16 नोव्हेंबर 2022 कालभैरव जयंती 3 उपाय शत्रु बरबाद होईल, अनामिक भीती आजारपण..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, हिंदू पंचांगनुसार, कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्णाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान कालभैरवाने अवतार घेतला होता.

धार्मिक ग्रंथांमध्ये भगवान कालभैरवाचे वर्णन भगवान शिवाचे उग्र रूप म्हणून केले आहे. भक्तांसाठी कालभैरव दयाळू, परोपकारी आणि लवकर प्रसन्न करणारा मानला जातो.

पण अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा करणारा आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा विधीपूर्वक केली जाते.

सगळ्यांना वाटत असते की, आपली प्रगती व्हावी आणि स्वतःकडे मुबलक पैसा असाव. तसेच आपले व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले रहावे. जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र होतात तर काही शत्रू बनतात.

कालांतराने हे शत्रु इतके बलवान होतात की, आपल्याला त्याचा खुप भयंकर त्रास होतो. यालाच आपण शत्रु पिडा म्हणतो. तुम्ही जेव्हा चांगल्या कामात यश मिळवत असाल किंवा जेव्हा तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा ही प्रगती काही व्यक्तींना बघवत नसते, तेव्हा ते तुमचे शत्रू होतात.

जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांकडून त्रास होत असेल किंवा कामाच्या ठिकाणी बॉस किंवा तेथील लोकांकडून त्रास होत असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यात तोटा किंवा स्पर्धकाकडून काही त्रास होत असेल तर,

अशावेळी जर तुम्ही हा उपाय कराल तर तुमचा शत्रू गुडघे टेकत येतील. तुमचे शत्रू बलहीन होतील. तसेच या उपायांनी तुम्हाला शत्रुपीडेपासून मुक्ती मिळेल. हा उपाय एकदम सोपा आहे.

तो म्हणजे आपल्या घरातील देवपूजेतील दिव्याच्या संदर्भात आहे. हा दिवा लावताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. कारण या मंत्राच्या सामर्थ्याने तुमचे शत्रु कमी करण्यासाठी मदत होईल.

आपण जी रोज देवपूजा करतो त्यापुढे आपण दिवा नक्की लावत असाल. आपण देवासमोर दिवा लावण्याचे कारण दिव्यामुळे शुभ आणि मंगल गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात.

देवीदेवता, भगवंत, स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात. खरतर दिवा आपल्याला परमात्माशी, ईश्वराशी जोडत असतो आणि म्हणूनच कोणतेही मंगल कार्य असुद्या, मंगल कार्यामध्ये आपण हा दिवा नक्की लावत असतो.

ज्या घरामध्ये सकाळी, संध्याकाळी दिवा लावला जातो त्या घरातील वातावरण पवित्र असते. सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. हा उपाय करताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. पहिला नियम आहे. हा दिवा लावताना स्त्री असेल तर स्त्रीने डोक्यावर पदर नक्की घेतला पाहिजे.

जर पुरुष हा दिवा लावत असेल तर त्या पुरुषाने आपल्या डोकावरती टोपी नक्की घातली पाहिजे. जर तुमच्याकडे टोपी नसेल तर तुम्ही डोक्यावर रुमाल घेऊ शकता. दुसरी गोष्ट ती आहे.

म्हणजे आपण दिवा लावताना त्या दिव्याखाली एखादे झाडाचे पान, फुल किंवा तांदूळ धनधान्य ठेवायचे आहे आणि नंतर त्या धान्यावर, फुलावर, पानावर हा दिवा ठेवायचा आहे.

दिवा तसाच जमिनीवर ठेवायचा नाही. त्यामधील कोणतीही एक वस्तू आपण दिव्याखाली नक्की ठेवायची आहे.

दिव्याला आपण प्रत्यक्ष भगवंतासारखे मानतो. परमेश्वराला आपण दिव्यामध्ये पाहत असतो. त्यामुळे त्याखाली कोणतीही एक गोष्ट नक्की ठेवायला पाहिजे. आपण दिवा लावताना जे तेल वापरायचे आहे, ते मोहरीचे तेल असावे.

जर तुमच्याकडे मोहरीचे तेल नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता. एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन लवंगा नक्की टाका. शास्त्रामध्ये लवंग दिव्यामध्ये टाकल्याने खुप चमत्कारिक फायदे होतात.

त्यामुळे आपली शत्रूपिडा नाहीशी होऊ शकते. लवंग टाकल्यानंतर आपण दिव्याची पुजा करायची आहे. देवीदेवतांची पुजा करायची आहे. स्वामींची, भगवंतांची हळदी कुंकू लावून, अक्षदा वाहून पुजा करायची आहे.

हा उपाय शत्रूपिडा नष्ट करण्यासाठी करत आहे. शत्रूपासून आपली मुक्ती होण्यासाठी करत आहोत आणि हा दिवा लावल्यानंतर त दिव्यासमोर, देवांसमोर, स्वामींसमोर हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे.

मंत्र असा आहे – “शुभम करोती कल्यानमः, आरोग्यम धनसंपदा”, “शत्रू बुद्धी विनाशाय , दिपज्योति नमस्तुते”.

हा चमत्कारिक मंत्र म्हटल्यानंतर आपण भगवंतांना, देवीदेवतांना, स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि ही एक गोष्ट सांगायची आहे की माझी या शत्रूंपासून मुक्तता होऊ दे,

शत्रूंच्या त्रासातून मुक्त अशी प्रार्थना करायची आहे. या चमत्कारिक उपायाने तुमच्या आयुष्यातील शत्रुपिडा नक्की नष्ट होतील.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!