नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जेष्ठा गौरी आवाहन अगदी सोप्या पद्धतीने असा करा गौराईंचा तीन दिवसीय सण संपूर्ण माहिती..
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात आपण गौरी आवाहन करतो. गौरी आपल्या घरी येतात. सर्वात प्रथम आपण मंगलस्नान करून स्वतःच्या कपाळाला कुंकू लावून घ्या व आपल्या देवघरातील सर्व देवतांना नमस्कार करावा आणि पूजेस सुरुवात करावी.
समईतील ज्योती प्रज्वलित कराव्यात. पूजेला प्रारंभ करताना सर्वात प्रथम आचमन करावे. “केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः,” अशी नावे म्हणून त्यातील प्रत्येक नावाच्या वेळी एकदा असे पाणी पळीने उजव्या हातात घ्यावे
आणि प्यावे.मग यानंतर एक परीने पाणी ताम्हणात सोडावे आणि गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, श्री विक्रमाय नमः, वामनाय नमः,श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, वासुदेवाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः , पुरुषोत्तमाय नमः आणि मग श्री कृष्णाय नमः असा जप करावा.
यानंतर आपला उजवा हात उजव्या आणि डाव्या कानाला लावावा. त्यानंतर श्रद्धेने हात जोडून पुढील मंत्र म्हणावेत, “श्री महागणपती पतये नमः, श्री गुरुवेय नमः, सरस्वतेय नमः, इष्टदेवता नमः, कुलदेवता नमः, स्थानदेवता नमः,
वासुदेवाय नमः, वाणीनिरंतराय नमः, ओम नमः श्री लक्ष्मीनारायण नमः, मातृ-पितृ ओम नमः हे मंत्र झाल्यावर हा गणपती मंत्र बोलावा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
असे म्हणून मनोभावे नमस्कार करावा. गणपतीची पूजा करावी आणि गणपतीच्या मूर्तीवर किंवा ताम्हनात ठेवलेल्या सुपारीवर गणपती म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. तसेच गणपतीची मूर्ती असेल, तर फुलाने पाणी शिंपडावे आणि नसेल तर पळीने पाणी घालावे.
त्यानंतर तांदळाची रास तयार करून, त्यावर सुपारी पुसून ठेवावे.मग त्यानंतर तांबड्या रंगाचे अर्पण करावे. गंध लावून अक्षता वाहाव्यात.तसेच हळद-कुंकू वाहावे, शेंदूर आणि अष्ट गंध लावावे. गंधात बुडवुन देठ गणपतीकडे करून दुर्वा व्हाव्यात. उदबत्ती निरांजनाने ओवाळावे.
त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. डावीकडून उजवीकडे त्या गूळ-खोबर्याच्या वाटी फिरवावी. मग पाणी ठेवावे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करावा.यानंतर आपल्या कलश पूजन करावे.
यामध्ये सर्वप्रथम कलशामध्ये शुद्ध जल म्हणजे पाणी घेऊन,त्याला गंध, अक्षता व फुले अर्पण करावीत.मग त्यातील पाणी घेऊन पूजा सामग्रीवर आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यावे आणि कलश पूजन मंत्र बोलावा.
ॐ वरुणस्योत्तम्भनमसि वरुणस्य स्कम्भसर्जनी स्थो वरुणस्य ऋतसदन्यसि वरुणस्य ऋतसदन्मसि वरुणस्य ऋतसदनमा सीद ।
यानंतर घंटा पूजन करावे. यानंतर आपण घंटा वाजवावी आणि तिच्या ताम्हनामध्ये घेऊन त्यावर शुद्ध जल अर्पण करावे. गंध, अक्षता व फुले वाहावीत. घंटा पूजनाचा श्लोक म्हणावा. मग यानंतर ती दीप पूजा करावी.
समईला गंध, अक्षता आणि फुले अर्पण करावीत आणि देवीला हात नम्रतेने नमस्कार करावा.
मग यानंतर गौरीची प्रार्थना करावी. हे गौरी माते, तुझ्या कृपाप्रसादाने आमच्या सर्वांचे कल्याण व्हावे, आमच्या मनातील इच्छा पूर्ण होत ,आमचे आयुष्यमान वाढो,ऐश्वर्य समृद्धी होउदे, आमचे आरोग्य उत्तम राहू,
परिस्थिती प्रमाणे मी तुझी पूजा करीत आहे, शिवाकडून सोनपावलांनी आमच्याकडे ये आणि आमच्या घरी सुखा-समाधानाने रहा.
हे गौरी माते तुझ्यासाठी सुगंधित पाणी आणले आहे. त्याचा तू स्वीकार कर,असे म्हणून देवीवर फुलाने पाणी शिंपडावे. हे तेरी माते तुला कलम कपड्याचे वस्त्र आम्ही अर्पण करीत आहोत, त्यास आपण स्वीकार कर देवीला साडी अर्पण करावी,
हळदीकुंकू अर्पण करावे आणि काजळ लावावे. बांगड्या आणि मणी मंगळसूत्र अर्पण करावे. हे गौरी माते मी तुला सुगंधी फुले अर्पण करीत आहे, त्याचा तू स्वीकार कर.मग यानंतर निरंजन प्रज्वलित करावे व ओवाळावे.
तसेच वातावरण सुगंधित व्हावे व अनिष्ट शक्ती नाहीशा व्हाव्यात ,म्हणून देवासमोर धुप लावण्याचे प्राचीन पद्धती आहे, पद्धतीने देखील हा धूप लावावी.
सर्वमंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके. शरणनेताम्बिके गौरी नारायणी नमोस्तुते.. अस्य स्वयंवरकलामंत्रस्य ब्रम्हा ऋषि, अतिजगति छन्द:, देवीगिरिपुत्रीस्वयंवरादेवतात्मनो अभीष्ट सिद्धये
त्यानंतर दूध गूळ आणि साखरेचा नैवेद्य आपण अर्पण करावा आणि नमस्कार करावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments