2 एप्रिल नवीन वर्षाच्या दिवशी हा 1 मंत्र बोला, सर्व प्रकारच्या अडचणी दूर होवून, घरांत सुख-समृद्धी उपाय येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा महत्त्वाचा शुभ मानला जातो.

या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. आपल्या राशिचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो. म्हणून चैत्र हा वर्षांतील पहिला महिना आहे. या चैत्र महिन्यात पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या नक्षत्रावरून चैत्र हे नाव पडले आहे.

तेव्हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी गुढीपाडव्याचा सण 2 एप्रिल 2022 आहे. तर गुढीपाडव्याचा मुहूर्त हा फाल्गुन अमावास्य 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी संपलेल.

तेव्हा अमवास्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 च्या रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील.

तिथीनुसार हा उत्सव 2 तारखेला साजरा केला जाईल. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि याच दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे.

या गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा, 1 मंत्र बोला वर्षभर कधीच कमी राहणार नाही आणि सुख-समृद्धी वर्षभर टिकून राहील आणि कसलीच कमी राहणार नाही. जे हवं ते सगळं काही मिळू लागेल फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

मात्र या मंत्राचा जप तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यत करायचा आहे. तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे, जर तुम्ही तुमच्या घरी गुढी उभारत असाल तर आपण 12 वाजेच्या आत गुढी उतरवतो आणि देवघरात ठेवून तिची पूजा-अर्चा करीत असतो, त्या गुढी समोरच तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे.

जर तुम्ही गुढी उभारत नसाल तरीही तुम्हाला सकाळचा देव पूजेच्या वेळेस किंवा 12 वाजेच्या आत तुम्ही देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करु शकता.

तसेच तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष जर कोणीही या मंत्राचा जप करू शकता.  तुम्हाला या मंत्राचा जप 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करायचा आहे.

तर हा मंत्र काही असा आहे की, “ओम ब्रह्मणें नमः”, “ओम ब्रह्मणें नमः”,  हा मंत्र आहे. एक वेळेस संपूर्ण 1 माळ या मंत्राची जप करायचा आहे.

तर गुढी पाडव्याच्या दिवशी हा उपाय नक्कीच  करा, तुम्हाला यांनी भरपूर लाभ होईल… याचबरोबर, या दिवशी गुढी उभा करतेवेळी,

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।

प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।

ही प्रार्थना करावी, मग ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे.

त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्यावी. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!