2 एप्रिल चैत्र नवरात्रेला नवीन वर्षात भरा देवी मातेची ओटी, जीवनातील सर्व अडचणी, संकटे होतील दूर…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.

वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दा

री उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. यंदा गुढीपाडवा मंगळवार 2 एप्रिल 2022 रोजी साजरा केला जाईल.

संवत्सर पाडवा म्हणून ओळखल्या जाणारा गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील आणि कोकणवासीयांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गुढी पाडव्याचा दिवस उगाडी म्हणून साजरा केला जातो. जरी उत्तर भारतीय गुढी पाडवा किंवा उगाडी साजरा करत नाहीत, परंतु त्याच दिवशी नऊ दिवस चैत्र नवरात्र पूजन सुरू होते.

मराठी नवीन वर्ष 2 एप्रिलपासून सुरू होत आहे, या दिवशी गुढीपाडवा आहे याच दिवशी चैत्र महिन्याचा पहिला दिवस आणि चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे.

म्हणजे देवींच्या अत्यंत महत्त्वाचा दिवस हे 9 दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस खूप महत्त्वाचे असते. कारण खूप लाभदायक असते.

त्यामुळे तुम्हाला या वेळेस नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी मातेची ओटी भरायची आहे.

मग माता तुमची कुलदेवी असेल किंवा घरात लक्ष्मी माता असेल किंवा कोणत्याही देवीची तुमच्या घरात मूर्ती असेल त्या देवीची तुम्ही ओटी भरावी.

ज्या देवीला तुम्ही मानता, ज्या देवीची कृपा तुमच्यावर आहे त्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता. हा प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीची मूर्ती असते, लक्ष्मीची ओटी भरू शकतात किंवा माता अन्नपूर्णाची ओटी भरू शकता.

तुम्हाला फक्त ओटी भरायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फक्त महिलांनी म्हणजे फक्त विवाहित महिलांनी ओटी भरायची आहे.

विवाहित महिलांनी ओटी भरण्यासाठी सर्वात आधी 1 नारळ लागेल, त्यासोबत 11 रुपये दक्षिणा लागतील आणि एक साडी किंवा ब्लाऊज पीस आणि थोडे तांदूळ लागतील.

आता आपल्या देवघरात जागी देवीची तुम्हाला ओटी भरायचे आहे, तिथे आधी साडी देवीच्या पावलामध्ये ठेवून घ्यावी.

मग त्यानंतर त्या साडीवर ते नारळ ठेवावे नारळ सोलायचे नाही असंच ठेवून द्यावं. त्यासोबत 11 रुपये द्यायचे आणि त्यावर 7 वेळेस तांदूळ टाकायचे.

अशा रीतीने ती ओटी भरायचे आहे. मग ओटी भरल्यानंतर तिथेच देवघरात ठेवून द्यायची आहे.

आता ओटीमधील साडी असेल किंवा ब्लाउज पीस असेल तर ज्या महिलांनी ओटी भरली असेल त्यांनी ते वापरू शकतात.

मग 11 रुपये हे बरकत म्हणून देवीचा आशीर्वाद म्हणून आपण जपून आपल्याजवळ ठेवू शकता  आणि तांदूळ किंवा गहू तुम्ही ओटीमध्ये टाकावे.

मग तो नारळ फोडून प्रसाद म्हणून देवीचा आशीर्वाद देवीचा प्रसाद म्हणुन खायचा आहे, अशा सोप्या रीतीने तुम्ही देवीची ओटी अवश्य भरावी, कारण चैत्र नवरात्र मानली जाते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!