नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,भारतीय संस्कृती, परंपरा या जितक्या प्राचीन आहेत, तितक्याच त्या व्यापकही आहेत. भारतीय संस्कृतीत आचार पद्धतीने अधिक महत्त्व देण्यात आले आहे. माणसांच्या आचार कसा असावा, एखाद्या व्यक्तींने कसे वागावे, कसे बोलावे, त्याचा व्यवहार कसा असावा.
इथपासून आदर्श दिनचर्या कोणती इथपर्यंतचा व्यापक, सखोल आणि विस्तृत विचार आपल्या संस्कृतीत केलेला दिसतो. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत,
आदर्श दिनचर्या पाळल्यास आरोग्य, मन, विचार यांवर अगदी सकारात्मक परिणाम झाल्याचे निश्चित दिसून येईल, असा दावा वडील मंडळी करताना दिसतात.
ज्योतिषशास्त्रातही यासंदर्भात भाष्य केलेले दिसून येते. दुपारी नेमकी कोणती कामे करू नयेत, यावर विशेष भर दिल्याचे दिसून येते. दुपारचा कालावधी हा काही कामांसाठी वर्ज्य मानण्यात आला आहे.
यामुळे लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते. मान, सन्मान यात कमतरता येते. दुपारी सूर्याचा प्रभाव सर्वाधिक असतो. सूर्य हा मान, सन्मानाचा कारक मानला गेला आहे.
अशी कामे केल्यास कुंडलीतील सूर्याची स्थिती बिघडू शकते. यामुळे एखाद्या व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया…
अनेकदा थकवा येत असल्याने तुम्ही चुकीच्या वेळी सुद्धा झोपता, परंतु शास्त्रानुसार काही वेळा अशा आहेत तेव्हा झोपणे अजिबात योग्य नाही. चुकीच्या वेळेला झोपण्याने आराम तर मिळतो परंतु ती वेळ तुमच्यासाठी धोकादायक असते.
दिवसातील 24 तासांमधील काही वेळ असा असतो जेव्हा तुमच्या झोपण्यामुळे लक्ष्मीमाता तुमची साथ सोडू शकते. यावेळी झोपण्याने देवी-देवता नाराज होऊ शकतात…
शास्त्रात झोपेबाबत म्हटले आहे की, ‘दिवास्वापं च वर्जयेत’ ज्याचा अर्थ आहे की दिवसा झोपणे शास्त्रानुसार वर्ज्य आहे. तर गरजु म्हणजे लहान मुले, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती दिवसा झोपू शकतात. या लोकांना शास्त्रात दिवसा झोपण्याची सूट दिली आहे.
निरोगी व्यक्तीचे दिवसा झोपणे बरबादीला निमंत्रण देते. त्याच्या जीवनाची स्थिती खराब राहते आणि असा व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहतो. शास्त्रामध्ये दिवसातील काही अशा वेळा सांगितल्या आहेत, ज्यावेळी झोपणे अपशकुन मानले जाते.
सूर्योदयानंतर झोपणे अपशकुन मानले जाते, सोबतच यावेळी झोपल्याने तुमचे आरोग्यही प्रभावित होते.
सूर्योदयापूर्वी उठल्यानंतर खुल्या हवेत फिरणे आरोग्यासाठी खुप चांगले मानले गेले आहे. सोबतच यावेळी उठल्याने घरात भरभराट राहते. दिवसा दुपारपासून सायंकाळपर्यंतचा काळ शास्त्राच्या हिशेबाने झोपण्यासाठी अशुभ आहे.
तसेच हा काळ आजारसुद्धा देऊ शकतो. दुपारी किंवा सायंकाळी झोपल्याने पोटासंबंधी आजार होऊ शकतात आणि नेहमी मनात अशांतता राहते.
दुपारी किंवा सायंकाळी झोपल्याने मानसिक शक्ती कमजोर होते, शरीरात आळस, सुस्ती राहते, ज्यामुळे आजारांचा प्रभाव वाढतो. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की, दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी सर्व देवी-देवता पृथ्वीवरच राहतात.
आणि यावेळी झोपणारे लोक देवी-देवतांच्या आशिर्वादापासून वंचित राहतात. संध्याकाळी घरात पूजा आणि देवाची प्रार्थना केली पाहिजे, यामुळे घराचे दुर्भाग्य दूर होते. सोबतच आरोग्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो.
माणूस हा अनेकदा सवयींचा गुलाम असल्याचे म्हटले जाते. सवय जशी चांगली असते, तशी ती वाईटही असते. भारतीय संस्कृती आणि शास्त्रात दुपारी झोपू नये, असे सांगितले आहे.
मात्र, अनेकदा दुपारीही ताणून देण्याची सवय अनेकांना असते. दुपारी झोपल्यामुळे लक्ष्मी देवीची नाराजी ओढावली जाऊ शकते. आरोग्य आणि दीर्घायुष्य यांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
वाताचे विकार वाढतात, असे सांगितले जाते. संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशमय करणारा आणि ऊर्जा देणारा सूर्य पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्यामुळे दुपारी झोपू नये, अशी मान्यता आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments