नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, 30 जून रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. जेव्हा गुरूवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं, तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो.
या योगावर सुवर्ण खरेदी केली जाते हे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण असं समजलं जातं की, या दिवशी ज्या काही वस्तूंची खरेदी आपण करतो त्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत जाते.
मात्र या दिवशी विवाह आहेत कारण पुष्य नक्षत्र हे विवाहास वर्ज्य मानले जातात. आपल्या जीवनात यशप्राप्तीसाठी या योगाचे दोषी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरूवात करणं किंवा एखादं नवीन काम हाती घेणे किंवा बंद पडलेले काम सुरू करणं अशी काम केल्यास त्यामध्ये हमखास यशाची प्राप्ती होते.
मित्रांनो पुष्य नक्षत्र प्रकारच्या शुभकार्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यास शुभ आणि फलदायी योग सुध्दा बनतो. या गुरुपुष्यामृत योगावर धनप्राप्तीसाठी आपण माता लक्ष्मीची पूजा नक्की करा.
कारण या दिवशी केलेली माता लक्ष्मीची पूजा ही अत्यंत प्रभावी ठरते. या दिवशी केलेल्या माता लक्ष्मीच्या पूजनामुळे धनप्राप्तीचे अनेक योग होऊ लागतात. मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य निर्माण करायचे असेल , पैशांमध्ये वृद्धी व्हावी असं वाटत असेल.
तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करून माता लक्ष्मीला 5 हळकुंडाची अर्पण करा. या वेळी आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत, तेव्हा हात-पाय-तोंड स्वच्छ धुवायचे आहेत आणि एका चौरंगावर लाल रंगाचा स्वच्छ वस्त्र आहे.
शक्य असेल तर स्वतः सुद्धा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. कारण लाल रंग हा माता लक्ष्मी चा अधिक प्रिय रंग आहे. सोबतच धनप्राप्तीसाठी धनाला आकर्षक सुद्धा लाल रंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो.
आता लाल रंगाचे वस्त्र चौरंगावर अथरल्यानंतर चौरंगावर मधून आपल्याला तांदळाच्या साह्याने अष्टदल कमल काढायचा आहे. हे लक्षात घ्या या ठिकाणी आपण जे तांदूळ वापरणार आहोत ते अखंड असावेत, न तुटलेले-फुटलेले अखंड तांदूळ या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि त्याच अष्टदल कमळ काढायचे आहे.
आणि अष्टदल कमळावरती आपण माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल ती स्थापित करायचे आहे. त्यानंतर माता लक्ष्मी समोर गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे.
मग आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करायचे आहेत. माता लक्ष्मीला हळद-कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. सोबतच माता लक्ष्मीला प्रिय असणारे लाल रंगाची फुलं शक्यतो गुलाबाचे फुल आणि कमळाचे फूल जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय फूल अर्पण करायचे आहेत.
जर ही फुले मिळाली नाही तर कोणतीही लाल रंगाची फुले तुम्ही अर्पण केली तरीही चालेल.
मित्रांनो त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. शक्यतो तांदळाची खीर असेल तर त्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि या ठिकाणी 5 अखंड हळकुंड आहेत.
मग ज्यांना कीड लागलेली नसेल अशी चांगल्या प्रतीची 5 हळकुंड आपण घ्यायचे आहेत आणि ती माता लक्ष्मी चरणाजवळ आपण अर्पण करायचे आहेत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्रामध्ये ही हळकुंडाचा खूप महत्त्व सांगण्यात आलेला आहे.
हळकुंड आणि हळद ही माता लक्ष्मी सुद्धा अत्यंत प्रिय आहे. तर अशाप्रकारे विधिवत आपण मात्ता लक्ष्मीचे पूजन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही एक मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
शक्य असेल तर जास्त वेळ सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु कमीत कमी 108 वेळा तरी हा मंत्र आपल्याला बोलायचं आहे.
मंत्र आहे, “ओम श्रीम श्रेय नमः, ओम श्री ओम श्रीम नमः” किंवा “ओम श्रीम नमः, ओम श्री ओम नमः”, या मंत्राचा सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही पैकी कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल.
त्यानंतर मात्र लक्ष्मी समोर नतमस्तक व्हायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायचे आहे की, माझ्या घरातील गरिबी दारिद्रय कायमची निघून जाऊ दे आणि घरातील अलक्ष्मी निघून जाऊ दे आणि घरामध्ये माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य होऊ दे. घरामध्ये भरपूर पैसा आणि धन-संपत्ती येऊ दे.
अ
शा प्रकारची प्रार्थना करायचे आहे. लक्षात घ्या ही पूजा आपण गुरुपुष्यामृत योगामध्येच करायचे आहे. आपण आपल्या दिनदर्शिकेमध्ये गुरुपुष्यामृत काय वेळ आहे हा पाहू शकता आणि त्यानुसार की पूजा पण करायचे आहे.
मित्रांनो ही पूजा केल्यानंतर दिवसभर आपण ही पूजा अशीच राहू द्यायचे आहे आणि त्या दिवशी रात्री 12 वाजता घरातील कमावती व्यक्ती आहे त्या व्यक्तीने माता लक्ष्मीला आपण जे 5 हळकुंड अर्पण केलेले आहेत.
ते एका लाल कपड्यांमध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची पुरचुंडी बांधून आपल्या घरातील तिजोरीत हे हळकुंड ठेवून द्यायचे आहेत. लक्षात घ्या की, जेव्हा आपण हे हळकुंड आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत .
त्या वेळी तिजोरीमध्ये कोणतीही अपवित्र वस्तू असणार आहे. कोणत्याही प्रकारची कर्जाची बिल असणार नाहीत, याची आपण काळजी घ्यायची आहे आणि यापुढे जेव्हा जेव्हा गुरुपुष्यामृत योगी किंवा लक्ष्मीपूजन असेल.
तर त्या वेळी आपण ही हळकुंडाचे पुरचुंडी माता लक्ष्मीचे पूजनमध्ये ठेवायचे आहे आणि पूजा झाल्यानंतर त्या रात्रीची व दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण पूजा उचलणार आहोत त्या वेळी हळकुंडाचे पुरचुंडी पुन्हा आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे.
मित्रांनो या उपायामुळे माता लक्ष्मीचे स्थायी वास्तव्य घरामध्ये निर्माण होतं. हा अत्यंत साधा सोपा परंतु तितकाच प्रभावी उपाय आहे, नक्की करून पहा. मात्र मित्रांनो हा उपाय आपण केलेला आहे.
याची वाच्यता कुठेही करू नका. कोणालाही तुम्ही उपाय केलाय हे सांगत बसू नका, कारण जेव्हा असे काही उपाय आपण करतो तेव्हा ते जेव्हा दुसऱ्यांना सांगितले जातात तर त्याच क्षणी त्या उपायांचा प्रभाव नष्ट होतो त्यामुळे जे काही तुम्ही उपाय करता टोटके करता ते गुप्त ठेवा.
या गुरूपुष्यामृत योगाचे निमित्ताने तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीची निरंतर बरसत राहो हीच प्रार्थना.. माहिती आवडली असेल लाईक करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments