नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,”गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.
श्री दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि आनंदी ठेव हीच स्वामींच्या चरणी आणि दत्तगुरु महाराजांची प्रार्थना.
तुमच्या आयुष्यात खुप अडचणी आहेत, भयंकर संकट आहे सर्व काही करुन झालं पण अनुभव काही येत नाही. आता आम्ही आयुष्याला कंटाळून आहोत, असं जर वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला दत्त महाराजांच्या भक्त मधील दत्त महाराजांना प्रसन्न करणारी अत्यंत प्रभावशाली अशी 10 मिनिटांचे सेवा सांगणारा आहे.
ही सेवा तुम्हाला नित्यनियमाने गुरुपौर्णिमा येईपर्यंत करायचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील भयंकर संकटे सर्व अडचणी नक्कीच निघून जातील. प्रत्येक इच्छा दत्तगुरु महाराज हमखास पूर्ण करतील.
फक्त ही सेवा तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे. ही सेवा करताना तुम्हाला दोन नियम पाळावे लागतील म्हणजे तुम्हाला मांसाहार टाळावा लागेल आणि महिलांनी ही सेवा मासिक पाळीमध्ये करू नये आपले 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर ही सेवा चालू करावे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही दत्त महाराजांचे सेवा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणार असाल तरच करा अन्यथा नाही केली तरी चालेल. तुम्हाला काय करायचं की, रोज सकाळी, दुपारी किंवा रात्री कोणत्याही वेळेत आपले हात-पाय स्वच्छ धुऊन किंवा.
स्वच्छ आंघोळ करून दत्त महाराजांच्या मूर्ती समोर किंवा तुमच्या घरी एखादा दत्तचा फोटो असेल तरच्या फोटो समोर शांत बसायचं आहे. त्यानंतर आपण 3 अगरबत्त्या घ्यायचे आहेत.
आपल्याला 3 अगरबत्त्या घ्यायचे आहेत यात अगरबत्त्या ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या नावाने आपण घेणार आहोत. या तीनही अगरबत्त्या प्रज्वलित करायचे आहेत, मग यानंतर तुम्हाला आपल्या दत्त महाराजांच्या फोटोकडे किंवा मूर्ती बघून डोळे शांत बंद करायचे आहेत .
आणि मग “श्री गुरुदेव दत्त,श्री गुरुदेव दत्त,श्री गुरुदेव दत्त” किंवा “अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त,अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त”, या दोन मंत्रापैकी तुम्हाला जो आवडेल त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या तीन अगरबत्त्या पूर्ण संपेपर्यंत चालू ठेवायचा आहे. या तीन अगरबत्त्या पूर्ण आपल्याला दत्त महाराज यांना एक विनंती करायची आहे,
” हे दत्तात्रय महाराज माझा या जगात तुम्हाला सोडलं तर कोणीच नाही, दत्तात्रय महाराज तुम्हीच माझे सर्वस्व आहात, तुम्हीच माझ्या सर्व इच्छा माझ्यावर आलेली सर्व संकट माझ्या आयुष्यातील भयंकर दुखत तुम्हीच नाही तर करू शकता”.
तुम्हाला फक्त इतकीच विनंती करायची आहे, मग बघा तुम्हाला हळूहळू कसा मार्ग सापडत जाईल. यानंतर आपल्याला अगरबत्तीची उदी आपल्या डोक्याला लावायची आहे आणि बाकीचे जे राहील उदी असेल.
आपल्या उजव्या हातावर घेऊन घराच्या चारही बाजूला मारायचे आहे, त्याने तुमच्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल.
तसेच तुम्हीही उदी एका छोट्याशा कापडात बांधून पॉकेटमध्ये किंवा तुमच्या पाकिटात ठेवू शकतात त्यामुळे आपण बाहेर गेल्यावर देखील आपलं रक्षण होईल दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहील.
इतके सेवा फक्त तुम्हाला गुरुपौर्णिमा येईपर्यंत किंवा गुरुपौर्णिमा झाल्यानंतर देखील तुम्ही कायम स्वरूपी करू शकता. बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. कारण अशक्य गोष्टी शक्य होतील.
हा दत्त महाराजांचा मार्ग तुम्ही प्रामाणिकपणे करत जा. बघा आज तुम्हाला क्षणोक्षणी साथ देतील. जेव्हा तुम्ही सुखात असाल तेव्हा दत्त महाराज तुमच्या बाजुला उभी असतिल आणि जेव्हा तुम्ही दुःखात असाल.
तेव्हा दत्त महाराज तुमच्या समोर असतील. या सेवेचा नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ही सेवा फक्त गुरु पौर्णिमे पर्यंत कोणत्याही वेळेत अगदी श्रद्धेने करुन बघा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments