नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,आपण आपल्या पूर्वजांचा वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. आपले पूर्वज त्याचे साहस,पराक्रम नेहमी आपल्या लक्षात ठेवतो. त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुखी होत असते.
आपले पितर जर आपल्यावर खुश असतील तर आपली सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील. कारण ते जर खूश असतील तर आपण आनंदी राहतो, आणि जर ते आपल्यावर नाराज असतील, असंतुष्ट असतील.
तर आपल्या घरी नेहमी गरिबी येते, अलक्ष्मी नांदते, घरातील वाद खूप टोकाला जातात.जर तुमच्या घरात शांतता असेल, सर्व लोक समाधानी असतील, मुले मोठ्यांचे म्हणणे ऐकत असतील, घरात आनंदी आनंद असेल तर समजावे की आपले पित्र आपल्यावर खूप प्रसन्न आहेत.
एखादे मोठे संकट असेल, त्यातून बाहेर पडण्यासाठी कितीही धडपड केली तरी पडत नसाल तर समजावे की आपले पितर आपल्यावर नाराज आहेत. घरात सतत कुरबुर, आजारपण असेल , तर समजावे की आपल्या पितर आपल्यावर नाराजी आहेत,
पितर काही वेळेस मुलांद्वारे आपल्यावर प्रकट होत असतात, त्यामुळे आपली मुले आपल्याला दुःख त्रास देत असतात तर हे लक्षण आपले पितर आपल्यावर नाराज असल्याचे आहे.
पितरांचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल तर आपली सर्व कामे अडून राहतात, कितीही प्रयत्न केले तरी ती होत नाहीत, केलेल्या कामात योजलेला मोबदला येत नाही. आपले पितर आपल्यावर प्रसन्न असतील.
तर त्यांचे श्राद्ध अगदी योग्य प्रकारे व विधीपूर्वक करावे म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला सतत मिळत राहतील आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपली सर्व कामे सहजरित्या पूर्ण होतील.
जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर पितृपक्षात त्यांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान व अन्नदान अवश्य करावे व त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. कुंडली पहिली तर त्यामध्ये पितृदोष नक्की दिसून येतो,
म्हणून हा पितृपक्ष खूप श्रेष्ठ मानला जातो, या दिवसात केलेलं श्राद्ध हे जास्त लवकर फळास येते.
तसेच आपण खूप कष्ट करतो, भरपूर पैसा घरात येतो परंतु टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा सारखा खर्च होतो व हातात काहीच शिल्लक राहत नाही.
असे होत असेल तर समजावे की आपले पितर नाराज आहेत.
म्हणून पितरांचे श्राद्ध करावे , पिंडदान तर्पण करावे ,काही वेळा आपली काहीही चूक नसताना कोर्ट केस मध्ये फसतो, केस लवकर संपत नाही , हा देखील संकेत आहे की पूर्वजांची नाराजी आहे, म्हणून योग्य प्रकारे श्राद्ध तर्पण करून आपल्या पितरांना प्रसन्न करावे.
त्यांना शांत करावे. त्यांचे स्मरण करावे.जर आपले पितर आपल्यावर नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करण्यासाठी , त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि.
त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्राप्त करावे. काही चुकले असेल तर त्याबद्दल क्षमा याचना करावी व त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करावी.
पितरांसाठी दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो. या दिवसात दारावर कुणी पशु पक्षी, माणूस आले तर नक्की दान करावे, सेवा करावी, त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये, कारण पितर हे कोणत्याही रुपात येत असतात, आपण त्यांची आठवण काढतो की नाही ते पाहत असतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments