नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,ओम नमः शिवाय, आषाढी एकादशी जी हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जातं, कारण या दिवसापासूनच भगवान श्रीहरी श्रीविष्णू योगनिद्रेत जातात.
या दिवसापासूनच चातुर्मासाला आरंभ होतो आणि 4 महिन्यानंतर जेव्हा कार्तिकी एकादशी येते. या दिवशी श्रीहरी श्री योग निद्रेतून जागे होतात. या 4 महिन्यांमध्ये जगात सर्व कारभार भगवान भोलेनाथ, महादेव सांभाळतात. या आषाढी एकादशीच्या खुप आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे एकादशीचे व्रत पूर्ण भक्तीने आणि प्रेमाने करतात. या दिवशी श्री विष्णूच्या कोणत्याही रूपाची पूजा केली जाते. मग श्रीविठ्ठलाचे असेल, श्रीकृष्णाचे रुपाची किंवा बाळकृष्णाचे रूपाची आपण या दिवशी पूजा करू शकता.
तुम्ही सुद्धा हे आषाढी एकादशी व्रत करत आहे, उपवास करत आहे. तर काही गोष्टींचे पालन नक्की करा. काही गोष्टी आहेत ज्या एकादशी विशेष करून आषाढी एकादशी चुकूनही करू नयेत.
नाहीतर आपण जे व्रत करत आहोत उपवास करत आहोत त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही.
हिंदू धर्मशास्त्रानुसार या आषाढी एकादशी निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची कपडे अजिबात घालू नका, म्हणजे या दिवशी पूजा करणार आहात देवपूजा करताना निळ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करू नका.
सोबतच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही त्या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. तामसिक पदार्थ म्हणजे कांदा, लसुन असेल अशा पदार्थांचं सेवन सुद्धा आपण टाळायचे आहे.
मित्रांनो आषाढी एकादशीचा दिवस म्हणजे भगवंताच्या चरणी लीन होण्याचा दिवस आणि या दिवशी जर आपण तामसिक पदार्थांचे सेवन केलं तर आपल्याला त्या दिवशी मंत्र करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी जी एकाग्रता आवश्यक आहे ती आपल्यात येत नाही.
आपण परमेश्वराशी एकरूप होत नाही, त्यामुळे आषाढी एकादशीच आपण मद्यपान, मांसाहार आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळायचे आहे.
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बसलेला आहे, त्यामुळे या आषाढी एकादशी कोणाचाही अपमान करू नका. आपल्या तोंडून कोणालाही अपशब्द बोलले जाणार नाहीत, याची आपण काळजी घ्यायची आहे.
कारण मित्रांनो या आषाढी एकादशी किंवा कोणत्याही व्रताच्या दिवशी जर आपण वडीलधाऱ्याना किंवा कोणत्याही व्यक्तीला अपशब्द बोललो एखाद्याचा अपमान केला तर यामुळे चढतच पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही.
तस तर मित्रांनो कधीच कोणाला अपशब्द बोलू नये वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये. मात्र कमीत कमी आषाढी एकादशीस तरी आपण या गोष्टींची काळजी घ्यायची आहे.
त्यानंतर मित्रांनो या आषाढी एकादशीस आपण गादीवर किंवा पलंगावर झोपू नये, हा अत्यंत महत्त्वाचा नियम या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तुम्ही या दिवशी जमिनीवरच एकदम वस्त्र अंथरून झोपू शकता.
पुढील गोष्ट म्हणजे या आषाढी एकादशीस आपण तांदळापासून बनलेल्या कोणतेही पदार्थांचे सेवन करू नये. मग भात असेल, तांदळाची खीर असेल किंवा तांदळापासून कोणताही पदार्थ असेल.
त्याचा सेवन आपण या आषाढी एकादशी याच नाही तर कोणतेही एकादशीच आपण करू नये. आपल्या घरात सुख-समृद्धी येण्यासाठी, धनप्राप्तीसाठी आणि श्री विष्णू प्रसन्न करण्यासाठी या आषाढी एकादशी तुळशी पत्राचे तुळशीचे पान आहे.
त्याचे अनेक उपाय केले जातात. मात्र मित्रांनो लक्षात ठेवा की, एकादशीच आपण तुळशीपत्र चुकूनही तोडू नये. जर तुम्हाला तुळशी संबंधित किंवा तुळशीपत्र वापरून काही उपाय करायचे असतील.
तर एक दिवस आधीच तुम्ही तुळशी पत्र तोडून खाऊ शकतात आणि त्यांचा वापर आषाढी एकादशीच पूजेमध्ये करू शकता. आषाढी एकादशी व्यतिरिक्त वर्षभरातील एकादशी येतात.
त्या दिवशी सुद्धा आपण मात्र चुकूनही तोडू नये. या दिवशी तुळशीपत्र तोडल्याने अनेक प्रकारचे दोष आपल्या लागू शकतात. जर तुम्ही आज या दिवशी तुळशीपत्र तोडायला विसरलात, तर या तुळशीच्या खाली काही पाने पडलेले असतील.
आणि सुटलेले असतील तरीसुद्धा त्या पानांचा वापर तुम्ही पूजेमध्ये करू शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केलेले असेल तर तुळशीपत्र स्वच्छ धुऊन त्यांचा पुनर्वापर तुम्ही एकादशीच करू शकता.
तसेच तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत, उपवास करत आहे त्या दिवशीपासून ब्रह्मचर्याचे पालन करा. या गोष्टी या नियमांचं पालन जर तुम्ही या आषाढी एकादशीच केलं तर उपवासाचं पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल. भगवान श्रीहरी श्रीविष्णूची असीम कृपा तुमच्यावर होईल..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments