नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,अगदी प्राचीन काळापासून असे काही प्राणी आहेत ते जर घरात आले तर घरांत लक्ष्मीचा वास होतो. आपल्या परंपरेनुसार आपण हे मानत आले आहोत व आजही आपण ते मानतो.
वटवाघुळ- जर वटवाघळाने घराच्या एका कोपऱ्यात घरटे केले व तिथेच ते राहू लागले. तर समजुन जा आपला वाईट काळ आला आहे. ज्या घरात वटवाघुळ येते तिथे आजारपण मृत्यू आणि संकटे येतच राहतात.
असे मानले जाते की, घरात वटवाघुळ येण्याने घरात वादविवाद वाढतात व संसार मोडतात. तसेच भाऊ बंधकीत वाटण्या होतात. त्या घरात नेहमी अपशगून घडतच असतात.
कावळा – कावळ्याचे घरात घरटे बांधून राहणे अपशगुन मानले जाते यामुळे ही संकटे येतात. त्यासोबतच स्वप्नात कावळे येणे हे सुद्धा संकेत आहेत. स्वप्नात कावळा काव काव करताना दिसणे किंवा घरात येऊन बसलेला दिसणे.
याचा अर्थ एखादा शोक समाचार मिळणार आहे असा होतो. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होण्याचे हे संकेत आहेत.
घुबड – घरात सारखे सारखे घुबड येणे व एकाच दिशेला तोंड करून सारखे ओरडणे हे अशुभ समजले जाते. असे मानले जाते की, एकदा किंवा दोनदा घरात घुबड येण्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते.
घरात आनंद व सुख-समृद्धी येते. परंतु नेहमी नेहमी घुबड घरात आल्यास आपण विनाशाकडे खेचले जातो व नेहमी संकटे व अडचणी येतात. हे पक्षी घरात येणे अशुभ मानले जातात व काही पक्षी असे आहेत की ते घरात येणे शुभ मानले गेले आहे.
जसे चिमणी तरही चिमणी जर आपल्या घरात येऊन घरटे करून राहत असेल तर ते खूपच शुभ समजले जाते. असे मानले जाते की त्या घरात साक्षात देवी लक्ष्मींचा निवास असतो.
त्या घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी व संकटे येत नाहीत. नेहमी आनंदी व प्रसन्न वातावरण राहते. त्याचप्रमाणे कबूतरही सारखे घरात येत असेल तर ते ही खूप शुभ असते. ते आनंद घेऊनच घरात येते. त्या बरोबर काहितरी शुभसमाचार कळवते…
दरम्यान, हे असे 5 पक्षी आहेत जर ते आपल्या घरात आलेत तर समजून जावं आपण दरिद्री होणार आहात. हेच नाही तर घरातील गर्भवती स्त्री वर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
हे पाच पक्षी घरात येणे खुपच अशुभ मानले जाते. घरात ‘अडीअडचणी व वादविवाद निर्माण होतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments