हे 5 संकेत सांगतात की, मुसळधार पाऊस पडणार आहे | पाउस पडण्याचे 5 संकेत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपल्या वातावरणात असे बरेचसेे घटना घडतात की ज्यामुळे हवामानबदलाचे ज्ञान उपजतच असते. याचबरोबर, पाऊस, नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी ह्यांसारख्या घटनांची माहिती अशा पक्ष्यांच्या वर्तणुकीत होणार्‍या बदलांवरून लक्षात येते.

हे पक्षी जसे हवामानातील बदलांचे सूचक असतात, तसेच परिसंस्थेतील बदलांचेही. परिसंस्थेतील अनुकूल, प्रतिकूल बदल त्यांच्या अस्तित्वावर परिणाम करणारे असतात. पावसाचे संकेत देणार्‍या, काही पक्ष्यांबद्दल घेण्यात आलेला आढावा’

याचबरोबर, प्रचंड जैवविविधतेचे भांडार असलेल्या ह्या कोकणात माळरानापासून घनदाट जंगलाचा भाग समाविष्ट होतोे. स्वाभाविकच सर्वच प्रकारचे पक्षी कोकणात पाहायला मिळतात.

वसंत ऋतू आला की निरनिराळी फळझाडे फुलू लागतात आणि पाणथळ जागेवरील; स्थानिक, पण स्थलांतरित; आणि परदेशातील स्थलांतरित असे असंख्य प्रकारचे पक्षी इथे आपापल्या सुरात ओरडताना दिसतात.

पक्षी हा घटक परिसंस्था आणि हवामान यांमधील बदलाचा निर्देशक असतो. साहजिकच, एखाद्या जातीच्या पक्ष्यांच्या संख्येवरून त्या ठिकाणच्या जंगलाचा, त्याच्या समृद्धीचा; तर त्यांंच्या स्थलांतरावरून, हालचालींवरून हवामानासंबंधीचा अंदाज बांधता येतो.

त्यामुळे ‘मोर’, ‘पाणकोंबडी’ आणि ‘पावश्या’ ह्यांचे पावसाळ्यापूर्वीचे ओरडणे पाऊस येणार असल्याची पूर्वकल्पना देणारे असते. बर्फाळ प्रदेशात बर्फ पडायला सुरुवात झाली की.

तिथले स्थानिक पक्षी खाद्यासाठी इतरत्र स्थलांतर करण्यास सुरुवात करतात. पावसाळा संपत आला की आपल्या भागात ‘खाटीक’ पक्षी दिसायला लागतात, तसेच ‘इंडियन रोलर’ नावाचा निळा पक्षी माळरानावर दिसायला लागतो. पावसाचे संकेत देणार्‍या अशाच काही पक्ष्यांबद्दल माहिती.

तसेच जास्त थंड ठिकाणी आढळणारे ‘तिबोटी खंड्या’, ‘निळ्या कानाचा खंड्या’ आणि ‘छोटा खंड्या’ ह्या तीन प्रकारच्या खंड्यापक्ष्यांचे मे महिन्यात होणारे दर्शन पावसाच्या आगमनाचे संकेत देणारे असते.

हे पक्षी मे महिन्याच्या मध्यापासून जोरात ओरडत एकमेकांचा पाठलाग करताना दिसतात. या काळात त्यांचा रंग खूप गडद होत जातो. त्यांच्या रंगांमध्ये होणारा हा बदल त्यांच्या विणीच्या हंगामाचे संकेत तर देतोच, .

शिवाय पावसाच्या आगमनाचेही संकेत देत असतो. त्यांच्या दिसण्याच्या प्रमाणावरून तिथली पाणथळ जागा किंवा जंगलाच्या घनतेचे प्रमाण लक्षात येते.

तसेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून ‘ब्लॅक बर्ड’ व ‘ऑरेंज हेडेड ग्राउंड थ्रश’ हे दोन पक्षी आढळतात. ह्या काळात ह्या पक्ष्यांचे ओरडणे सर्वत्र ऐकू येते. मे महिन्याच्या सुरुवातीपासून हे पक्षी घरटे बांधायला सुरुवात करतात.

ऑगस्टनंतर मात्र हे पक्षी फारसे दिसत नाहीत. त्यांचे प्रमाण ज्या ठिकाणी जास्त दिसून येते, त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आढळते; कारण त्यांचे मुख्य खाद्य गांडूळ, किडे हेच आहे.

मात्र अलीकडे या पक्ष्यांचे प्रमाण खूप कमी झाले असल्याचे आमच्या पाहण्यात आले आहे. सातआठ वर्षांपूर्वी यांची संख्या खूप होती. त्या काळात पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यात सातत्यही होते.

नंतर मात्र बदलत्या हवामानामुळे या पक्ष्यांची वीण कमी होऊन त्यांची संख्या रोडावल्याचे दिसून येते.पावसाचा संकेत घेऊन येणार्‍या पक्ष्यांमधील आणखी एक महत्त्वाचा पक्षी म्हणजे ‘नवरंग’.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा पक्षी कोकणात सगळीकडे दिसायला लागतो. हा पक्षी त्याच्या एका विशिष्ट शिट्टीने संपूर्ण जंगल जागे करतो. इंग्रजीतून ‘इंडियन पिटा’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या पक्ष्याचे नवरंग ह्या पक्ष्याच्या कोकणातल्या आगमनानंतर दीड महिन्यात पावसाळा सुरू होतो.

असे आजवरच्या पाहण्यात आढळून आले आहे. हे पक्षी फक्त विणीसाठीच कोकणात येतात. साधारण सहा ते दहा दिवसांत हे घरटे बांधून पूर्ण होते. मुसळधार पावसात यांचे काम सुरू असते.

घरटे पूर्ण बांधून झाले की मादी रोज एक याप्रमाणे चार ते पाच अंडी घालते. नरमादी दोघेही अंडी उबवतात. साधारणतः चौदा ते सोळा दिवसांनी अंड्यांतून पूर्ण गुलाबी रंगाची पिल्ले बाहेर येतात.

त्यांना नरमादी दोघेही बेडूक, किडे, नाकतोडे, गोगलगाय अशा प्रकारचे खाद्य भरवतात. बारा ते सोळा दिवसांनी पिल्लांची पूर्ण वाढ होते व पिल्ले घरट्यातून बाहेर उडून जातात. विणीनंतर हे पक्षी दक्षिणेकडे रवाना होतात, पण त्यापुढील अभ्यास अजून झालेला नाही.

‘पाणपक्षी’सुद्धा पावसाच्या आगमनाची वाट बघत असतात. त्यांच्या रंगांमध्ये होणारे बदल, त्यांचे ओरडणे हे वातावरणातील बदलांचे संकेत देणारे असते. पूर्वी रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणपक्ष्यांची संख्या भरपूर होती;

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे खाद्याची उपलब्धता कमी होऊ लागली आहे. परिणामस्वरूप, पाणपक्ष्यांची वीण कमी झाली आहे. हे सर्व हवामानात होणार्‍या बदलांमुळेच घडत आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!