नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,हिंदु धर्मातील, भावा-बहिणीच्या नात्याचा एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन होय.यावर्षी हा राखी पौर्णिमेचा उत्सव 11 ऑगस्टला आला आहे.या वर्षी श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी श्रवण नक्षत्राचा योग जुळून आल्यामुळे, यावर्षी रक्षाबंधनचा हा उत्सव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
यावर्षी 11 ऑगस्ट रोजी येणाऱ्या, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनच्या या पवित्र दिवशी सगळ्याच महिला आपल्या भावाला राखी बांधत असतात,आणि त्याच्या अखंड दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत असतात.
तसेच सर्व भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला रक्षण करण्याचे वचन देत असतात. परंतु या मंगल दिवशी महिलांनी भावाला राखी बांधावी, पण त्यासोबत आपल्या गुरुंना,म्हणजे आपल्या स्वामी समर्थांना सुद्धा राखी बांधाली पाहिजे. ही राखी तुम्ही अत्यंत सोप्या आणि साध्या सरळ पद्धतीने बांधू शकता.
यासाठी तुम्ही तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल,किंवा फोटो असेल,तर त्याला बांधू शकता किंवा शक्य असल्यास, स्वामी केंद्रात जाऊन मठात जाऊन सुद्धा महिला स्वामी समर्थांना राखी बांधू शकतात.
यासाठी तुम्ही फक्त एक विशेष ताट तयार करायचा आहे.या ताटामध्ये आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा ठेवायचा आहे.तसेच अष्टगंध घ्यावे, कारण जेव्हा आपण भावाला राखी बांधते, तेव्हा कुंकूचा वापर करीत असतो.पण स्वामींना राखी बांधायचे असल्यास,आपण अष्टगंध वापर केला पाहिजे.
त्या सोबत एखादी गोड पदार्थ किंवा मिठाई असा कोणताही गोड पदार्थ घेऊ शकता किंवा साखर घेऊ शकता.त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला स्वामींना बांधण्यासाठी एक राखी किंवा देवराखी घायची आहे.
तुम्हाला कोठही ही देवराखी उपलब्ध होईल आणि शक्य असल्यास एक नारळ ठेवू शकता.
आपल्याला ही राखी फक्त शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थ यांना बांधायचे आहे. कारण अशुभ मुहूर्तावर हा उपाय केल्यास आपल्याला फलप्राप्ती होणार नाही.तसेच या शुभमुहूर्तावर तुम्ही भावाला राखी बांधू शकतात,
त्यानंतर स्वामींना बांधू शकता.यासाठी तुम्हाला स्वामींच्या समोर बसून,सर्वप्रथम स्वामीना नमस्कार करायचा आहे,मग त्यानंतर त्याना अष्टगंधाचा टिळा स्वामींच्या कपाळी लावायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला राखी बांधून मनोभावे पूजा करावी.
जर तुमच्या घरी स्वामींची फोटो लावलेला असल्यास, आपण तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा स्वामींची मूर्ती असेल, तर स्वामींच्या मूर्ती समोरच तुम्ही राखी ठेवू शकतात. त्यानंतर स्वामींना गोड पदार्थ खाऊ घालायचे,
म्हणजे श्री स्वामी समर्थाना मिठाई अर्पण करायची आहे. याशिवाय नारळ असेल, तर नारळ स्वामींच्या मूर्ती वरून ओवाळण्याचा आहे.
त्यानंतर दिव्याने स्वामींची आरती करावी. मग त्यानंतर स्वामी हात जोडून प्रार्थना करायची आहे की,” स्वामी समर्थ महाराज, तुम्ही सदैव रक्षण करा ,जशी आता पर्यंत साथ दिली, तशीच पुढे साथ द्या.”अश्या साध्या पद्धतीने तुम्ही स्वामी समर्थांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधू शकता.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments