नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदू धर्मात करवा चौथचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हे व्रत दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते.
या दिवशी महिला सकाळी स्नान करून व्रत करतात. दिवसा ते एकत्रितपणे करवा चौथची कथा ऐकतात आणि रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडतात.
या वर्षी करवा चौथच्या पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त केले जात आहेत. हिंदू कॅलेंडरनुसार, करवा चौथच्या दिवशी, अमृत काळात पूजेसाठी 4:08 ते 5.50 पर्यंत सर्वोत्तम वेळ असेल.
अशा प्रकारे, तुम्हाला पूजेसाठी एकूण 1 तास 42 मिनिटे वेळ मिळेल. याशिवाय सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 या वेळेत होणाऱ्या अभिजीत मुहूर्तावरही तुम्ही पूजा करू शकाल.
या वर्षी करवा चौथला चंद्रोदयाची वेळ रात्री 08:09 सांगितली जात आहे. या दिवशी सकाळी स्नान करून व्रत करावे. प्रथम हातात गंगाजल घेऊन देवाचे ध्यान करावे. नंतर एका भांड्यात पाणी ठेवा.
यामध्ये दिवसभर निर्जला व्रत ठेवले जाते. या दिवशी माता गौरीचे चित्र पिवळ्या मातीने बनवावे. त्यांना लाल चुनरी, बिंदी, मध, रोळी, चंदन, अक्षत, फुले, नैवेद्य इत्यादी अर्पण करा.
अथवरी आणि हलव्याच्या आठ पुर्या लक्ष्मीला अर्पण करा. तसेच हा एक उपाय नक्कीच करावा.
आपण पाहणार आहोत की, रात्री झाडूखाली अशी कोणती वस्तू लपवून ठेवावी त्यामुळे आपले नशीब पलटेल. असे म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणी देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते आणि झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते.
असे म्हणतात या दिवशी तीन झाडू गुपचुपपणे कोणालाही न सांगता सकाळी सकाळी अंधारात एखाद्या मंदिरात नेऊन ठेवले किंवा त्यातीलच एका झाडूने संपूर्ण मंदिर स्वच्छ करून ते तीनही झाडू गुप्तदान म्हणून तेथेच ठेऊन दिले.
आणि त्या झाडुनी जसजशी मंदिराची साफसफाई होईल तसतशी आपल्या घरातील दारिद्य्र, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, दुख, त्रास, अडचण, बाधा या हळूहळू दूर होऊ लागतील.
आपण आपल्या घरात ज्या झाडूने घराची स्वच्छता करतो तो झाडू कधी कोणालाही देऊ नये. घरातील झाडू वापरून वापरून खराब झाला असेल झाडताना झाडूचा काही भाग निघत असेल तर असा झाडू त्वरित बदलावा.
जुना खराब झालेला व तुटलेला झाडू कधीह घरात स्वच्छतेसाठी वापरू नये. यामुळे वास्तु दोष उत्पन्न होतो. घरातील झाडू जर कोणाला दिला तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते व घरातून निघून जाते.
जेवण केल्यानंतर जमिनीवर जर उष्टे पडलेले असेल तर सरळ झाडूने झाडू कधीही एकत्र करू नये. आधी ते कपड्याने पुसून स्वच्छ करावे. त्यानंतरच झाडुनी झाडावे. नाहीतर घरात वास्तुदोष उत्पन्न होतो.
घरातील फरशी पुसताना त्या फरशी पुसण्याचा पाण्यात थोडेसे मीठ टाकावे यामुळे घरातील जीवजंतू नष्ट होतात. नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही आणि देवी लक्ष्मीचा आपल्यावर घरावर आशीर्वाद राहतो.
याशिवाय, झाडू नेहमी कोपर्यात लपवून ठेवावा. आपल्या घरातील झाडू कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे झाडू ठेवावा बाहेरच्या व्यक्तीची आपल्या झाडूवर नजर पडल्यास हा अपशकुन मानला जातो.
मित्रांनो किचन मध्ये किंवा अन्नधान्य ठेवण्याच्या जागी कधीही झाडू ठेवू नये. नाहीतर आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा लवकर लवकर संपू लागतो. अन्नधान्यात बरकत राहत नाही. तसे आरोग्याशी निगडित समस्याही उद्भवतात.
झाडू कधीही खराब होऊ देऊ नये. झाडू नेहमी स्वच्छ राहील या गोष्टीकडे लक्ष द्यावे. घरात नवीन झाडू आणला की त्याचा वापर करण्यापूर्वी त्याच्या मुठीला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्याचे पूजन करावे व त्यानंतरच त्या झाडूचा वापर करावा.
यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. जर एखादा लहान बालक अचानक पणे हातात झाडू घेऊन घरात झाडू मारू लागला तर समजून जावे अचानकपणे आपल्या घरी पाहुणे येणार आहेत.
झाडूला कधीही पाय लावू नये आणि जर चुकून कधी आपल्या पायाचा स्पर्श झाला तर लगेच झाडूला नमस्कार करावा. झाडूचा शरीराला स्पर्श होणे ही अपशकुन मानले जाते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments