात.
अधिक मास ही काळाची परिस्थिती अनुकूल करण्यासाठी केली जाते. हिंदू धर्मात आदिमासला खूप महत्त्व आहे.
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी जुलै महिन्यात अधिक महिने येत आहेत. म्हणजे आणखी एक हिंदू महिना. अधिक महिन्यांमुळे हे वर्ष 12 नव्हे तर 13 महिन्यांचे असणार आहे. सनातन धर्मात अधिमास हा पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ व पुण्यपूर्ण महिना मानला जातो.
18 जुलै, मंगळवारपासून अधिक मास किंवा माल मास सुरू होत आहे. अधिक मासला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण त्याचे स्वामी भगवान श्री हरी विष्णू आहेत. असे मानले जाते की या महिन्यात केलेले धार्मिक कार्य आणि उपासना पाठ अधिक फळ देतात आणि मोक्ष प्राप्त होतो.
हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नात्यातील ऋणानुबंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात ,
अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते.
आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना ‘नारायणा’ समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे.
यंदा अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण.
विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.
नवीन लग्न झालेल्यांसाठी या महिन्याचे विशेष महत्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात. तसेच, काही ठिकाणी या महिन्यात जावयाला घरी बोलवले जाते,
त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. त्याचं मानपान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे. जोडवी हा सुवासिनीचा अलंकार असून ते पायात घातले जातात. अधिक मासाचे निमित्त साधून दर तीन वर्षांनी जोडवी बदलण्याची रीत काही भागांमध्ये आहे. अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवीन जोडवी घेतली जातात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments