नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुवार दिनी पुष्यनक्षत्र येणे म्हणजेच गुरुवार आणि पुष्यनक्षत्र यांचा योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो.
पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे. म्हणूनच आपण याला अमृतयोग असेही संबोधतो. पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण शुभ समय असतो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो.
असा हा शुभ योग 2022 या वर्षी तिनदा आलेला आहे. तर येत्या 30 जून ला हा योग आहे. कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभकार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो.
जसे की गृहप्रवेश, सोने व चांदी ह्या धातूंची खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादि. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या योगावर केलेली गुरुसेवा, गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र, गुरूचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदाई ठरते.
कारण अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो.
या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो.
नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही.
कारण याचा अर्थ पुष्यचा अर्थ पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा असा आहे. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे.
ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे.
30 जून गुरूवारच्या दिवशी सगळ्यात मोठा योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी फक्त हा एक मंत्र बोला. पैशाची कमी राहणार नाही, धनात तुमच्या नेहमी वाढ होईल.
कारण या दिवसाची अशी ओळख आहे की, आपण कोणतीही वस्तू घेतली तर ती वस्तू आपल्या जवळुन आपल्या घरातून कधीच जात नाही म्हणून या दिवशी बरेच लोक दाग-दागिने आणि महत्वाच्या वस्तू घेतात.
आणि ते घेतलेलं सोनं किंवा वस्तू असतं ते कधीच विकला जात नाही ते नेहमी घरात राहत. तर मित्रानो आजची परिस्थिती अशी आहे की, प्रत्येक माणूस सोना आणि चांदी घेऊ शकतो असं नाही.
पण त्या गोष्टीकडे न जाता आपण घरातच राहून गुरूपुष्यामृत योगाचे दिवशी देवाची सेवा केली आणि स्वामींची सेवा केली तर नक्कीच आपल्या घरात नेहमी धनात वाढ होईल आणि पैसाची कमी कधीच होणार नाही.
कारण हा दिवस गुरूच्या दिवस असतो. अशी मान्यता आहे की, गुरू प्रसन्न तर सगळे काही आपल्या नशिबात असते म्हणून आपण गुरूला प्रसन्न करायचे. आपल्या पत्रिकेतला गुरु प्रसन्न झाला.
तर मग कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तर मित्रांनो हा मंत्र तुम्हाला 108 वेळेस म्हणजे संपूर्ण 1 माळ तुम्हाला या मंत्राचा जप तुमच्या देवघरात बस अगरबत्ती दिवा लावून करायचा आहे.
माळेने तुम्ही हा जप करू शकतात. सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल. याचबरोबर घरातील महिला किंवा पुरुष कोणीही त्या मंत्राचा जप करु शकतात.
हा मंत्र काही असा आहे की, “ॐ क्लीम बृहस्पतये नमः, ॐ क्लीम बृहस्पतये नमः”
तर हा गुरुचा मंत्र आहे. गुरूला प्रसन्न करा. त्यामुळे गुरूपुष्यामृत योगाचे दिवशी या मंत्राचा जप केल्याने घरात शांती प्रसन्नता येईल. नेहमी पैसात वाढ होईल आणि पैशाची कधी कमी भासणार नाही..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments