सर्व प्रकारच्या अपूर्ण इच्छा होतील पूर्ण, फक्त 3 एप्रिल श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी करा हा एक चमत्कारिक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा 3 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत. त्यामुळे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी त्यांना दर्शन दिले.

कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात स्वामी माऊलींनी दर्शन दिलं. स्वामी महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.  3 एप्रिल रोजी स्वामी महाराजांचा प्रकटदिन आला आहे.

स्वामी महाराजांचा प्रकटदिन आहे आपल्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्या दिवशी काही सेवा करू शकतो जे स्वामींवर अतोनात प्रेम करतात, जे स्वामींवर खूप विश्वास आणि खूप श्रद्धा ठेवतात, ज्यांचे रोजचे पहाट स्वामींच्या चरणी असते.

त्यांचा रोजचा दिवस स्वामींच्या स्मरणात सुरू होऊन स्वामींच्या नामाचा जप सुरु होतो, असे असंख्य भक्त आहेत. आपण सर्व भक्त रोज स्वामींचे काही ना काही सेवा करत असतो पण आता प्रकट दिन. आपल्या स्वामी महाराजांचा प्रकटदिन आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी काही विशेष आहे.

आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी येणारा 3 एप्रिल म्हणजेच आपल्या स्वामी माऊलीचा प्रकट दिन खूप आनंदाचा आहे. स्वामी माऊलींच्या प्रेमळ भक्तांनो आपण स्वामी माऊलींच्या प्रकट दिनी विविध प्रकारे सेवा करू शकतो.

आपल्या सर्वांच्याच घरी स्वामींची प्रतिमा असते ही स्वामींचे प्रतिमा एका मलमलच्या कपड्यात गंगाजलाचा पाण्याने स्वच्छ करून त्या कपड्याने पुसून घ्यावे स्वामींची प्रतिमा असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्याला गंगा जला मध्ये स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे.

त्यानंतर स्वामींची प्रतिमा आपल्या लाल कपड्यावर किंवा पिवळ्या कपड्यावर ठेवायचे आहे. यानंतर आपण ती स्वच्छ पाण्याने धुऊन समोर 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण 11 दिवे किंवा 11 मेणबत्त्या देखील लावू शकतो. स्वामींच्या प्रतिमेसमोर स्वामींच्या समोर हे दिवे लावून आपण प्रकाश निर्माण करणार आहोत.

कारण हा दिवस स्वामींसाठी आपल्यासाठी काहीतरी वेगळ आहे. त्या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रकाश उज्वल  करायचा आहे म्हणून आपण दिवे किंवा मेणबत्ती लावू शकतो.

यानंतर आपण स्वामी महाराजांना फुलांनी सजवून शकतो. तसेच रांगोळी वगैरे काढू शकतो ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काढू शकता. त्यानंतर आपल्याला  स्वामींच्या प्रतिमेसमोर तीन अगरबत्त्या लावायचा आहे.  या तीन अगरबत्त्या  आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासाठी लावणार आहोत.

मग यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्वामी महाराज यांना नैवेद्य दाखवू शकता. त्याच्यामध्ये पुरणपोळी असेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्वामींना हवा तो नैवेद्य दाखवू शकतात. तसंच आपल्या स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडत असे तो देखील आपण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकतो. यानंतर आपण स्वामींना एका बाजूला जल देखील अर्पण करणार आहोत.

यानंतर आपली पूजा वगैरे झाल्यानंतर सर्वात पहिले आपण 3 अगरबत्त्या लावल्या आहेत त्या संपेपर्यंत “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” आणि “श्री स्वामी समर्थ”,” श्री स्वामी समर्थ”, या मंत्राचा नामस्मरण त्या 3 अगरबत्त्या संपेपर्यंत आपल्याला करायचा आहे. भक्तांनो यामुळे  आपल्याला मन शांती मिळते आणि आपलं मन बरं वाटतं.

मग लवकरात लवकर पूर्ण करण्यात हे नामस्मरण महत्त्वाचं ठरतं. यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत यामध्ये 21 अध्याय आहेत. या दिवशी  थोडा वेळ काढून आपण स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचा प्रयत्न करावा.

आपल्या रोजच्या कामांमुळे किंवा रोजच्या दिनचर्ये मुळे  सारामृत वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर काही हरकत नाही पण तुम्ही  श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्तवन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र 3 वेळा बोलावा.

तुम्हाला काहीच जमलं नाही तर तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण केलं तरी खूप आहे. भक्तांनो स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी जितका होईल तितकं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा होईल तितकं तुम्हाला जितकं जमेल तितकं नामस्मरण करायला विसरू नका व आपले स्वामी महाराज तर माऊली आहेत आपण मनापासून केलेली सेवा ते नक्कीच मान्य करून घेणार आहेत.

आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तसेच दत्तगुरु महाराजांचा जयघोष करावा. त्यादिवशी घरी  आपण पूजेसाठी केलेला प्रसाद द्यावा तसेच आपल्या आजूबाजूला देखील आपल्या स्वामी महाराजांचा प्रसाद नक्कीच द्यावा.

यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी आपल्या घरी चिडचिड वादविवाद होणार नाहीत याची सर्व स्वामी भक्तांनी काळजी घ्यायची आहे. तुम्ही  दिवसभर पूजा केली नामस्मरण केलं पण तुमच्या घरी सतत चिडचिड आणि वाद सुरू आहे तर त्या पूजेला काही अर्थ राहणार नाही.

त्या दिवशी तुम्हाला तुमचं घर प्रसन्ना ठेवायचा आहे. आपल्या घरी  स्वामी महाराजांचा दत्तगुरु महाराजांचा अगदी  तुमच्या परिवाराला देखील नामस्मरण करायला सांगायचा आहे. नामस्मरणामधे खुप शक्ती आहे. तुम्हाला जर का ही सेवा करणं जमलं नाही तर किमान श्री स्वामी समर्थ आणि दत्त गुरु महाराजांचे नामस्मरण करायला विसरू नका.

मग 3 एप्रिल म्हणजेच येणाऱ्या रविवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्ही अशा प्रकारे साधी आणि सोपी सेवा करू शकता. आपले स्वामी महाराज भक्तीचे भुकेले आहेत.

आपण जे काही मनापासून सेवा करू ती सेवा नक्कीच आपले स्वामी महाराज मान्य करत आहेत. त्यामुळे निशंक मनाने रहा. या उपायाने स्वामी महाराज तुमच्या सर्व प्रकारच्या  इच्छा पूर्ण करतील…..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!